मी आई आहे, त्यागमूर्ति नाही.

Written by

साधना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. बराच वेळ होऊनही शुद्धीवर येत नव्हती. घरच्यांनी तातडीने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळाले अशक्तपणामुळे चक्कर आली आणि शरिरात अजिबातच ताकद नसल्याने अॅडमिट करावे लागणार होते.
साधना काळजीत होती कारण दुसऱ्या दिवशीपासून मुलाची परीक्षा होती. परंतु कीर्तीने मुलाचा अभ्यास घेईल असे आश्वासन दिले आणि साधणाची काळजी थोडी कमी झाली.

साधना आणि कीर्ती दोघी चुलत जावा. दोघीही प्रेमळ आपल्या मुलांवर,कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या. दोघींनाही ५वर्षाची मुले. साधनाचा प्रकुल आणि कीर्तीचा स्वयम. आणि घरही शेजारीच. परंतु साधना म्हणजे सर्वांच्या नजरेत एक उत्कृष्ट आई होती. आणि कीर्ती निष्काळजी आई.
 साधना म्हणजे त्यागाचं दुसरं रूपच. मुलाला, घरच्यांना प्रत्तेक गोष्ट हातात देणे. मुलाला अंघोळ घालणे ,जेवू घालणे, कपडे घालणे, शाळेची बॅग भरणे, टिफिन बॅगमध्ये ठेवणे, मुलांचं साहित्य स्वत: गाडीपर्यंत नेऊन देणे, शाळेतून आल्यावर त्याचा सर्व आवरणे ,शूज स्वतःच्या हाताने काढणे, मुलगा जेवल्याशिवाय स्वतः न जेवणे. घरामध्ये काही पदार्थ मागवल्यावर स्वत:चा पदार्थही मुलाला देणे. त्यामुळे घरातील व शेजारी साधनाचं खूप कौतुक करत. आणि घरच्यांनाही सर्व काही जागेवर मिळत असल्यामुळे साधना सर्वांची लाडकी होती.
कीर्ती सुद्धा मुलांची घरच्यांची खूप काळजी घ्यायची. परंतु तिचं म्हणणं होतं की कोणताही व्यक्ती असो जेवढे शक्य आहे तेवढे स्वतःचं काम स्वतः नेच करावं. त्यामुळे कीर्तीने स्वयम ला स्वत:ची काम स्वताच करायला शिकवलं होतं. स्वयम सुद्धा अभ्यास झाल्यावर रात्रीच आपली बॅग स्वतः भरून ठेवत असे. स्वतःच्या हाताने जेवण करे, जेवढ जमत असेल तेवढ स्वतः आवरणे, त्याचबरोबर तो कीर्तीला ही थोडीफार मदत करत असे. खेळून झाल्यावर खेळणे भरून ठेवणे , जेवण झालं की सांडलेलं स्वतः भरून झाडून घेणे.
त्यामुळे घरातले व शेजारी नेहमी कीर्तीला बोलत असत.
एकदा शेजारच्या काकू कीर्तीला म्हणाल्या सुद्धा होत्या.
” अगं ,काय हे एवढस लेकरू आणि त्याला काम सांगतेस,  जरा जावे कडून शिक काही तरी “
परंतु त्यांना समजावण्यात काही अर्थ नाही म्हणून कीर्तीने दुर्लक्ष केलं.
असेच एक दिवस मुलं अभ्यास करून कंटाळली होती. त्यामुळे किर्तीच्या सासऱ्यांनी त्यांना बाहेर घेऊन जाण्याचं ठरवलं. मुलेही खूश झाली. आणि ते मुलांना बाहेर घेऊन गेले जाताना सांगून गेले की आम्ही बाहेरूनच काहीतरी खाऊन येऊ.
बराच वेळ झाला सर्वांची जेवणं आटोपली.परंतु साधना उपाशीच. प्रकुल शिवाय जेवणं तिला शक्य होत नव्हतं .ती सारखी मुलांची वाट पाहत दारात चकरा मारत होती. किर्तीने बघितलं आणि तिला समजावलं अगं येणार आहेत बाहेर जेवन करुन तु का काळजी करत बसतेस तु घे खाऊन. परंतु साधना ऐकायलाच तयार नाही.  बऱयाच वेळाने मुलं बाहेरच खाऊन आली. प्रकुल झोपला. आणि खूप उशीर झाला असल्यामुळे साधनाने जेवण करायचं टाळलं.

दुसरा दिवसही असाच कामात गेला. तिने जेवढ हातात आलं तेवढच काही दोन घास पोटात घातले होते. आणि दुसऱ्या दिवशीपासून मुलांची परीक्षा त्यामुळे साधनाला टेन्शन आलं होतं. आणि बरेच दिवस अशीच खाण्याची टंगळमंगळ चालू असल्याने तिला अचानक चक्कर आली होती.
साधना हॉस्पिटलमध्ये आणि घरी किर्ती मुलांचा व्यवस्थित अभ्यास घेत होती. पण आई आजारी असल्यामुळे प्रकुलही नाराज होता. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी किर्ती किंवा आजीची मदत लागत होती. परंतु स्वयम सर्व काही स्वत: करत होता. घरातील सर्वांच्या हे लक्ष्यात आलं होतं.
काही दिवसांनी साधना घरी येते. मुलांची ही परीक्षा संपते.
सर्वांचा एकत्र जेवण करण्याचा बेत ठरतो. आणि साधना सर्वांसमोर  किर्तीचे आभार मानते. साधनाला आत्तापर्यंत काळालं होतं की आपण मुलाला प्रेमापोटी किती परावलंबी करून ठेवलं आहे.
ती कीर्तीला म्हणते –
“कीर्ती ,तुझं बरोबर आहे मुलांना परावलंबी बनविण्यापेक्षा स्वावलंबी बनवावं म्हणजे ते निदान त्यांची काम स्वतः करू शकतील .
आणि घरच्यांनाही हे पटलं होतं .

किर्ती-  “मग त्यात काय, प्रकुल ही माझा मुलगा च आहे की. आणि आपण आई आहोत त्यागमूर्ती नाही ना गं. का प्रत्येक वेळेस आईने किंवा स्रीने त्यागच करावा म्हणजे ती श्रेष्ठ होते.? त्यापेक्षा स्वतः खावं-प्यावं , आपण तंदुरुस्त असू तर आपलं कुटुंब तंदुरुस्त राहील ना. काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. आणि मुलांनाही आपण आयुष्यभर तर नाही पुरणार ना. मुलांना परावलंबी करून अधू करण्यापेक्षा स्वावलंबी बनवा आणि तसं श्रेष्ठ व्हा.
कीर्तीचं म्हणणं सर्वांना पटतं. आणि सर्व छानपैकी जेवण करतात

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.