मीलती है जहाँ खुशीयाँ परीयो के भेस में…..

Written by

किती वेळ काम करणार आहेस अजून?  …..तुला आठवतय ना की आपलं लग्न आहे परवा?….. आशीष चं हे फोनवरचं प्रेमाचं भांडण ऎकून अमीता गोड हसली आणि त्याला म्हणाली हो रे….,मला आठवतय सगळं ! तू असं कसं विचारतोएस? आणि आता चल काम करू दे मला ,आपण बोलू नंतर म्हणत तिने फोन ठेवला. आणि ती नकळत भुतकाळात गेली.

   अमीता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर होती. दोन दिवसावर तिचं लग्न आलं होतं पण कंपनीत कामाचा खुपच लोड खुप होता म्हणून “काही महत्वाची कामं,  आज करून जा” म्हणून तीच्या सरांनी तीला रिक्वेस्ट केली होती अाणि म्हणूनच ती राहिलेली कामं पटापटा पूर्ण करण्याच्या मार्गावर होती.

अाशीष हा अमीता चा बालमित्र होता. मधे काही वर्ष तो परदेशात राहून आला होता. काॅलेजपासूनच त्याने अमीताला लग्नाची मागणी घातली होती पण अमीता लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम होती ……आणि त्याला कारणही खुप मोठं होतं.

वयाची पस्तीशी ओलांडलेल्या ह्या अमीताने अजूनही लग्न केलं नव्हतं पण तरीही एका मुलीची ती आई होती. 

सुमारे बारा वर्षापूर्वी तिनं एका कंपनीत कामाला सुरूवात केली होती आणि एक दिवस रोजच्याप्रमाणे संध्याकाळी घरी येताना अचानक रस्त्यावर तीला खुप गर्दी दिसली. काय झालय बघायला म्हणून तिने तिची स्कूटर साईडला केली आणि ती त्या गर्दीजवळ गेली गर्दीच्या त्या मधोमध ” एक वर्षभराची, शेंबुड आणि अश्रू एक होऊन मातीने माखलेली मुलगी जोरजोरात रडत होती. कोणीतरी तीला तिथे सोडून गेलं होतं, कोणालातरी ती नको होती. रांगत-रांगत ती रस्त्याच्या मधोमध येऊन गांगरून रडत होती”. अचानक तीथे आलेल्या अमिताशी तीची नजरानजर झाली आणि कसं कुणास ठाऊक तीचं रडणं बंद झालं. त्याचक्षणी अमिताला भरून आलं आणि तिने तिची कसलीच किळस न करता लगेच तीला मिठीत घेतलं आणि ती रडू लागली. तिच्याशी बोलणं अमिताला जमत नव्हतं तीचं मन त्यावेळी भरून आलं होतं. शब्दांनी आता स्पर्शाची जागा घेतली होती आणि त्या स्पर्शात “मी आहे ग् ” म्हणत नकळत त्या चिमुरडीला तीची साथ केली होती.

अमीताच्या स्त्री मधली एक अाई जागृत झाली होती आणि म्हणूनच तिने कसलाही विचार न करता तीला घरी आणलं होतं.

समाजसेवीका मैत्रीणी आणि पोलिसांच्या मदतीने तिचे खरे आई-वडील शोधण्यात आले पण त्यांचा शोध लागला नाही पण तोपर्यंत ईथे मात्र अमीता आणि त्या चिमुकलीत अनामिक प्रेम जुळलं होतं म्हणूनच समाजाला झुगारून तिने त्या जीवाला वाढवण्याचा निर्णय घेतला. नंतर पुढे जाऊन तिने तीला कायदेशीर दत्तकही घेतलं. आणि तिला एक नवीन नाव दिलं “खुशी”….

आपल्या अविवाहित मुलीने असा निर्णय घेणं घरच्यांना रुचलं नाही. “लग्न कर मग, तिला नंतर दत्तक घे…. तोपर्यंत आम्ही हिला सांभाळतो” असं म्हणूनही अमीता तिच्या निर्णायावर ठाम होती आणि तिने आता लग्न न करण्याचा निर्णयही घेतला कारण अाता तीला “बायको  बनून नाही तर फक्त एक आई ” म्हणूनच जगायचं होतं.

खुशी वाढत गेली तशी अमीता आईच्या नात्याने अधीक सक्षम बनत गेली.

आशीषनेही ह्या कामात अमीताची खुप मदत केली…. जिथे आई वडिलांनी तीच्या दत्तक लेकीला नाकारलं होतं तिथे आशीष मात्र तिच्या लेकीचाही मित्र बनला होता.

खुशी अगदी आनंदाने वाढत होती आणि अमीता तीच्या खुशीत स्वतः ला खुश करत होती. पण आशीष ने मात्र अजूनही स्वतः चा लग्नाचा निर्णय ठाम ठेवला होता. आणि तो सतत अमीताला ह्या विषयी विचारत होता.

आता ‘खुशी तेरा’ अाणि ‘अमीता पस्तीशीत’ आली होती. आई – मुलीच्या ह्या नात्याने आता मैत्रीची जागा घेतली होती. खुशीला सुख आणि दु:खाची जाणीव होऊ लागली होती म्हणूनच आपल्या आईलाही तीच्या वाट्याचं प्रेम मिळावं म्हणून खुशीने अमीताला लग्नासाठी गळ घातली आणि ह्याच नवीन मैत्रीखातर अमीताही आशीष शी लग्नाला तयार झाली.

बापरे! खुपच उशीर झाला म्हणत अमीता तेरा वर्षाच्या भुतकाळातून बाहेर आली आणी काम संपवून घरी यायला निघाली.

तिच्या मनात आनंदाचं वातावरण होतं. खुशीला ‘बाबा’ आणि तिला तिचं ‘हक्काचं माणूस’ मिळणार होतं, आणि अजून सुखाचे चार क्षणही अमिताच्या वाट्याला येणार होते.

पण एकाएकी हे काय झालं.

तिच्या गाडीजवळ एवढ्या रात्रीही कोणीतरी तिचीच वाट पहात होतं. शिकारी सावज साठी तयार होतं पण शिकार मात्र गाफील होतं.आणि म्हणूनच तिचा पिछा करत (शिकारीचा) सुनसान रस्त्यावर त्या तिघांनी तिला गाठलं.

“तीला फरफटतच ओढून अजुनच सुनसान रस्त्यात नेत, तिला एकेकानं कुस्करायला सुरूवात केली….. ती रडली….. तिनं भीकही मागीतली पण त्या नराधमांनी तिला कुस्करत फाडलं आणि मन भरेस्तोवर तिच्या शरीराच्या चिंध्या केल्या अाणि तोंड उघडलं तर घरच्यांना मारायची धमकी देऊन त्या नराधमांनी तिला कचरा फेकल्यागत फेकलं आणि स्वर्गीय आनंद मिळवत ते पळून गेले”.

कंटीन्यू होणारा रक्तस्त्राव आणि शरीराच्या तोडलेल्या लचक्यांनी फरफटत अमीताने तीच्या गाडीपाशी येऊन आशीषला फोन केला.

थोड्याच वेळात आशीष आणि पोलिस सोबतच आले …….अमीताला हाॅस्पीटलला अॅडमीट करण्यात आलं. ट्रीटमेंट सुरू झाली आणि सोबत आशीष आणि पोलिसांच्या प्रश्नांची सरबत्तीही सुरू झाली. ट्रिटमेंटमुळे पूर्ण भानावर येत एकीकडे अमीता लाचार पणे आशीषच्या प्रश्नांना ऎकत होती आणि दुसरीकडे त्या हाॅस्पीटलच्या रुमच्या दरवाज्याकडे कुठल्यातरी आशेने पहात होती.

अाणि तेवढयात अमीताचे डोळे चमकले आणि तीथे तीची ‘खुशी ‘आली.

खुशीने तिथून सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. सगळे निघून गेले, आशीषही त्या सगळ्यातच होता….. हेच खुप दुखदाई होतं अमीता आणि खुशीसाठीसुध्दा ……

आता ती आणि तीची आईच तेथे उरले होते. अमीता काहीतरी बोलणार तेवढ्यात खुशीने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला थांबवलं. अमीताला पाणी देत खुशीने तिला ‘मिठीत’ घेतलं. गुड टच- बॅड टच आठवत तिला समजलं होतं की आपल्या आईबरोबर खुप बॅड झालं आहे अाणि तीला आता फक्त आपल्या आधाराची गरज अाहे प्रश्न -उत्तरांची नव्हे.

खुशीनं न बोलता अमीताला कुरवाळायला सुरूवात केली. तेरा वर्षापूर्वी ” अविवाहीत अमीता तीची आई झाली होती आणि आज तीची तीच लेक तीची माय बनली होती”. 

“आयुष्याच्या ह्याच दोन वेळा होत्या ज्यावेळी प्रश्न नको होते फक्त साथ हवी होती. तेरा वर्षापूर्वी अमीताने साथ दिली अाणि अाज तिची तेरा वर्षाची खुशी तीला साथ द्यायला सक्षम बनली होती”.

खुशीने अमिताला कुरवाळत तीचं अावडतं गाणं गुणगुणायला सुरूवात केली.

“अा लेके चलू तुझको एक ऎसे देस में…….

मीलती है जहाँ खुशीयाँ परीयोंके भेस में “…..

“नकळत दोघींच्या डोळ्यातून मायेचे अश्रू बरसू लागले….. गाण्याचा सुर वाढत गेला आणि खुशीची ,अमीतासाठीची मिठी अजूनच घट्ट होत गेली”.

©Sunita Choudhari 

( मित्र -मैत्रीणींनो नमस्कार , नकळत जर माझ्यासारखंच,  ही कथा वाचताना तुमच्याही डोळ्यांत अश्रू आले असतील तर मला माफ करा……….. असते हो ! अशीही एक वेळ असते जेंव्हा प्रश्न खरच नको असतात तीथे फक्त साथ हवी असते. तुम्हालाही हेच वाटतय ना? …..मग तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे आवर्जून सांगाल हा?….)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा