मी तुझीच रे ❤ भाग 1

Written by

मी तुझीच रे ❤ (भाग 1)

©प्रज्ञा सदानंद लोके

नुकतीच अंघोळ करून आलेली मनाली विराज ला उठवायला रूम मध्ये जाते…..

आपले ओले केस मुद्दाम त्याच्या डोळ्यावरून फिरवत कानात I LOVE YOU म्हणून पळून जातानाच विराज ने तिला स्वतःकडे ओढलं….

मनाली : ओये बुरश्या…. अंघोळ कर जा…. मला हात नको लावू…. मला तयार व्हायचंय….😒

विराज : च्यामायला…. सकाळी सकाळी माझ्या मूड ची वाट लावली तू…. नवऱ्याला सकाळी सकाळी कोणी बुरश्या म्हणून उठवत का….😡

मनाली : ओहह मिस्टर…. तुम्ही ना कंपनी चे बॉस आहात…. तुम्हीच आदर्श नाही ठेवला तर एम्प्लॉयी काय आदर्श ठेवणार तुमचा….😝

विराज : कसं आहे ना…. मिसेस विराज… आपल्या एम्प्लॉयी ना पण माहितीय की आपल्या बॉस च आताच लग्न झालंय….आणि नवीन लग्न झालंय म्हटल्यावर वेळ तर होणारच ना सकाळी….😜

मनाली : बोक्या…. जास्त shining नको मारू…. पटकन काहीतरी खायला बनवं ना…. यार खूप भूक लागलीय….😞

विराज : मन्या…. तू माझी बायकोच आहेस ना…. नवऱ्याला ऑर्डर काय सोडते….😯

मनाली : तुला माहितीय ना माझा प्रॉब्लेम….😜

विराज : मस्का नको…. मला माहितीय तुला maggie शिवाय काही येत नाही…. ती तरी कुठे धड येते म्हणा….😝

मनाली : मग कशाला केलं लग्न…. करायचं होतं ना शेफ मुलीबरोबर….😒

विराज : काय करणार मन्या…. नशिबात असेल ते चुकत नाही…. देवाने पदरात दान दिलंय म्हटल्यावर काही पर्याय नव्हता ग….😖

मनाली : जा बोक्या…. माझ्याशी बोलूच नको तू…. किती घालून पाडून बोलतो तू मला…. मी माहेरी जाते निघून….😔

विराज : मन्या तू खरंच जाणार…. 😢

मनाली : नाही रे बोक्या…. मी कधी तुला सोडून जाईल का…. u know na how much i love u😘

विराज : शीट यार…. मला वाटलं…. खरंच जाशील…. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही कधी सुटका देशील….😑

मनाली : तुला सुटका हवीय का माझ्यापासून…. (उशी उचलत) थांब देते हा तुला सुटका….😠

विराज (पळत) : मन्या नाही हा…. मन्या थांब….😒

मनाली : का आता का पळतो…. थांब ना….😝

विराज लगेच बाथरूम मध्ये पळतो….

मनाली : बोक्या…. मी बाथरूम बाहेरून सुद्धा लॉक करू शकते माहितीय ना….😂

विराज (आतून ओरडत) : उगाच टाईमपास करू नको मन्या…. मला लेट होईल आणि तुला पण आज आईकडे जायचं होतं ना….

मनाली : अरे यार बोक्या…. विसरलीच होती मी….(दरवाजाला किस्सी देत) thankuuuu so much  मी तयारी करून घेते😘

विराज अंघोळ करून येतो तोपर्यंत मनाली स्वतःची तयारी करून मोबाईल वर लव्हस्टोरी वाचत असते….

विराज : बोल मन्या…. काय खाणार आज😃

मनाली : आज काहीतरी ना मस्त चमचमीत बनव😍

विराज : आणि मॅडम तुम्ही काय करणार…. तोपर्यंत लव्हस्टोरी वाचणार ना😒

मनाली : अय्यो बोक्या…. कसला मस्त ओळखतो तू मला😜

विराज : अय्यो बिय्यो काही नाही…. तू मदत करायची…. नाहीतर आज राहा तू उपाशी😄

मनाली (नाटक करत) : मन्याला बोका उपाशी ठेवणार😢

विराज : चल यार…. किती नौटंकी करशील वेळ होतोय ना😖

मनाली (कान पकडत) : शॉली शॉली…. चल लगेच😒

(ब्रेकफास्ट आणि सर्व आवरल्यानंतर)

विराज : मन्या…. माझी तयारी झाली…. चल…. बाथरूम चा नळ बंद कर आणि चावी पण घे…. pc जवळ ठेवली होती….

मनाली : झालं बाबा सगळं….. तुझी बायको ना खूप हुशार आहे….😎

विराज (लॉक लावत) : किती फेकशील ग…. दमत नाही का तू🙄

मनाली : चल आता….😑

(गाडी मध्ये बसल्यावर)

विराज : मन्या…. तू गॅस खालून बंद केला का ग….🤔

मनाली( विचार करत) : आठवत नाहीय रे😐

लगेच गाडीतून उतरायला जाते…

विराज : थांबा मॅडम…. आता मीच जातो….😒

मनाली(दृष्ट काढत) : किती गुणाचा ग माझा बोका….😜

विराज गॅस बंद करून येतो….

मनाली (हॉर्न वाजवत) : काय यार…. किती timepass करतो…. मला वेळ होतोय…. चल लवकर….😂

विराज(गाडीमध्ये बसत) : तुला ना…. मी रात्री बघतो….😜

मनाली : आज ना मी आईकडे राहायचा विचार करतेय….😝

विराज : नाही हा मन्या…. अजिबात नाही…. तुला माहितीय…. मी तुझ्याशिवाय एक दिवस पण नाही घालवू शकत….किती अडथळ्यांना पार करत आपण एकत्र आलो…. आता परत नाही….😢

मनाली : मला न हेच ऐकायचं होतं बोक्या….😍 चल आता आणि मला संध्याकाळी घ्यायला ये आईकडे….

विराज : हम्म….🙂

मनाली : चल आता…. थोबडा नीट कर…. नाहीतर आईला वाटेल…. तिच्या जावयाचा मी छळ करते…. 😒

विराज : हा बाबा….😁

क्रमशः❤

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा