मी तुझीच रे ❤ भाग 10

Written by

मी तुझीच रे ❤भाग 10

©प्रज्ञा सदानंद लोके

(मागील भागात)
प्रतीक्षा विराज च्या घरी येते….विराज स्कार्फवाली ला भेटण्यासाठी ऑफिसला जायचं ठरवतो….आजच्या भागात बघूया… ती भेटतेय का….

———————————————————–

विराज सकाळी रेशमच्या आधी तयार होऊन तिच्या रूममध्ये गेला…..

रेशम : दादु…. तुला उठवायला नेहमी मम्मा लागते…. आणि आज चक्क तू सकाळी सकाळी तयार पण…. कुछ तो खास है आज भैय्या के लिये….🤔

विराज : अरे मेरी बहना…. ऐसा कुछ भी नही है…. तुला सोडून नंतर कॉलेजला पण जायचंय मला…. म्हणून लवकर तयार झालो….😅

दोघे जण आवरून खाली जातात….

जानकीबाई : विराज…..आज तू एवढ्या लवकर तयार होऊन कुठे चाललाय….

रेशम : बघ दादु…..मम्माला पण डाऊट आहे तुझ्यावर…. आता बोल…..😂

विराज : मम्मा…. अगं जरा आपल्या ऑफिसमध्ये थोडं काम आहे काकांकडे….म्हणून जरा लवकर जातोय….

जानकीबाई : पण वेगळंच वाटतंय रे आज तुझ्याकडे बघून….. अगदी राजकुमार वाटतोय तू….😍

रेशम : राजकुमार येताना राणी ला घेऊन नाही आला म्हणजे मिळवलं मम्माने….😜

विराज : (तिचा कान पकडत )परत बोल…. काय बोलली…..😒

रेशम : अरे कान सोड ना….दुखतोय….सॉरी दादु….अरे मी तर मस्करी करत होती….😑

जानकीबाई : तुम्ही दोघांनी लवकर नाश्ता करा आणि निघा…. नाहीतर वेळ होईल दोघांना…..

रेशम : मम्मा…. आज श्रेयु कुठेय….. लवकर गेला का….

जानकीबाई : अरे हो…. आज सबमिशन आहे अस बोलत होता….

नाश्ता संपवून दोघे निघाले….

बाईकवर बसताना विराजला त्या हवा काढलेल्या प्रसंगाची आठवण झाली…. विराजच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं…. पण जासुस रेशमच्या नजरेतून काही ते सुटलं नाही…..

रेशम : ओ…हो…. दादु…. एवढी कसली खुशी….तू ना काहीतरी लपवतोय….. कुछ तो गडबड है…. बघ हा दादु…. मला सांगितलं तर हेल्प तरी होईल तुला….😍

विराज : कुछ भी गडबड नही है…..गप चल…..

———————————————————–

10 मिनटातच दोघेही ऑफिसजवळ येतात…. तिला खालीच रमीला दिसते….

रेशम : अरे मनू कुठेय…. आज एकटीच आली तू….

रमीला : तिने फोन केला होता….नेहमीची ट्रेन चुकली तिची…. तीच बोलली की तू पुढे हो….

रेशम : ओके….ओळख करून देते….हा माझा मोठा भाऊ…. विराज….

रमीला :(आश्चर्याने) तुला मोठा भाऊ पण आहे…. बोलली नाही कधी….😮

रेशम : तू विचारलं का कधी मला….😂

रमीला : अरे हो… ते पण आहे….

रेशम : आणि दादु…..ही रमीला…..माझी कलीग….

दोघेही एकमेकांना hii hello करतात….

विराज : तू तुझी मैत्रीण येईपर्यंत इथेच थांबणार आहेस का….🤔

रेशम : नाही रे दादु….वेळ होईल तिला…. चल वरती….

रमीला :  तुझा भाऊ का आलाय आज…..🤔

रेशम (मुद्दामून):  अरे त्याचा एक फ्रेंड आहे आपल्या ऑफिसला…. त्याच्याकडे काम आहे त्याच म्हणून आलाय तो….

विराज (हळूच) :  तू खोटं का बोलली…..😨

रेशम : अरे दादु….मोठी स्टोरी आहे…. सांगते नंतर….

———————————————————–

विराज : काका…. येऊ का आत….

मनोहरराव : अरे वाह….आता तू परमिशन घेऊन येणार का विराज….ये ना….बस….काय खातीरदारी करू तुमची….😉

विराज : काहीही काय काका….तुम्हाला भेटून बरेच दिवस झाले…. म्हणून आज आलो भेटायला…. काकी कशीय…. आणि सागर-श्रद्धा कसे आहेत….😊

मनोहरराव : अरे सर्व मजेत….घरची खुशाली कळते मला रोज म्हणून आता तुला उगाच विचारत बसत नाही….तुझं कॉलेज कसं चालू आहे….

विराज : मस्त….( थोड्या अजून गप्पा झाल्यानंतर) चला काका…. निघतो…. थोडं जरा फ्रेंड्सला भेटून जातो…. (विराजचे 2 फ्रेंड्स त्याच ऑफिसमध्ये जॉबला असतात….)

मनोहरराव : हो हो…. नीट जा….

विराज फ्रेंड्स ना भेटण्याच्या निमित्ताने सगळं ऑफिस फिरतो पण ती स्कार्फवाली त्याला कुठेच दिसत नाही….बिचाऱ्याचा मूड ऑफ होतो….😟

तेवढ्यात धापा टाकत मनाली येते….

रमीला : काय यार…. किती उशीर….एक दिवस मस्त चंपी करणार सर तुझी….

मनाली : सोड…. ऑलरेडी खूप दमलीय मी….काम करायचा पण मूड नाहीय माझा….🙁

रमीला : तो कधी असतो तुझा….

रेशम : मनू सगळं व्यवस्थित ना….घामाने डबडबलीय तू….😓

मनाली : अरे यार…. जाम लोचा झाला आज….😕

रमीला : लोचा रोज होतो तुझा…. आज काय झालं ते सांग….😜

मनाली : अरे बाबा….पास संपला होता आणि माझ्या लक्षात नाही आलं…. टिसी ने पकडलं….होते नव्हते ते पैसे पण घेतले त्याने….🤐

रमीला : ठीक आहे रे…. ही काय पहिली वेळ नाही तुझी…. तू नेहमीच विसरते महत्त्वाच्या गोष्टी….😒

मनाली : आता प्लिज यार…. लेक्चर नको…. थांबा जरा…. मी फ्रेश होऊन येते….😌

ती जाते…. नेमका तेव्हढ्यात विराज येतो….

विराज : चल रेशम…. जातो मी….

रेशम : दादु झालं का मग काम….

विराज : हो…. चल…. नंतर बोलू…. बाय….

रेशमला कळलं…..दादूच काहीतरी बिनसलय….रेशम काकांच्या केबिनमध्ये जाते….

रेशम : काका…. दादूच प्रोजेक्ट झाल का नीट…. काही प्रॉब्लेम होता का….

मनोहरराव : कसला प्रोजेक्ट…. काही बोलला नाही विराज….

रेशम : मग दादु का आलेला….

मनोहरराव : अगं…. बरेच दिवस भेटला नाही ना…..म्हणून भेटायला आलेला….काय झालं….

रेशम : नाही काका…. काही नाही…. मला वाटलं कसलं प्रोजेक्टच काम वैगरे होत की काय….. चला…. मी जाते….

(बाहेर आल्यावर) दाल मे कुछ तो काला है….नाहीतर दादु खोटं बोललाच नसता…. विचारायला हवं त्याला….🤔

———————————————————–

मनाली : रमीला…. आज फुल हटलीय माझ्या डोक्याची….

रमीला : काय झालं….

मनाली : अरे यार…. तो दिसला होता आज….😕

रमीला : त्याने आवाज दिला की तू आवाज दिला….😒

मनाली : वेडी आहेस का…. माझ्यासाठी तो टॉपिक कधीच क्लोज झालाय….मला नकोय परत रिलेशनशिप न ऑल….😳

रमीला : काय बोलला तो….

मनाली : जास्त काही नाही…. तू चेंज झालिस…. तुला आठवण येत नाही का…. वैगरे विचारत होता….😢

रमीला : मग तू काय बोलली….

मनाली : नाही रे….मला ते सर्व नकोय परत….माहितीय ना तुला….😦

रमीला : त्याला बोलायचं ना…. झाल ते बस झालं…. आता 2 वर्षांनी का आलाय…. नको परत ते सगळं….

मनाली : सोड ना….नको तो विषय…. रेशम पण येईल आता…. ऑलरेडी माझा मूड ऑफ आहे…. भेंडी आजचा दिवसच भंगी आहे….😠

रमीला : मनू….तू ना नको त्या गोष्टीचा विचार करते…. सोड ना…. भूतकाळ होता यार तो…. त्याच्यामुळे वर्तमान आणि भविष्याची कशाला वाट लावतेय….😡

रेशम आल्यामुळे त्याचं संभाषण जागीच थांबलं….

———————————————————–

दिवसामागून दिवस जातात…. एक्साम असल्यामुळे स्कार्फवाली चा विचार तूर्तास तरी विराज बाजूला ठेवतो…. इतके वर्षांनी तिचा भूतकाळ समोर आल्यामुळे मनाली पण जरा शॉक मध्येच असते…. रेशम मात्र तिच्या बॉयफ्रेंड च्या वेगळ्या वागण्यामुळे डिस्टर्ब असते….

(संध्याकाळी एका कॅफेमध्ये)

रेशम : काय झालं…. तू असं का वागतोय….

तो : असं म्हणजे…. नीटच तर वागतोय…..

रेशम : प्लिज ना…. तुझ्या अश्या वागण्याचा त्रास होतोय मला…. का कळत नाही तुला….

तो : प्लिज….. कसं वागायचं….कसं नाही…. हे तू रोहनला शिकवायची गरज नाही….😡

रेशम : रोहन…. मी नोटीस केल…. बरेच दिवस तू वेगळा वाटतोय…. काय झालं तुझं….प्रेम कमी झाल बहुतेक….  avoid का करतोस मला….पहिला तर खूप वेळ असायचा माझ्यासाठी…. आता काय झालं….😢

रोहन : अग रेशम…. असं काही नाहीय…. समजून घे ना…. ऑफिस चा खूप लोड आहे ग…. मला वेळ नाही देता येत आहे….😕

रेशम : नाही माहीत का…. पण खरंच असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी नक्की चालू आहे….Take your time…. तुला वाटेल तेव्हा सांग मला….😢

रोहन : अरे रेशम…. काय चालू आहे तुझं…. तू निघून जा आता…. मला खरंच इच्छा नाहीय बोलायची….😡

रेशम रडत रडत निघून जाते….

रोहन (स्वतःशीच) : कसं समजावू यार हिला…. पैशावाली म्हणून हिच्याबरोबर नाटक केल प्रेमाच…. पण आता मला रेशम नकोय….. बहुतेक मला निर्णय घ्यायला कठीण जातोय…. काय करू….. सोड रोहन…. थोडे दिवस मजा मारून घे…. नंतरच नंतर बघू….😎

क्रमशः ❤

(नमस्कार वाचकहो….आज कथेचे 10 भाग झाले…. लिहिताना खरच वाटलं नव्हतं की तुमच्याकडून इतका मस्त प्रतिसाद मिळेल….मी काही पेशाने लेखक नाही….तरीही माझं लिखाण तुम्हाला आवडतंय हेच खूप छान आहे माझ्यासाठी…. असंच प्रेम राहूदे….

आज फायनली रेशम च्या बॉयफ्रेंड च नाव तरी कळलं…. विराज ला तर त्याची स्कार्फवाली भेटलीच नाही….मनाली चा  भूतकाळ काय असेल बरं…. लवकरच कळेल…..पुढचा भाग  20 डिसेंबर पर्यंत प्रकाशित होईल….धन्यवाद….)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.