मीरा भाग 2

Written by

 

 

डोंगर सफारीकरून चौघेही आपापल्या घरी गेले. मीराला फक्त सुमित आणि सुमितच सगळीकडे दिसत होता. त्याच्यासोबत चॅटिंग करणे प्रेमाची स्वप्ने रंगविणे एवढंच तिला सुचत होत. तिला देखील प्रियासारखी पेंट शर्ट घालायला आवडायचं पण तिच्या आई बाबांना तसले कपडे अजिबात आवडायचे नाही. आणि गाव असल्यामुळे तिला तस कधी करताच आलं नाही. सुमित सोबत तिला सगळं करायला मिळणार होत. तिला सुद्धा प्रियासारखं अस मस्त कुठे तरी फिरवस वाटत होतं. सुमितने देखील एक दिवसात तिला खूप आनंद दिला होता

इथे पाटलांच्या घरी शिवचा विषय चालू असतो. पाटलांना 4 मूल. आणि सगळ्यात लहान मुलगी परिघा.. कोणीही बघताच क्षणी प्रेमात पडेल अशी. चार भावाची एकुलती एक बहीण. अगदी जीवापाड त्यांनी तिला जपल. गावात कोणाचीही तिच्याकडे बघायची हिंमत नसायची. आता पोरगी वयात आली. योग्य वर मिळून देऊन तिचे हात पिवळे करावे मग झालं. पण एवढ लाडाने वाढवलीय म्हटल्यावर गावाबाहेर देन शक्य नाही. म्हणून त्यांनी गावातल्याच शिवशी तीच लग्न लावून देऊयात असा विचार केला. म्हणून पाटील स्वतः शिवच्या घरी गेले. तिथे गेल्यावर तो पर्वाच मुंबईला गेलाय हे त्यांना त्यांच्या वडिलांकडून कळत. पाटील सरळ मुद्यावर येतात. आम्हाला शिवला आमचा जावई करायचा आहे. तुमचं काय मत आहे ह्यावर. शिवच्या वडिलांना तर काय बोलावे सूचतच नव्हते. शिवच्या आईला देखील खूप आनंद झाला. दोघांनीही शिवच मत न विचारता हो म्हणून सांगितले. इथे गावात सगळीकडे चर्चा होऊ लागली. पाटील निघताच शिव च्या वडिलांनी त्याला फोन लावून कळवलं. शिव परिघाला ओळखत होता. दोघेही एकाच शाळेत होते. परिघा शाळेत असताना फक्त शिव सोडला तर बाकी कुणाशीच बोलत नव्हती. पण शिव तिच्या भावांच्या भीतीने तिच्याशी बोलणे टाळायचा. पण काहीही झालं तरी त्याच प्रेम मीरावर होत. पण मीराची स्वप्न एवढी मोठी की ती पूर्ण देखील होणार नाहीत माझ्याने. ही मुंबई नको वाटते मला. अस तो स्वतःशीच बोलला. आई बाबा करतील तेच योग्य त्यांच्या भरोश्यावर सोडूया. तोच फोन वाजला..

शिव : हॅलो… कोण?
परिघा…
शिव : परी तु.. (गावात तिला सगळे परी म्हणून ओळखत होते)
माझा नंबर कसा काय तुझ्याकडे..( थोडं आश्चर्य होऊन)
परिघा : नाही आवडल का मी अस फोन केलेला.
शिव : तस नाही ग.. पण..
परिघा : तुझा नंबर माझ्याकडे खुप आधी पासून होता पण योग्य वेळेची वाट बघत होती.
शिव : म्हणजे?
परिघा : शाळेपासून आवडायचास तू मला. पण दादांच्या भीतीने मी कधी अस बोलून नाही दाखवले. नशिब बघ किती छान दिवस घेऊन आलंय.. पण तुला मी आवडतेना शिव.

शिव आता काही क्षणांसाठी शांत झाला.

त्याला एकीकडे स्वप्नात रंगून गेलेली मीरा जिने कधीही त्याच्याशी दोन शब्द आपुलकीचे असे बोलली नाही आणि एकीकडे ही जी त्याच्यासाठी स्वप्न बघत होती अशी परी…

परिघा : हॅलो… हॅलो…
शिव : हो ऐकतोय..
परिघा : हे बघ शिव.. तुला मी नाही आवडत तर तस सांग. मी घरी सांगेल तस. पण तुझा होकार असेल तरच आपलं लग्न होईल एवढं लक्षात ठेव. तू खुश तर मी खुश राहील. खूप प्रेम करते मी तुझ्यावर. अगदी शाळेत असल्यापासून.
शिव परिघाच बोलन ऐकतच राहिला. नकळत का होईना त्याचे डोळे पाणावले. हेच प्रेम त्याला मीराकडून अपेक्षीत होत.
परिघा : शिव तू विचार कर आणि मला सांग. मला काही घाई नाही बघ.
शिव : तू माझ्यासारख्या मुलावर प्रेम करतेस हेच मी माझं भाग्य समजतो. माझा होकार आहे ह्या लग्नाला.
परिघा : खरच..
शिव : हो खरच..

(इथे शिव आणि परिघाच प्रेम जुळून आल. शिवने आजपासून कधीच मीराचा उच्चार देखील करायचा नाही असं ठरवलं. पुन्हा गावात जाऊ आणि आहे तस जीवन सुरू करू हा विचार तो करू लागला)

इथे सुमितने मीराला भेटायला बोलवलं..

ह्यावेळेला तो एकटाच आलेला..

त्याला एकट्याला अस बघून मीराने त्याला त्याबाबत विचारलं..

सुमित : आम्ही आज रात्री मुंबईला चाललोय.
मीरा : तुम्ही तर 15 दिवस रहाणार होतात ना.
सुमित : हो पण रूमच काम झालं ग. आणि मिहीर आणि प्रियाच लग्न पण लावून द्यायच. अस बिना लग्नाचं त्या लोकांनी फिरणं मला काही पटत नाही आणि कामावरून मला सुट्टी नाही मिळत आहे.
मीरा : मी इथे एकटी कशी राहू तुझ्याशिवाय.
सुमित : आता मी जातो. नंतर येईल पुन्हा तेव्हा तुला घेऊन जाईल.
मीरा : मी पण येणार तुझ्यासोबत आता.
सुमित : तू वेडी आहेस का? आत्ताच कुठे राहायचा ठिकाणा झालाय ह्या दोघांचा. त्यांचं लग्न आधी होऊ दे मग आपलं बघू.
मीरा : तूच बोललास ना प्रिया आणि मिहिरसोबत लग्न करू म्हणून.
सुमित : अग राणी ते मी तुझी परीक्षा घ्यायला बोलत होतो.
मीरा : मला काही माहिती नाही मी पण येणार.
सुमित : तुझ्या घरच्यांचं काय? त्यांना माहिती पडेल मग ते शोधत येतील आपल्या पर्यंत मुंबईला. मग तू वेगळी मी वेगळा. म्हणून बोलतोय.
मीरा : हे बघ तस पण मी कोणाला सांगितलंच नाही आपल्या दोघांबद्दल. त्यांना कस कळेल.?

सुमित थोडा विचार करतो…

मीरा : आता काय झालं.
सुमित : ठिक आहे मी बघतो काय ते..
मीरा : मला काही माहीत नाही. मी पण मुंबईला येणार.

सुमित हातातल्या मोबाईलवर काही काही नंबर फिरवून फोन कानाला लावतो

सुमित : हॅलो… अजून एक सीट हवी आहे.. आजच्या गाडीची मुंबईची.. हो.. हम्मम.. मग बोलू का ह्या विषयावर… हम्म बाय..

हे बघ मीरा मी तुझं तिकिट पण केलं बुक.
पण तु गाडीत बसताना कोणी बघितलं मग.

मीरा : त्याची काळजी करू नकोस माझं मी येते बरोबर.
सुमित : आणि फोन मधले सगळे मेसेज माझा नंबर डिलिट करून फोन घरीच ठेवून ये. फोन वरून कोणीही आपल्याला ट्रेक करू शकतो.
मीरा : बर..
सुमित : आणि कपडे वैगेरे आणायच्या भानगडीत पडू नकोस.
मला असले कपडे तू घातलेले आवडत नाहीत. मी तुला प्रिया घालते तसे कपडे घेऊन देईल.
मीराला तर हवं तेच सगळं घडत होतं. तिने प्रेमाने एक मिठीच मारली सुमितला.

सुमित : आता जा घरी. आणि ठीक 7 वाजता डेपोत ये. 7676 गाडी नंबर. आम्ही तुला गाडीत भेटू. उगाच कोणी आपल्याला बघेल आणि मग प्रॉब्लेम होईल.
मीरा : ठीक आहे आहे मी जाते.

मीरा घरी येऊन सुमितने सांगितल्याप्रमाणे मेसेज वैगेरे डिलिट करते. एक छोटीशी बेग घेते. त्यात तीचे मोजके कपडे. थोडे घरातले पैसे आणि दागिने भरते. आधी तर ती मोबाईल घ्यायचा विचार नाही करत पण जर आठवण आली तर नंबर पाठ सुद्धा नाही हा विचार करून ती मोबाईल स्विच ऑफ करून पिशवीत लपवते. आई बाबा गावातील लग्नात गेले असतात. आजी आजोबांचं वय झालं. त्यांना काही सुधारत नसत स्वतःच. ती तशीच निघते.

इथे मिहीर, प्रिया आणि सुमित गाडीत तिची वाट बघत असतात.

प्रिया : ती पक्का येणार बोललीन तुला.
सुमित : हो तर..
मिहीर : गाडी आता सुटेल 5 मिनिटात.

तोच एक तोंडाला पूर्ण स्काप गुंडाळून बाई येऊन सुमितच्या बाजूला बसली.
सुमित : ओ हॅलो.. ही सीट बुक आहे.
प्रिया : तुम्ही उठा.
त्या बाईने थोडा स्काप खाली करून तीच तोंड दाखवलं तर ती मीरा.
प्रिया : तू आहे होय…
सुमित : बघ बोललो होतोना ती येणार म्हणून. ह्याला म्हणतात खर प्रेम..
मिहीर : हो का… सुरुवातीला प्रेम करणाऱ्यांना नाव ठेवायचे साहेब तुम्ही..

सुमित केसांवर हात फिरवत मीरा कडे बघत हसतो..

आत्ता गाडी चालू होते. मीरा पूर्ण गाडी सुमितच्या हातात हात घालून डोकं ठेवून झोपते…

गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबेल.. अशी गाडी चालकाने गाडीत सूचना दिली. चौघेही गाडीतुन खाली उतरले. जेवण करू लागले.

तोच सुमितचा फोन वाजतो. तो नंबर बघून थोडं वाकड तोंड करतो आणि फोन कट करतो. पुन्हा फोन वाजतो.

मीरा : उचल की.. कोणाचा आहे फोन.
सुमित : बॉसचा (सुमित मिहीर आणि प्रियाकडे बघत बोलतो)

बॉसचा नाव ऐकताच प्रियाला ठचका लागतो.
मीरा : अग जरा हळू.. ( प्रियाला पाणी देतच बोलते)
सुमित : एक मिनिट ( एवढं बोलून तो थोड बाहेर येतो)
तुला किती वेळ सांगू कामात असताना फोन करू नकोस…
माहिती मला सर्व. आणि हे बघ तुझ्या पैस्याच काम झालय. 2 दिवसात देतो.. ते ही व्याजा सकट..
एवढं बोलुन सुमित फोन कट करतो…

आणि मागे वळणार तोच मीरा त्याच्या मागे..

मीरा : काय झालं असं घाबरलास का..
सुमित : तू अशी अचानक मागे आलीस…
मीरा : खुप वेळ झाला तू आला नाहीस म्हणून ग मीच आली..
सुमित : किती प्रेम करतेस ग… चल गाडीत बसू. चालू होईल गाडी..

इकडे मीराच्या आईने अन्नच सोडलं. सर्व देव तिने पाण्यात ठेवले. रडून रडून तिची अवस्था खूप वाईट झालेली. प्रिया आणि राणीला देखील मीराबद्दल काहीच कल्पना नव्हती. पूर्ण गाव तिला शोधत होते.

मीरा मात्र स्वतःला मिळणाऱ्या स्वार्थात बुडालेली. तिला फक्त सुमितच प्रेम दिसत होतं..

फायनली चौघेही मुंबईला आले. मुंबईला एका मोठ्याशा घरात समोर येऊन टेक्सि थांबली. आजू बाजूला एकही वस्ती नव्हती. मीराने पहिल्यांदाच मुंबई बघितली होती. ती फक्त बघत होती.

सुमितने तिचा हात प्रेमाने पकडून तिला घेऊन दारासमोर उभा राहीला. एका उंच धिप्पाड अश्या माणसाने दरवाजा उघडला.

समोर सुमितला बघताच… क्या भाई तुम आगये… करत त्याला आलिंगन देऊ लागला..

प्रिया : हम लॉग के भी गले लगो यार.

आणि प्रिया देखील त्याला मिठी मारू लागली.. प्रियाला अश्या पद्धतीने त्या माणसाला मिठी मारताना बघून मीरा थोडं वेगळंच वाटलं. मिहीर असताना ही कशी काय कोणालाही अस मिठी मारू शकते.

ये मीरा… मेरी होनेवली बिवी… असे बोलत सुमितने मीराची ओळख करून दिली.

मिहीर देखील टेक्सीच भाडं देऊन तिथे आला. तो देखील वसीम भाई करत त्याला आलिंगन करू लागला.

आता इथेच उभं ठेवणार का भाई आत नाही नेणार.
अरे चला आता चला..
अस बोलून सगळे आत गेले. आतमध्ये जाताच सुमित मीराला एक रुममध्ये घेऊन जातो. आणि तिला फ्रेश होऊन यायला सांगतो. आपण तुला कपडे आणायला बाहेर जाऊयात. अस सांगून तो तिथून निघतो. प्रिया अंघोळ करून बाहेर येते.
ती हॉलमध्ये येऊन बाकीच्यांची वाट बघत बसते. तोच तिला काही तरी कुजबुजण्याचा आवाज येतो..

वो अब अकेली कैसे रहेगी? किसिको तो रुकना होगा उसके पास। ये वाली भी भाग गई तो चारो फसेंगे. वासीम भाई फोन वर बोलत होते.

मीराला थोडं वेगळंच वाटत होतं.. दरवाजा खोलण्याचा आवाज आला तशी बाहेर होलमध्ये येऊन बसली.

तोच प्रिया देखील फ्रेश होऊन बाहेर येते. तीचे कपडे बघून मीरा फक्त बघतच बसते. एकदम शॉर्ट पँट आणि सेन्ड्रो मध्ये दिसणारी मुलगी फक्त तीनदा सिनेमातच बघितलेली.
मीरा : तू एवढे छोटे कपडे पण घालतेस.
प्रिया : हो का ग? तू नाही घालत?,
मीरा : नाही…. म्हणजे गावी अस कोण घालतच नाही..

प्रिया : ये मुंबई हे बोस…. इथे अस असत. ऐकणा मी एक माझं काम करून येते मग बोलू. वसीम भाई चलो आपका हुआ होग तो.
मीरा : कुठे चाललीस..
प्रिया : वसिम भाई एका पार्टीला भेटायला घेऊन जात आहेत.

तोच वसिम भाई येतो. प्रिया आणि वसिम भाई दरवाजा ओढून जातात सुद्धा तोच सुमित येतो.. तू झालीस का फ्रेश… हा बघ नाश्ता आणलाय मी… खाऊन घे आणि आराम कर. दमली असशील..
मी पण घरी जाऊन येतो. आपल्या बद्दल सांगतो आई बाबांना बघू काय बोलतात. आणि हा फोन धर. आठवण आली माझी की फोन कर. माझा फोन आहे. गावी चुकूनही फोन करू नकोस. मी संध्याकाळपर्यंत येतो परत. आणि हो प्रिया येईल थोड्या वेळाने तिच्यासोबत ती सांगेल तसे कपडे घेऊन यर तुझ्या मापाचे. अस बोलून तो ही निघाला. मिहीर देखील बाहेर कुठे तरी गेलेले. आता घरात मीरा एकटीच.

वसिम भाई फोनवर बोलतानाचे शब्द तिला आठवत होते. नक्की आपण बरोबर वागलो ना. का काही चूक केलं नाही म्हणून तीच मन तिलाच खत होत. आणि प्रिया सांगेल तसे कपडे मी का घेऊ. मला पण माझी आवड कळते. तिला काही सुधारत नव्हतं. ती वर रूममध्ये गेली आणि झोपायचं प्रयत्न करत होती पण तिला झोप अशी येत नव्हती. ती पूर्ण घर बघून घेऊ काही तरी नक्कीच भेटेल. तोच एक रुम बंद दिसली तिला. तिने लेच फिरवलं तशी रूम उघडली. सर्व भिंतीभर तिला मुलींचे अश्लील फोटो त्यांचे नंबर वैगेरे दिसले. ती ते बघून थोडी घाबरली..

प्रियाच वागणं देखील तिला फारस पटत नव्हतं. तीने तशीच ती रूम बंद करून स्वतःच्या रूममध्ये येऊन बसली. वसिम भाईचे शब्द कानावर पडत होते. सुमितही काल फोन वर काही तरी पैश्याच बोलत होता. तिला आता भीती वाटत होती. पण सुमितच प्रेम तिला त्याच्या डोळ्यात दिसत होतं. तो अस का करेल. टिव्हीला दाखवतात तसा तर नसेल. ती एकटीच आता बोलू लागली. तिने कोणी नाही हे बघून मोबाईल काढला बाहेर. स्विच ऑन केला. तिला खूप सारी जण फोन करत असल्याचे मेसेज आलेले.

तिने लागलीच राणीला फोन लावला.

राणी : अग मीरे तू आहेस कुठं… किती शोधायचं तुला.
मीरा : अग मुंबईला हाय मी..
राणी : मुंबईला का गेलीस..
मीरा : अग हळू बोल कोणी तरी ऐकेलं तिथे.. कुणाला सांगू नकोस.. मी सुमितशी लग्न करणार आहे. माझं प्रेम आहे त्यावर आणि त्याच पण माझ्यावर.
राणी : अग तो सुमित फसवा आहे…. गावात काय करून गेलाय तुला माहीत नाही. पोलीस शोधतायत त्याला.
मीरा : काय पण काय बोलतोस तू..
राणी : अग खर तेच बोलतेय मी.. बबण्याचं पूर्ण घर लुटून नेलं. पूर्ण घरतल्याना गुंगीच औषध देऊन.
मीरा : खर बोलतीस का तू.
राणी : अग हो मीरे तू बाहेर निघ त्यातून
मीरा : आता मी काय करू. मुंबईत माझ्या कोण ओळखीचं पण नाही. काय करू राणी मी.
राणी : अग पोलिसांना फोन कर.
मीरा : अग पोलिस पण ह्याच्या ओळखीचे निघाले मग.
राणी : अग पण तू अस वेड्यासारखी वागलीसच कशी?

मीरा आता रडू लागली…
राणी : हे बघ मीरे रडू नगस.. माझ्याकडे शिवचा नंबर आहे मी तुला देते तू त्याला फोन कर तो मुंबईतच आहे.
मीरा : हा कर लवकर…
राणीने लगेच मीराला नंबर पाठवला.
मिराने नंबर मिळताच शिवला लावला. पण इथे शिव परिघाशी बोलण्यात गुंग होता.

तोच कोणी तरी दरवाजा खोलत असल्याचा आवाज आला. मीराने फोन कट करून स्विच ऑफ केला. आणि बेडवर झोपायचं नाटक करून झोपली.

प्रिया : मीरा ए मीरा करत बेडजवळ आली.

मीरा थोडस झोपेत असल्याचं नाटक करतच उठली…

मीरा : काय झालं ग.. झोपू तरी दे..

प्रिया : अग सुमितचा फोन होता. तुला कपडे घ्याचेतना. चल दुकान झाली असतील उघडी.

हीच संधी आहे आता.. प्रियाला इथून पळून जायची.

प्रिया : अग काय बोलते मी. जाऊया का??
मीरा : हो चल तू हो पुढे मी थोडं तैयार होऊन येते.
प्रिया : ओके मी आहे बाहेर ये लवकर..

मीराने प्रिया बाहेर जाताच स्वतःच सोबत आणलेली पिशवी घेतली व त्यात मोबाईल घेतला. सुमित ने दिलेला मोबाईल तिने घरीच ठेवला.

मीरा : चल निघुयात..?
प्रिया : तू पिशवी का घेतली तुझी..?
मीरा : अग पैसे आहेत त्यात. कपडे घ्यायला लागतील की.
प्रिया : बर चल. (माझ्याजवळचे वाचतील तेवढे प्रिया स्वतःशीच बोलली)
स्वतः जवळ असलेला स्काप प्रियाने तोंडा भोवती गुंडाळला. बाहेर खूप धूळ आहे असे बोलत मीराला देखील तिने स्काप गुंडालायला सांगितलं.

दोघीही मॉलमध्ये गेले. मीरा आता फक्त इथून पाळायची संधी बघत होती. तोच प्रियाचा फोन वाजला. तू बघ तुला काय आवडत ते. मी आलीच फोनवर बोलुन. प्रिया फोनवर बोलते हे बघत मीरा तिथून पळाली. मीराला कळत नव्हतं ती कशी पळते कुठे जाते. डोळ्यांतून फक्त अश्रू येत होते. देवा मला वाचव ह्यातून म्हणून ती देवाला हाका घालत होती. तोच तिला आठवलं तिने राणीकडून शिवचा नंबर घेतलाय.

त्याला फोन लावला..
शिव : हॅलो..
मीरा : शिव मला वाचव… मी तुझ्या पाया पडते.. मला मदत कर.
शिव : मीरा आहेस कुठं तू..
मीरा : तू आत्ताच्या आता इथे ये शिव.
शिव : अग पण मी मुंबईला आहे. अस लगेच कस येऊ..
मीरा : मी पण मुंबईलाच आहे.
शिव : काय?? कुठे???
मीरा तिथेच जाणाऱ्या एक माणसाला विचारते ती कुठे आहे आणि शिव ला सांगते..
शिव : मी आलो तू तिथेच थांब…

जवळ जवळ अर्ध्या एक तासाने शिव तिथे येतो. त्याला बघताच मीरा त्याला मिठी मारून रडू लागते. ती खूप घाबरली असते. शिव तिला शांत करतो..

घडलेला सगळं प्रसंग मीरा त्याला सांगते..

शिव फक्त तिच्याकडे बघत बसतो….
शिव : आता तुझी स्वप्न झाली पूर्ण.. बघितलना मुंबई कशी आहे ते? सोड मी पण कुणाला सांगतोय. माझं घर आहे इथेच तू तिथे रहा. संध्याकाळी गाडी आहे तुला सोडतो मी घरी..
मीरा : शिव मला माफ करना.
शिव : माझी का माफी मागतेस. आई बाबांची मग तुझ्या.

शिवने गावी फोन करून सांगितलं की मीरा त्याला भेटली आहे. तो तिला घेऊन येतो. गावी सगळ्यांना ऐकून बर वाटल.

संध्याकाळची गाडी होती. मीरा शिवच्या बाजूला बसलेली.
पण अपराधी भावना तिच्या डोळ्यात दिसत होती.
खिडकतुन मागे जाणारी मुंबई ती डोळ्यांत साठवून ठेवून होती.

आज ती शिव वर खऱ्या अर्थाने प्रेम करू लागलेली पण शिवला तिच्या वागण्याच्या तिरस्कार होत होता.

थोड्या वेळाने गाडी जेवणासाठी थांबली. दोघेही खाली उतरले. शिवने जेवण मागवले. तोच परिघाचा फोन शिवला आला.

शिव जागेवरून न उठताच मीराच्या पुढ्यातच बोलत होता..

परिघा : जेवलास का शिव.
शिव : हो ग राणी आत्ताच जेवायला आलोय. आणि तू.
परिघा : मी पण जेवली. आणि मीरा? आहेना ती बरी.
शिव : आहे ती सोबतच आहे. बरी आहे..

शिव एवढ्या प्रेमाने कोणाशी बोलतो म्हणून ती देखील आता त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागली. शिवने फोन ठेवताच मीरा त्याला विचारू लागली.. कोणाचा फोन होता?
शिव : होता कोणाचा तरी. तुझं झालं असेल तर निघुयात.

शिव पहिल्यांदाच तिच्याशी अस तुटक बोलला होता.

गाडी चालू झाली. शिवला गार हवेवर खूप छान झोप लागली. मीरा काचेत दिसणार त्याच प्रतिबिंब न्याहाळत बसली होती. एवढ्या वर्षात तिला पहिल्यांदाच शिव खुओ सुंदर दिसत होता.

दोघेही गावी पोहचले. मीरा दारात जाताच आईने दोन कानाखाली मारल्या तिच्या. पण शेवटी आईच प्रेम. दोघीही मायलेकी रडू लागल्या.

गावात मीराची बदनामी होऊ नये म्हणून शिवनेच सांगितलं की, मीराला प्रसादमध्ये गुंगीच औषध देऊन त्या लोकांनी तिला पळवून नेलं.. म्हणून मीरा गावात पूर्वीसारखं तोंडवर करून जगत होती.

शिवने आपल्यासाठी खूप काही केलं. तो अजून आपल्यावर किती प्रेम करतो हा मीराचा समज झाला असतो. पण त्यादिवशी हा राणीशी बोलत होता. तिला विचारावच लागेल. म्हणून ती राणीला विचारायला गेली.

राणी : तुला वेड लागलं आहे का.? त्याच लग्न जमलंय त्या परिशी. तो माझ्या का प्रेमात पडल. काही तरी गैरसमज झालाय तुझा.
मीरा : काय??? तो अस कस करु शकतो. माझ्यावर प्रेम व्हत ना त्याच मग आता???
राणी : प्रेम व्हत. पण तुझं नव्हतं ना त्याच्यावर प्रेम. आता तो करतोय लग्न तर करू दे की त्याला.. एवढा पराक्रम करून तु त्याच्याकडून अपेक्षा ठेवतेस.
मीरा : शिव माझा आहे फक्त मला माहिती तो माझ्यासाठी हे लग्न पण मोडेल. बघच तु.

मीरा घातलेली वेणी मागे टाकत राणीला बोलते. आणि पुढे जाऊ लागते.
राणी : अग मीरे ऐक तरी.

मीरा न ऐकताच तशीच पुढे निघाली. ती थेट शिवच्या मेडिकलशॉपमध्ये जाते. तिथे शिव कसला तरी हिशोब घेत बसलेला असतो. मीरा जाऊन त्याच्या पुढ्यात उभी राहते.

शिव : काय ग काय झालं?
मीरा : तुझं माझ्यावर प्रेम हाय की न्हाय. तेवढं सांग.
शिव : माझं तुझ्यावर प्रेम होतं पण आता न्हाय.
मीरा : का ती भवानी भेटली तेव्हा आता माझा विसर पडला का??
शिव : तोंड सांभाळून बोलायचं.. बायको आहे माझी ती.
मीरा : होणारी..
शिव : तुझ तर प्रेम नाही ना माझ्यावर मगक का आलीस इथे.
मीरा : तेच सांगायला आली होती. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायच आहे.
शिव : आता शक्य नाही मीरा.. मी तुझ्यावर प्रेम करत होतो. पण आता नाही. माझं फक्त आणि फक्त परी वर प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम करून फक्त अपमानच सहन केलाय.
मीरा : तेव्हा मला नाही कळलं तुझं प्रेम. मला माफ कर.
शिव : उशीर झालाय मीरा.
मीरा : मी बघतच तू कस लग्न करतोस तिच्याशी ते..
शिव : हम्मम, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मीरा.
मीरा : अजून काय बोलू मग मी.? मला तू हवा आहेस.मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.
शिव : हेच तू मुंबईला पळून जाण्याच्या आधी बोलायला हवं होतंस. आणि आता वेळ निघून गेली.

तोच पाटलाच्या मोठ्या मुलाने मीरा आणि शिवला लांबूनच एकत्र बोलताना पाहिलं. मीरा का रडत आहे शिवसमोर. नक्कीच काही तरी भानगड आहे म्हणून तो तिथे जाणार पन मध्येच तो थांबला. ह्याला विचारून हा खर सांगेल कश्यावरून. त्यापेक्षा मीराला विचारू नक्की काय झालं ते म्हणून त्याने मीरालाच विचारायचं ठरवलं.

( आता पुढे मीरा त्याला काय सांगेल हे पुढच्या भागात नक्की वाचा)

क्रमशः

 

Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा