मीरा भाग अंतिम

Written by

 

 

परी अशी बेशुद्ध पडलेली बघून शिवने तिला उचलून एक रूममध्ये झोपवल. रामू धावतच कुठे तरी निघून गेला. हळू हळु सगळं गाव जमू लागलं.

सुमित : अरे कोणी तरी डॉक्टरांना बोलवा. तसा एक गावातला डॉक्टरला घेऊन आला

डॉक्टर परीला चेक करणार तोच परीने डोळे उघडले..
परीने डॉक्टरचा गळाच धरला.. सगळे घाबरून पाठी झाले. शिव : अग परी काय करतेस हे.. सोड त्यांना..
परी : ए… मी …. मीरा देशमुख… तुझ्याकडे मी नंतर येते आधी ह्या डॉक्टरला बघते. परीने एका हाताने डॉक्टरला एकदम वर धरलं..

सगळे बघतच बसले. एवढी शक्ती आली कुठून हिच्याकडे. सगळ्या गावतल्यांनी परीला पकडलं पण ती कोणालाही आवरत नव्हती.

परी : मला ज्यांनी त्रास दिला मी त्यांना सोडणार नाही..

परीच ते रूप बघून पूर्ण सगळेच घाबरले..

सुमित : ताई तुला काय हवं आहे नक्की..?
परी सुमितच्या आवाजाकडे बघत शांत झाली..
मोठमोठयाने गुरगुरु लागली..

परी : मला न्याय हवा. ज्यांनी मला फसवलं.. त्याला मी सोडणार नाही.. आणि जे मध्ये येणार त्याला पण मी सोडणार नाही…
एवढं बोलून परी पुन्हा बेशुद्ध झाली.

शिव धावतच परीकडे गेला… परी काय होऊन बसले हे. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या परीकडे बघत शिव बोलू लागला.

सुमित : नक्कीच काही तरी अन्याय झाला आहे मीरावर. खर तर माझा ह्या सगळ्यावर विश्वास नाही पण डोळ्यांनी जे बघितलं मी त्याला नाही बोलु शकत नाही.

थोड्याच वेळांत रामू गुरव ना घेऊन आला.
त्याने परीच्या डोक्यावर हात ठेवताच पुन्हा ती जागी झाली. आणि पुन्हा गुरगुरु लागली..

गुरव : कोण हायस तू?
परी : मीरा.. मीरा देशमुख हाय मी..
गुरव : काय हवंय तुला??

परी शिवकडे बघते… आणि विचित्र हसते..
गुरव हातातला अंगारा तिच्यावर फुकतो..

गुरव : नीट सांग काय हवंय ते..

परी : न्याय हवाय मला.. तीन वर्षे ह्याच दिवसाची वाट बघत होते मी… (आणि विचित्र हसू लागते)

डॉक्टर हळूच पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो..

परी मोठ्याने त्याच्यावर कींचाळत : ए….. थांब तिथंच.. गावतल्यानं कळू दे कसा हायस ते तू…

डॉक्टर : मला माफ कर. माझी चूक झाली..

परिघा खूप विचित्र हसते..

परिघा एक नजर शिवकडे टाकते..

तूच पाठवलं व्हत ना त्या पाटलाच्या पोराला.

शिव : मी कुणाला नाही पाठवलं मीरा.

परिघा खूप रागात गुरगुरते.. स्वतःचा गळा पकडते.
शिव : मीरा तिचा काय दोष त्यात सोड तिला.
परिघा : हिला सोडू (पुन्हा विचित्र हसू लागते)
हिच्यासाठी तू मला न्हाई बोललास… हिला सोडू मी..,
शिव : हे बघ मीरा मी खरच त्यादिवशी तुला भेटायला येत होतो. पण राणीचा फोन आला आणि तुझ्या मनात काय चाललंय हे तिने मला सांगितलं. म्हणून मी रागात पुन्हा घरी गेलो. आणि मी कोणालाच ही गोस्ट सांगितली नाही. परीच्या भावाला देखील नाही. त्याला सांगून मला काय भेटणार होत. मला वाटलं तू दुसऱ्यादिवशी दुकानावर येशील तेव्हाच तुझी कानउघडणी करेल. पण सगळं उलट होऊन बसले.

परिघा : पुन्हा खोट….

(सगळ्यांना ती बाजूला करून स्वतःच डोकं भिंतीवर आपटू लागते)
गुरव : हे माझ्या क्षमतेपेक्षा बाहेर आहे. मी हिला आपल्या हातात नाही ठेवू शकत. ती सोडणार नाही कुणाला..

मीरा..

कोणी तरी गर्दी बाजूला सारत पुढे येत.. मीरा तो आवाज ऐकून खाली बसते.. एक तर्क कुठे तरी बघत अंग दोन गुढग्यांच्या मध्ये लपवत ती येणाऱ्या आवाजाकडे लक्ष देते.

पूर्ण गर्दी बाजूला सारून तिची आई तिच्या पुढ्यात येते.

परिघाकडे बघत मीराची आई रडू लागते…

मीराची आई : काहून त्या पोरांना त्रास देतीस. हे तुझं जग न्हाई पोरी. मुक्त हो ह्यातून..
परिघा फक्त ऐकत बसते..

आपल्या आईच ऐकणार न्हाहिस…

एक टक आईकडे बघते….

न्हाय….. मला न्याय हवाय…

मी ह्या सगळ्यांना घेऊन जाणार. ह्या लोकांनी मला मारू टाकलय.. मी नाही सोडत बघ कुणाला बी… परिघा पुन्हा विचित्र हस्ते..

सुमित : हे बघ ताई मी तुला न्याय मिळवून देईल.. तू सांग काय झालंय तुझ्यासोबत..

परिघा : ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यानेच सांगावं काय झालं..

अस बोलुन परिघा पुन्हा तीच डोकं भिंतीवर आपटू लागते. पूर्ण डोक्यातून रक्त येत.
तोच पाटील त्या खोलीत येतात..

पाटिल : थांब पोरी…. माझ्या कर्माची शिक्षा माझ्या पोरीला देऊ नगस..

परिघा आता खूप जोरात हसू लागते…

स्वतःच्या पोरीला लागलं तर एवढं दुखल काय रे थेरड्या तुला.. माझा जीव घेताना काय वाटलं नाही तुम्हाला…

सगळे एकदम अवाक होऊन पाटलांकडे बघू लागतात..

पाटील दोन्ही हात धरत, रडतच खाली बसतात..

शिव : बाबा तुम्ही मीराला मारलं??

पाटील : एक बाप म्हणून मी काय करायला हवं व्हत??

त्या रात्री मला यायला उशीर झाला.. वेशीवर येताच मला किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. ड्राइवर आणि मी तिथेच गाडी बाजूला लावून आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. तोच आवाज एकदम शांत झाला. तिकडे जाऊन बघितलं तर माधवच्या अंगावर कपडे नव्हते. आणि मीरा देखील निवस्त्र अशी पडलेली. माधवणे तिची अभ्रू लुटून तिचा गळा दाबून मारून टाकलं.

पाटील : अर लेका काय केलंस हे.

मी जसा ओरडलो… तसा तो भानावर आला.

तरी बी मला वाटलं की तिच्यात थोडा तरी जीव शिल्लक हाय. म्हणून मी लागलीच डॉक्टरला फोन करून बोलवून घेतलं. डॉक्टर तिथे येताच, जीव गेलाय हीचा म्हणून मला सांगितलं..

माधवला मी खूप मारलं पण बहिणीच्या मायेपोटी त्याने त्या मीराला मारून टाकलं.

एक मिनिट सगळ्यांना मध्येच थांबवत सुमित पाटलांना विचारू लागला, पण माधव ला कस कळलं की मीरा शिव ला भेटायला जाणार ते. मीराने तर रवीला सांगितलेलं?

परिघा : ह्या शिवने पाठवलेलं त्याला..
शिव : नाही मी नाही पाठवलं. मी का पाठवू. मला माधव भेटला देखील नाही.
परिघा : मला माधवच बोलला. तुझ्या शिवने तुझी बोली माझ्या संग केली म्हणून..

मी नाही सोडणार कुणालाच. परिघा बोलू लागली..

पाटील : लेकी थांब.. शिव खर बोलतोय. राणी शिवला फोन करून सांगताना माधव ने ऐकलं. आणि म्हणून तो तिथे होता. ह्यात शिव आणि परीचा के दोष नाही.

रवी दारू पिऊन झिंगुण पडलेला घरी. त्याच्या ध्यानात पण नव्हतं की तू आज शिव ला भेटायला जाणार आहेस.

मी सुद्धा काहीच करू शकत नव्हतो. बापाचं प्रेम आडवं आलं. डॉक्टरांना थोडे पैसे देऊ केले आणि कोणाला कळू नये म्हणून बलात्कार केलाय असा संशय येऊ नये म्हणून पुरावे नष्ट केले. एवढं बोलून पाटील रडू लागले..

गावातील सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं..

परिघा अचानक हसू लागली.. आता तू पण बघ पोरगी मेल्याच दुःख काय असत ते… आणि परी स्वतःच डोकं भिंतीवर अपटणार तोच सुमितने तिला थांबायला सांगितले.

सुमित : ताई थांब… तिच्या वडिलांच्या चुकीची शिक्षा तिला देऊन तू पण गुन्हाच करतेस..मग तुझ्यात आणि ह्यांच्यात के फरक आहे.
परिघा : शिव माझा नाही तर कोणाचाच नाही.
रूची : हे चूक आहे मीरा. जेव्हा शिवला तुझी गरज होती तेव्हा तू इतर कोणावर तरी प्रेम करत होतीस. जेव्हा त्याने तुला फसवलं तेव्हा तुला शिव आठवला. त्याने तुझी गावात बदनामी होऊ नये ह्याची खूप काळजी घेतली. आणि तू त्याचाच संसार बरबाद करायला निघालीस.
सुमित : तु चुकीचेच पाऊल उचलुन शिवला अडकवत होतीस. अस प्रेम कधी नाही मिळत. आणि तुला काय वाटत तुला शिव मिळाला असता. कधीच नाही. तूच बघना त्यादिवशी तू परीच्या भावाला शिव तुला भेटतो हे दाखवायला बोलवत होतीस. पण तो तर दारु पिऊन घरी झोपून पण गेला. तस पण शिव तुझ्याकडे आलाच नसता.

परिघा शांत होऊन फक्त ऐकत होती.

सुमित : पाटील सरांना जेवढी कठोर शिक्षा होईल तेवढी देण्याचा एक भाऊ म्हणून माझा प्रयत्न असेल.पण तू ह्या भावच ऐकणार नाही ताई…
परिघा सुमितकडे एक नजर फिरवते.
तिची आई देखील रडत असते..
अचानक परिघा बेशुद्ध पडते. मीरा एक सुष्म आत्मा बनून सगळ्यांभोवती एक फेरी मारून निघून जाते.. तिला आज मुक्ती मिळाली असते.

शिव सुमितचे पाय धरून आभार मानतो..
परीही शुद्धीवर येते. तिला तिने अस काही केलेलं आठवतच नाही.

पाटील आणि डॉक्टर दोघांनाही गुन्हेगाराला मदत केल्यामुळे शिक्षा होते.

एक वर्षानी परी आणि शिवाच्या आयुष्यात गोंडस परी येते. दोघे आई बाबा बनतात. तीच नाव शिव समीरा ठेवतो. पाटील गावातून गेल्यानंतर शिव आपला गाव आदर्श बनवा म्हणून भरपूर प्रयत्न करतो. त्याच स्वप्न तो पूर्ण करतो.

©भावना विनेश भुतल

(कथा कशी वाटली हे नक्की कळवा.. आवडल्यास शेर करा)

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.