मी आवडती माझीच…💕

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

मी आवडती माझीच…💕

मी आवडती माझीच…
कारण
मी धैर्यमेरू अविचल
राहुनी धीरगंभीर
वारीन संकटांना…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी आनंदघन
बरसवुनी प्रेमसरी
देईन नवजीवन…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी प्रखरतेज
उजळवीन दाहिदिशा
स्वकर्तृत्वाने…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी थंडहवेची झुळूक
घालुनी हळुवार फुंकर
संचारेन नवचैतन्य…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी शीतल पूनवं चांदण
चंद्राच्या साक्षीने
देईन नवा अर्थ आवसेच्या रात्रीला…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी मधुर संगीत
छेडूनी नवी ताण
गाईन जीवनगीत…💕

मी आवडती माझीच
कारण ,
मी सप्तरंग इंद्रधनू
उधळुनी प्रीतीचे रंग
रंगेन माझ्याच रंगात…💕

©® सुनीता मधुकर पाटील.

पोस्ट नावासकट शेअर करावी…

©® all copy rights reserved.

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.