मी तुझीच रे ❤ भाग 11

Written by

मी तुझीच रे ❤भाग 11

©प्रज्ञा सदानंद लोके

(मागच्या भागात)
विराज स्कार्फवाली साठी ऑफिस ला जातो…. पण ती काही भेटत नाही….. मनाली तिच्या भूतकाळामुळे थोडी डिस्टर्ब असते….रेशम चा बॉयफ्रेंड रोहन च्या वागण्यात थोडा बदल झालेला असतो आणि त्यामुळे रेशम दुःखी असते….आता पुढे…..)

—————-–—————————————–

सकाळी सकाळी जोरजोरात दरवाजाची बेल वाजते…..
बेडरूममधूनच मनाली ओरडते…..

मनाली : आई…. सकाळी सकाळी अलार्म कोणी बाहेर नेऊन ठेवलाय….. आई उघड जा ना दरवाजा…. आईईईईईई…..

ओहह शीट…. आई तर कालच मावशीकडे गेलीय…. तिला यायला अजून 1 तास तरी असेल….. चलो मनू…. खुदको ही उठना पडेगा….

(दरवाजा उघडताच)

ओह माय गॉड…. तू….😨

तीची झोप खाडकन उतरते…..त्याला बघून तिच्या झोपाळलेल्या डोळ्यातून पाण्याचा पूर यायला सुरुवात होते….

तो (तिला मिठी मारत) : ओहहह बच्चा…. रडायला लागला…मी आलोय ना…. आता कायमचा इकडेच राहणार मी….😍

मनाली : (त्याला मारत) तू आधी का नाही सांगितलं की तू येणार…. काय तू पण…. अचानक कसा आलास…. सांगायचं तरी ना…. आई पण थांबली असती घरी आज….असा कसा रे तू…..😢

तो : अरे माझी आई….गप बस की जरा…. आतमधे तरी घे….. की परत जाऊ…..😓

मनाली (कान पकडत ) : सॉरी ना…. माफ भी कर दो….

मनाली त्याला पाणी वैगरे आणून देते….
आज पोहे आहेत हा खायला दादा….
(हा….बरोबर ऐकताय तुम्ही….तिचा दादा मयांक….)

मयांक : मनू तुला माहितीय ना…. पोहे नाही आवडत मला….😕

मनाली : जास्त लाडात नको येऊ…. खावं लागेल….तसं पण मला काही येत नाही बनवता….माहितीच असेल तुला….😓

मयांक : माहितीय मला ते….काय मनू….मी नाही होतो तर 2 पदार्थ तरी शिकून ठेवायचे ना…. आई बाबा कुठेयत….

मनाली : बाबा कामाला असतात ना दादा ह्या वेळेला…. विसरलास की काय….आई मावशीकडे गेलीय….येईल इतक्यात….

मयांक : बच्चा इथली एकही गोष्ट नाही विसरलोय मी…… तुम्हाला विसरलो ना तर तू जीव घेशील माझा…. हरामी….

तेवढ्यात आई येते….

आई : मयु तू आलास…..
नेहमीप्रमाणे त्याला बघितल्यावर आईचे डोळे पाणावतात….

मनाली (चिडवत) : बघ दादा….गंगा जमुना आल्या भेटायला तुला….😢

मयांक (आईला मिठी मारत ) : आई नको ना रडु…. मी आलोय ना आता…. तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार मी….

मनाली : दादा जर तू गेलास ना चुकूनसुद्धा तर तुझी गाठ माझ्याशी आहे….😒

मयांक : हो माझ्या बच्चा…. आई….आज मस्त माझ्या आवडीचं जेवण झालं पाहिजे हा….😍

मनाली : आई…. मयूच्या आवडीचं नाही…. मनूच्या आवडीचं जेवन बनवणार…..😂

आई : मनू आज मयु आलाय….तुझ्या आवडीचं नाही बनणार आज जेवण…..😒

मनाली : दिवा आला ना आता….पणती हुई परायी…. वाटलंच मला…..पपांना येउदे….मग सांगते तुम्हाला….😡

दोघे एकमेकांना चिडवत मारामारी वर उतरले….

आई : इतके दिवस तो नाही म्हणून उदास होती….. आणि आता त्याला मारतेय….😂

मनाली : आई इतके दिवसांची कसर भरून काढणार आहे मी…..बघच तू…..

मनाली : दादा…..तू इतका बारीक कसा रे झाला…. नक्की आमचीच आठवण यायची ना की अजून काही…..😜

मयांक : बाई…. जरा शांत बसशील का….

(नाश्ता करून झाल्यावर)आई मी जरा बाहेर जाऊन येतो….

मनाली : दादा तू आल्यापासून काहीतरी विसरतोय…..😦

मयांक : काहि नाही विसरत आहे मी….

मनाली : दादा…. ओके….जा…. नको बोलूस….बाय….

मयांक : बच्चा रागावू नको ना…. लव्ह यू बच्चा….😍

मनाली : लव्ह यू 2 3 4 5…..जा बेटा….जी ले अपनी जिंदगी….😍

(मग आता तुम्हाला समजलच असेल ना….. फोन वर बोलणारा मनूचा लाडका म्हणजे तिचा मोठा भाऊ मयांक…. तिच्यासाठी तो सर्व काही होता आणि त्याच्यासाठी ती त्याचा जीव होती….. मनूच्या आवाजावरून तिच्या मूडचा तो अंदाज लावायचा….त्याच्याशिवाय तिला एक क्षण ही करमत नसायचं….पण पुढच्या शिक्षपसाठी तो पुण्याला मोठ्या मावशीकडे गेला….इंजिनिअरिंग पूर्ण करून तो पुन्हा आपल्या स्वतःच्या घरी आला होता…..आता काय मयांक बद्दल सगळं माझ्याकडूनच ऐकणार का…..हळूहळू कळेल तुम्हाला आपला मयांक कसा आहे ते….)

—————-–—————————————–

(विराजच्या घरी)

अशोकराव : जानकी…. तुम्ही बसा जरा निवांत आमच्याबरोबर….

जानकीबाई : अरे वाह…. आज चक्क तुम्ही आम्हाला वेळ देताय….बरं वाटलं ऐकून…..😊

अशोकराव (त्यांचा हात हातात घेत): हो ना…. खूप दिवसांनी आम्हाला जाणवलं…. सर्व पसारा सांभाळता सांभाळता तुमच्याकडे लक्ष द्यायचं राहून गेलं…. माफ करा आम्हाला…..🙁

जानकीबाई : काहीही काय अहो…. हे सर्व कोणासाठी केलंत तुम्ही…..आमच्यासाठीच ना….तुम्ही कितीही बिझी असलात तरी तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे…. किती काळजी आहे….आम्हाला माहीत नाही का….😊

अशोकराव : तुम्ही काही कमी कष्ट घेतले का आमच्यासाठी…. आपली तिन्ही मुलं चांगली निपजली याचं सगळं श्रेय मात्र तुम्हाला जातं….. आम्ही बाहेरचा गाडा सांभाळत होतो….. तुम्ही या घराला घरपण देऊन आपलंसं केलंत….😍

जानकीबाई : बस झाली हो आमची स्तुती…. किती लाजवाल आम्हाला….😄

अशोकराव : तुम्ही आजही तशाच लाजताय बरं का….
अगदी पूर्वीसारख्या….कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला होता ना तेव्हा लाजला होतात अगदी तश्याच….😉

जानकीबाई : आपली मुलं ना मोठी झालीत…. प्रेम करायचं वय नाही राहिल आपलं…..आता त्यांचं वय आहे प्रेम करायचं….🙄

अशोकराव : अगं ते करुदे की प्रेम…. मी कुठे नाही म्हणतोय…. पण म्हणून आम्ही तुमच्यावर प्रेम नाही करायचं हा कुठला न्याय….😂

जानकीबाई : तुम्ही आराम करा…..आम्ही जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघतो….

अशोकराव : वाटलंच आम्हाला….. विषय फिरवणार तुम्ही….आम्ही करतो आराम आता….😂

—————-–—————————————–

अभिषेक विराजला भेटायला घरी जातो….

अभिषेक : काय ब्रो…. भेटलास नाही बरेच दिवस….

विराज : तू होतास का तुला भेटायला…. तू तर बाकीच्या फ्रेंड्स बरोबर फिरण्यात बिझी होता….🙄

अभिषेक : अरे काय करणार….. कॉलेज सुरू होईल थोड्याच दिवसात…. मग तोपर्यन्त फिरून घेतो….. काय मग….शोधलं की नाहीं तूमच्या स्कार्फवालीला…..😉

विराज : अरे काय सांगू तुला…. गेलो होतो मी ऑफिस ला….. पण भेटलीच नाही ती….😑

अभिषेक : पण तू तिला कसं ओळखणार होता….तोंड थोडीना बघितलं होतंस….

विराज : मी डोळ्यांकडे बघत होतो सगळ्यांच्या…. लपून छपून….

अभिषेक : विराज भावा…. स्वतःच्या ऑफिसमध्ये मार खाशील हा पोरींचा….😅

विराज : नाही रे तेवढं कळत मला….सोड रे आता…. हळूहळू ते डोळे पण विसरेल मी….

अभिषेक (टपली मारत) : डोळ्यांची आऊटलाईन लक्षात ठेव रे….

विराज : नको रे….सोड ती नसेल पण इकडे….. मी उगाच शोधत बसलोय…. मृगजळ होती ती….

अभिषेक : अरे श्रेयु…. तू घरीच आहे….. मला वाटलं बाहेर असशील….

श्रेयश : अभिदा… मी पण थोड्या वेळापूर्वीच आलो बाहेरून….

तेवढ्यात त्याच्या खुरापती डोक्यात रेशमचा विचार येतो….

काय मग अभिदा….. दादूची स्कार्फवाली शोधतो आहेस….. तुला कोणी भेटली की नाही….😍

अभिषेक : आमचं काय बाबा….आपल्या समोर विराज सारखा हिरो असताना आम्हाला कोण भाव देणार….😅

श्रेयश : ओहहह….असं आहे का…. पण कोणी आवडली तर मला सांग हा नक्की….😂

विराज : तुला कशाला रे फुकटच्या बातम्या….🙄

श्रेयश : असं काय दादु….. मुलगी आपल्या ओळखीची असेल तर सेटिंग लावायला थोडी हेल्प होईल….😍

तेवढ्यात रेशम येते….

सेटिंग लावण्यापेक्षा जरा अभ्यास कर श्रेयु…. दादु तू काय ऐकत बसलाय….ओरड ना जरा त्याला…..

विराज : तो ऐकणार आहे का माझं कधी….

रेशमच अभिकडे लक्ष जातं….ती थोडी बावचळते….(मनात) ह्याने दादूला काही सांगितलं तर नसेल ना….

श्रेयश सर्व नोटिस करत असतो….

औपचारिकता म्हणून रेशम कधी आलास वैगरे अभिषेक ला विचारते…..

रेशम : दादु तुला माहितीय ना…. ह्या महिन्यात काय आहे….

विराज : तुला काय वाटलं रेशम…. आम्ही विसरू शकतो का तो दिवस….बरं झालं आलीस…. अभि पण आहे….ठरवू आपण….

श्रेयश : हो दादु…..फंक्शन मात्र मोठं झालं पाहिजे हा….

अभिषेक : माहितीय मला….. तुमच्या स्वतःच्या वाढदिवसापेक्षा तुम्ही त्या दिवसाची किती आतुरतेने वाट बघता…. टेन्शन नका घेऊ…. जोरदार तयारी करू आपण सगळे…..

विराज : रेशम….. आपण उद्या सर्व ठरवूया का…. तसं पण उद्या रविवार आहे…..

रेशम : हो चालेल दादु…. चला मी अभ्यासाला जाते….

(ती गेल्यावर)

अभिषेक : माझ्याकडे एक कल्पना आहे….बोलू का श्रेयश….

श्रेयश : काय अभिदा तू पण….. बोल ना… विचारायचं काय त्यात….

अभिषेक : आपण सर्वांना फंक्शन ला बोलावलं तर…..

विराज : हा मग…. सर्वानाच बोलावणार आहे….

अभिषेक : श्रेयु…. तुझा दादु ना फक्त अभ्यासात हुशार आहे…. बाकी त्याचा वरचा मजला गुढग्यात आहे…..😂

श्रेयश : खरं सांगू तर तुझं आताच वाक्य आवडलं मला…. पण तू का बोलला ते मला सुद्धा नाही कळालं अभिदा….

अभिषेक : ह्या वेळी आपण सर्व ऑफिस स्टाफ ला बोलवलं तर पार्टी साठी…..😍

विराज : बोलवू ना….त्यात काय एवढं….

अभिषेक : मग स्कार्फवाली पण भेटेल ना विराज…..😍

विराज : सोड ना अभि……नको तो विचार….😉(डोळे मारत) पण तू एवढं बोलतोस तर बोलवू सगळ्यांना….

श्रेयश : अभिदा ग्रेट आहेस हा तू पण…..

अभिषेक : माहितीय….. आता जातो…. उद्या येईन…. सगळं ठरवू तेव्हा…..

क्रमशः❤

(नमस्कार वाचकहो…..कसा वाटला आजचा भाग…. मयांक बरोबर ओळख झाली ना….

आज थोडं अशोकराव आणि जानकीबाई यांच्याबद्दल लिहिलं….खरंच ना…. कामाच्या गराड्यात आपल्या साथीदाराला वेळ द्यायचा राहूनच जातो….पण आपल्याकडे ऑप्शन नाही ना….एक मात्र करू शकतो….आपल्या पार्टनरला त्यासाठी थँक्स तर बोलूच शकतो ना…एक शब्द….पण सर्व काही सामावून घ्यायची ताकद आहे यात….तुम्ही पण तुमच्या अश्या जवळच्या व्यक्तीला एकदा थँक्स बोलून बघा…त्यांना सांगा की तुम्हाला त्यांच्या कष्टाची जाणिव आहे….त्यांच्या चेहऱ्यावरच हसू तुम्हाला आनंद देऊन जाईल….

आणि सॉरी…..अगदी नेहमीसारखं…. मला ना सवयच झाली तुम्हाला सॉरी बोलायची…. काय करू….खरच वेळ नाही मिळत हो….नाहीतर तुम्हाला ताटकळत का ठेवेन मी….तरी तुम्ही माझ्या कथेची वाट बघता…खूप आनंद वाटतो….खुश राहा….. वाचत राहा…..पुढील भाग 24 डिसेंबर पर्यंत प्रकाशित होईल….)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.