मी , ती , फेसबुक आणि तो (भाग 3 )

Written by

11 वी साठी तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला होता !! क्लासेस चांगले आहेत म्हणून बाकी कॉलेज वैगरे दुय्यम गोष्टी होत्या . दहावीला मिळालेली अपयशाची झळ भरून काढण्याच्या उद्देशाने शहरात आलो !! शाळेतलं कुणीही सोबत नव्हतं ! बरं झालं .. इथे नवीन मित्र मिळाले . सगळं सुरळीत चालु होतं . कॉलेजचा स्कॉलरशिप चा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेत मित्रांसोबत गेलो !! 1 तासाचे 20 रुपये !! 30-40 मिनिटांत काम झालं !! उरलेला वेळ काय करावं असा विचार असतांनाच शेजारी एक सद्गृहस्थ फेसबुक चालवताना आढळला !! मी लगेच लॉग इन काय ते असतं ते केलं !! रिक्वेस्ट मध्ये खूप रिक्वेस्ट आलेल्या होत्या . धडाधड स्वीकारल्या ! इनबॉक्स मध्ये कुणाचा तरी मेसेज आला . “अरे , हाय ” मेघना !! डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . मी ही हाय सेंड केलं ! थोडा वेळ बोललो . 1 तास पुर्ण झाला . गाडी रुळावरून खाली आली होती . मन चलबिचल होत होतं त्यात तो साधा मोबाईल !! त्या मित्राचा फोन आला ” अम्या , ती फेसबुक ला आलीये ” मी जास्त न बोलता फोन ठेवला !!  क्लासला एक एकदम जिगरी मित्र झाला होता . दुसऱ्यादिवशी त्याला सर्व सांगितलं !! तो जोर जोरात हसू लागला !! त्याचं सारं शिक्षण तालुक्यात झालं असल्याने तो जरा ” स्मार्ट ” होता .  पुन्हा काहीतरी कामानिमित्त सायबर कॅफेत जाणे झाले . इनबॉक्स मध्ये ”  मेघनाचा ” मेसेज ‘ अरे , तुझा नंबर दे ना , बोलायचं आहे ‘ मला थोडं वेगळं वाटलं . त्या स्मार्ट मित्राने  फेक अकाऊंट ही संकल्पना मला समजावून सांगितलेली होती !! मी मुळातच हुशार असल्याने सर्व लिंक्स हळू हळू जुळू लागल्या .. निकालाच्या दिवशी मित्राच ते विचित्र हसणं , तिच्या नावाच्या अकाऊंट ने मला  ” अरे , तुझा नंबर देना  ” इतका प्रेमळ मेसेज येनं आणि थोड्याच वेळात त्या शाळेतल्या मित्राचा पून्हा फोन येणं .. खुप मोठ्या जाळ्यात अडकण्याआधी मला सत्याची जाणीव झाली होती . “येड्यात नको काढू ” म्हणत मी इगनोर केले .  स्मार्ट मित्राला याची अपडेट दिली !! ” भावा , तुच रे ” म्हणत त्याने माझे कौतुक केले !! 12 वी चे संपूर्ण वर्ष फेसबुक हा प्रकार मला माहिती नव्हता !! मित्र काय करू शकतात या वास्तवाची जाणीव झाली असल्याने मी जाणीवपूर्वक त्या कडे दुर्लक्ष केले !! त्याचे फोन वैगेरे उचलणे तर कधीच बंद केले होते.. 12 संपली ..घरी मोठ्या सुट्टीसाठी गेलो . ” मावशी , अम्या आहे का ? ” आवाज कानी पडला . मी बाहेर गेलो . ” काय , कुठे गेली तुझी ती ‘ इव्हील ‘ स्माईल ” मी ऍक्शन करून म्हणालो . ‘अम्या , मेघनाचे मागे खुप मेसेज आले होते . तिला तुला भेटायचं होतं ‘ ” बस की भावा ,माहित आहे मला की ते तुझं फेक अकाऊंट होतं , येडा समजतो का ? ” त्याने काही न बोलता फेसबुकचा इनबॉक्स ओपन केला !! मेघनाचेच मेसेज …म्हणजे ते अकाउंट फेक नव्हतं तर … माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली … घरात मोबाईल घेण्यासाठी पळालो तेवढयात त्याचा मागून आवाज आला ” अम्या , खुप उशीर झाला आहे आता ”  त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा ती ”  राक्षसी स्माईल ” नव्हती !! मुळातच मी ” हुशार ” असल्याने मला त्याचा गर्भितार्थ एव्हाना कळून चुकला होता ..हुशारीने घात केला होता !!

 

(काल्पनिक आणि वास्तव )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा