मी , ती , फेसबुक आणि तो !!

Written by

आज शेवटचा पेपर !! बोर्ड बोर्ड करत करत आमचे कान नेहमी फुंकले जायचे ती दहावीची परीक्षा एकदाची संपलीच !! सगळेच मला हुशार समजतात म्हणून मलाही मी हुशार आहे असंच वाटतं , आणि याच जोशात मी सर्व पेपर भन्नाट दिले ,बोले तो झक्कास !! पहिला नंबर कुठेच जात नसतो !! जेल मधून सुटल्याची फीलिंग येत होती ! आयुष्याचा एक टप्पा संपला . सगळं कसं भारी वाटत होतं . काही दिवस गेले . करायला काही नसल्याने आईसोबत रविवारच्या बाजारात गेलो !! एका भाजीवालीशी भांडताना एक ओळखीचा आवाज कानी पडला . मी त्वरित पिशवी घेऊन तसाच तिकडे !! 10 ची वांगी 8 ला द्या म्हणत ” ती ” डोकं लावत होती . वर्षभर जिच्या नावाने मला मित्रं चिडवत होते तीच ती .पूर्ण शाळा ज्याच्या मागे तो मी हिच्या मागे . मेघना !! नाव जेव्हाही कानावर पडायचं तेव्हा-तेव्हा वाटायचं की सारे मेघ माझ्यासाठीच भरून येतात की काय ? मला पाहून न पाहिल्यासारखं करून ती निघून गेली , पुन्हा एकदा !!हे काही नवीन नव्हतं . वर्षभर अनेक वेळा तिने हे असले सोंग आणले होतेच !! मुलगीच ती !! तेवढयात पाठीवर मागून वजनदार हाथ पडला . चिडून मागे पाहिले , राक्षसी  स्माईल देणारा मित्र मागून सारी गंमत बघत होता . ” शाळा संपली रे , आता तरी सोड तिचा नाद “. तत्वज्ञान सुरू झाले !! आई बोलवतेय म्हणून मी तेथून पळ काढला . ” माझ्यापासून पळशील रे … पण तिच्यापासून ? ” पुन्हा तत्वज्ञानाचा डोस कानावर पडला !!

च्यायला उगाच शाळा संपली असं फर्स्ट टाईम वाटू लागले . शाळेत निदान कोपरया कोपऱ्यातून तिच्याकडे बघता तरी यायचं आता तर ती ही सोय नाही . आणि त्यात पुढे एकत्र येण्याची शक्यता धूसर !! त्यात तो राक्षसी स्माइल वाला मित्र पून्हा पुन्हा आगीत तेल टाकण्यासाठी घरी येत असे !! मित्रांचा पहिल्यांदा तिटकारा वाटू लागला . त्याकाळात मोबाईल ही खुप मोठी गोष्ट होती !! त्यात शाळेतल्या पोरांकडे तर अजिबात नाही . तिच्याशी कॉन्टॅकट करण्याचा एकही मार्ग दिसत नव्हता . सकाळी सकाळी ” रंगोलीचे गाणे आणि तिच्या आठवणी ” सोबत यायच्या !! त्यात ” मावशी , अमेय आहे का घरात ? ” हा त्या राक्षसी मित्राचा आवाज नकोसा झाला होता !! दूरदर्शनवर ” पहेला पहेला प्यार हैं ” गाणे सुरू झाले , त्याचे राक्षसी विकृत हास्य माझ्या कानावर पडू लागले . माझ्या सहनशीलतेची बहुधा ही सुरूवात झाली होती !!

 

 

  1. क्रमशः !!
Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा