मी असेन तशी मला स्वीकार…

Written by

प्रशांत अमेरिकेत नोकरीला, घरच्यांचा संगण्यानुसार एका खेडूत मुलीशी लग्न केलं..त्यालाही ती आवडली होती…साधी पण तितकीच सुंदर…सालस, समजदार…
लग्नानंतर राहणीमान बदलेल असं त्याला वाटलेलं…पण कविता मध्ये फार काही बदल झाला नव्हता. प्रशांत चे मित्र तोकडे कपडे घातलेल्या आपल्या बायकांना मिरवत,प्रशांत ला हेवा वाटे..पण कविता जास्तीत जास्त भारीतला पंजाबि ड्रेस घाली..नाहीतर साडी…
प्रशांत च्या या रोजच्या बोलण्याने कविता ला वाईट वाटे.. पण आपली परंपरा, सवय सोडायला काही ती धजावत नसे…

तोकडे कपडे घालायला तिला अजिबात आवडत नसे…

प्रशांत आता खूप चिडला होता…
“कविता तुला नीट राहता येत नसेल तर निघून जा तुझ्या घरी, मला असली गावंढळ बायको म्हणवून घ्यायला लाज वाटते….”
कविता त्या दिवशी खूप रडली…तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला..
“हे बघा प्रशांत, मी जरी गावातून आलेली असली तरी माझी काही तत्त्व आहेत, माझ्या राहणीमानावर भाष्य करणं म्हणजे माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर तू घाला घालतोय…या देशात व्यक्तीस्वातंत्र्याला एवढं महत्व असून सुद्धा तू असं बोलशील हे मला अपेक्षित नव्हतं…”
असं म्हणत कविता ने घर सोडलं… पण जाणार कुठे? भारतात यायला तिच्याकडे पैसेही नव्हते…रस्त्यावर एका ठिकाणी बाकावर रडत बसलेल्या कविता ला एका अमेरिकन स्त्री ने पाहिलं…तिने आपुलकीने विचारपूस केली, कविता ला आपल्या घरी नेलं…कविता ला इंग्रजी बऱ्यापैकी जमत होतं… लिसा च्या घरी सर्व घरकाम आणि तिच्या मुलांना सांभाळायच्या अटीवर कविता ने तिच्या घरी जाणं मान्य केलं…
कविता लिसा कडे राहू लागली, लिसा तिचा नवरा जॉन आणि आपली 2 मुलं अशी राहत होती…कविता ने घर आणि मुलं सांभाळायची तयारी दाखवल्यावर लिसा ला आधार वाटला…
कविता ने आपली संस्कृती जपत लिसा च्या मुलांवर संस्कार केले, त्यांना इंग्रजी प्रेयर सोबत संस्कृत श्लोक शिकवले…कविता जी साडी नेसायची ती लिसा ला फार आवडे, तिने कविता कडून ती शिकून घेतली आणि बऱ्याचदा साडी नेसून लिसा बाहेर जाई… लिसा साडीत खूप सुंदर दिसे…लिसा च्या मैत्रिणी कविता कडे साडी नेसायची शिकायला यायच्या…कविता ने लिसा च्या घरात येशु च्या फोटो जवळ तिच्या देवासाठीही जागा मागितली, कविता रोज न चुकता देवपूजा करी..लिसा च्या मुलांना कविता चा लळा लागलेला…तीही तोडकी मोडकी श्लोक शिकली…कविता दारापुढे रोज रांगोळी काढत असे, शेजाऱ्यांना इतकी छान कला पाहून खूप अप्रूप वाटे…लिसा वेळेअभावी बाहेरचं खाणं मागवायची, कविता ने हे चांगलं नाही सांगत घरी स्वयंपाक करायला घेतला..अमेरिकन पद्धती नुसार त्यांचं जेवण ती बनवायची आणि सोबतच भारतीय स्वाद त्यात आणायची..कविता ने घरी बनवलेल्या जेवणामुळे लिसा च्या घरात सर्वांचं आरोग्य चांगलंच सुधारलं होतं… लिसा आणि तिच्या मुलांना आता कविता शिवाय पानही हलत नसे…
एकदा लिसा आणि तिच्या नवऱ्याला 2 दिवसासाठी बाहेर जायचं होतं, मुलांना कविता च्या भरवशावर सोडून अगदी बिनधास्त ते दोघे गेले..मुलांनाही आता लिसा पेक्षा कविता जास्त लागत होती…
एकदा मुलांनी शाळेतून सूचना आणली, की उद्या शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे..खरं तर ही सूचना आठवडाभर आधीच दिलेली पण मुलांना आत्ता आठवलं…
आता कविता पुढे प्रश्न पडला, लिसा घरी नसताना या मुलांना फॅन्सी ड्रेस मध्ये काय म्हणून शाळेत पाठवावं?? कविता ने विचार केला, आणि तिने मुलीला झाशीची राणी आणि मुलाला गाडगेबाबा चा वेष करून दिला…सोबतच काय वाक्य म्हणायची आणि त्याचं इंग्रजीत भाषांतरही बोलायला सांगितलं…
दुसऱ्या दिवशी शाळेत स्पर्धा आटोपली, शाळेत कोणी पॉपकॉर्न चा वेष, कोणी स्पायडरमॅन चा तर कोणी पॉकेमन चा वेष करून आलेलं… पण थोर पुरुषांचा वेष करून आणत एक संदेश देणाऱ्या लिसा च्या मुलांचे सादरीकरण शाळेला खूप भावलं..त्यांनी या दोघांना पारितोषिक दिलं….
दोघेही ट्रॉफी घेऊन आनंदाने घरी आली….

लिसा ला घरी आल्यावर हे समजलं तेव्हा तिने कविता ला मिठीच मारली…पहिल्यांदा तिच्या मुलांना काहीतरी बक्षीस मिळालेलं…
कविता च्या हाताला चव होती, लिसा आता भारतीय खाणं आवडीने खायची…कविता पण अमेरिकन खाणं शिकून चांगलं बनवायची…
लिसा च्या मैत्रिणींनी कविता च्या हातचं खाल्लं आणि त्या वेड्याच झाल्या…त्यांना ऑफिस ला जायला डबा बनवायला वेळ नसायचा.. कविता डबा पुरवेल का अशी चौकशी त्यांनी केली..
लिसा ने कविता ला याबद्दल सांगितले, आणि तू सुरवात कर, माझा पाठिंबा आहे अशी लिसा ने तयारी दर्शवली…आता कविता चा उद्योग सुरू झाला…. ती डबे पुरवू लागली, तिच्या डब्याचे कौतुक होत गेले…मागणी वाढत गेली…2 डब्यांवर सुरू केलेला व्यवसाय आता 20 डब्यांवर गेला..मागणी वाढतच गेली.. लिसा च्या नवऱ्याने कविता ला हा व्यवसाय वाढवायला सांगितला.  
भरपूर पैसे मिळू लागला, लिसा नको म्हणत असतांना कविता तिच्या हातात डब्याचे आलेले पैसे टेकवत असे .. आता हा पैसा खूप येऊ लागला…लिसा ला खूप आर्थिक मदत झाली…
अमेरिकेत कविता फूड हे ब्रँड आता बनलं… कविता ने हाताखाली बायका लावल्या ..आता याची खबर एका वृत्तपत्राने घेतली…
प्रशांत ने ती वाचली, तो अवाक झाला…त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो कविता ला शोधायला गेला…
दार उघडताच प्रशांत ला पाहता कविता चक्रावली…प्रशांत तिची माफी मागू लागला…

तिला सोबत न्यायला आला…
कविता ला नेणार हे पाहून लिसा आणि मुलं ढसाढसा रडू लागली…त्यांचा कविता मध्ये जीव अडकला होता…कवितालाही इच्छा नव्हती पण संसार शेवटी करायचाच होता..
कविता निघाली तशी लिसा आणि मुलं तिच्या मागे बॅग घेऊन निघाली…कविता च्या घराशेजारचाच घर घेऊन ती राहू लागली…
कविता ला पाहून प्रशांत ला रडू आलं. 

“किती त्रास दिला मी तुला…विचारही केला नाही की या परक्या देशात तू एकटी कुठे जाशील…पण जेव्हा बाहेर पडून तू स्वतःची ओळख बनवली तेव्हा लक्षात आलं की बाह्यरुप आणि राहणीमानापेक्षा आंतरिक गुण महत्वाचे… तुझं कौतुक लिसा च्या मुलांच्या शाळेत झालं, तिथे माझ्या मित्रांचीही मुलं होती…तुझं कौतुक माझ्याकडे करायची पण मी कोणत्या तोंडाने त्यांना सांगू शकत होतो की मी कविता ला बाहेर काढलं म्हणून?? कंपनीत एकाने डबा आणलेला, त्याची चव मी ओळखली, अशी चव फक्त कविता च्या हाताला आहे…तिथून मी तुझी माहिती काढली…कविता मला शिक्षा दे…मी खूप चुकलोय…
कविता ने त्याला मिठी मारली आणि झालं गेलं सोडून नव्याने जीवन जगायचं त्यांनी स्वीकारलं..…

लिसा च्या मुलांना प्रशांत चा भारी राग…हाच माणूस आमच्या कविता ला घेऊन गेला म्हणून अजूनही ती मुलं प्रशांत कडे खुन्नस नेच बघत…..कशी वाटली कथा जरूर कळवा….
लेख कसा वाटला जरूर कळवा आणि असेच लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला जरूर लाईक करा

https://m.facebook.com/irablogs


Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा