मी तुझीच रे ❤ भाग 17

Written by

मी तुझीच रे ❤ भाग 17

©प्रज्ञा सदानंद लोके

(मागील भागात)

मयांक विराजबद्दल मनालीच्या मनातला गैरसमज दूर करतो…..विराज ला जाणवत की तो मनाली वर प्रेम करू लागलाय…. जानकीबाई ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात…..

भाग 16

मी तुझीच रे ❤ भाग 16

——————————————————-

(हॉस्पिटलमध्ये)

विराज : तू…..

मनाली : तू नाही….. तुम्ही बोलायचं…..थोडे मॅनर्स पाळा विराज सरपोतदार…..😒

विराज : सॉरी…..मला तसं म्हणायचं नव्हतं…..

रेशम : मनू….. तू इथे कशी काय….. आणि खूप खूप थँक्स मनू…..😍

तेवढ्यात मयांक डॉक्टर सोबत येतो…..

(मयांक रेशमला बोलतो)
Actually….. मनाली प्रत्येक रविवारी घरकुल मध्ये जाते….. जो एक आश्रम आहे वृद्धांसाठी आणि अनाथ मुलांसाठी…..तिथेच ह्या जानकी मॅडम येतात…..आज  त्यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या….. मनू खूप घाबरली आणि तिने मला कॉल करून बोलवून घेतलं…..

रेशम : थँक्स दादा…..😊

मयांक : अरे रेशम….. थँक्स काय त्यात….. कर्तव्य केलं फक्त….. चला आता….. आम्ही निघतो…..

मनाली : डॉक्टर….. मॅडम ना डिस्चार्ज कधी मिळेल…..

डॉक्टर : आज त्यांना आरामाची गरज आहे….. सो उद्या मिळेल डिस्चार्ज…..

सगळे मनाली कडे बघत होते ती अगदी घरच्यासारखी डॉक्टर शी बोलत होती….. निघताना मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मनाली मयांक सोबत घरी गेली…..श्रेयश मम्मासोबत रात्रभर थांबणार होता….. त्याला सोडून सर्वजण घरी आले…..

दुसऱ्यादिवशी विराज लवकर हॉस्पिटलमध्ये जातो आणि श्रेयश ला फ्रेश व्हायला घरी पाठवतो….. सर्व फॉर्मलिटिस पूर्ण करून विराज आणि जानकीबाई निघण्याची तयारी करत असतात….कुठेतरी विराज ला वाटत की मनाली नक्की येईल……

तेवढ्यात रूम चा दरवाजा ठोठावला जातो….

विराज : कम इन…..

मनाली येते…. जानकीबाई तिला ओळखत नाही…..

विराज : मम्मा…..ह्याच मॅडम काल तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या होत्या…..मी बोललो होतो ना सकाळी…..

जानकीबाई : थँक्स बेटा…..तुला खूप thank u…..तू होतीस म्हणून आज अगदी ठिक आहे…..😃

मनाली : काहीही काय मॅडम….. थँक्स बोलून लाजवू नका….. माझं कर्तव्य होतं ते….. तुम्ही आता कश्या आहात…..बरं वाटतंय ना….. औषध नीट वेळेवर घ्या…..😊

विराज (मनात) : अरे देवा….किती बोलते ही मुलगी टेपरेकॉर्डर आहे…..😂

तेव्हढ्यात मनाली विराजकडे रागाने बघते…..😠

विराज (मनात) : देवा….ऐकलं की काय हिने…. सॉरी ह्यांनि….. परत बोलेल….. मॅनर्स नाहींयत का बाबा….. तुझं काही खरं नाही विराज लग्नानंतर…..😨

जानकीबाई : अरे बाळा…..आहेत सर्व घरी काळजी घ्यायला…..तू नको टेन्शन घेउ….. पण मला बघायला मात्र येत जा घरी….. विराज बोलला की तू रेशम सोबत आहेस…..

मनाली : हो मॅडम…..

जानकीबाई : मॅडम मॅडम का बोलतेस….. अग तुझ्या आईसारखीच आहे मी…..तू काय आई नाही बोलणार….. पण काकू तर बोलूच शकतेस ना…..😅

विराज (मनात) : मातोश्री….. लवकरच आई बोलेल तुला आमची मॅडम….😍

मनाली पुन्हा रागाने विराजकडे बघते…..😠

विराज (मनात) : ही ना अंतर्यामी दिसतेय…..मनात बोललेलं कळतं वाटतं हिला…..😨

मनाली : चला काकू….. निघते मी…. ऑफिसला जायचंय…..

जानकीबाई : अग मग त्याच रस्त्याला पुढे आहे ना ऑफिस…… चल आमच्यासोबत…..विराज सोडेल तुला…..

विराज (मनात) : मॅडम….. एवढी चांगली संधी सोडू नका हो….. प्लिज हो बोला….. प्लिज…..😟

मनाली : नाही काकू….. मी निघते….थोडं काम पण आहे….. तुम्ही नेहमी येता का घरकुल मध्ये…..

जानकीबाई : हो….. त्यांच्या सहवासात रमायला आवडत मला…. तू पण जातेस का…..😍

मनाली : हो….फक्त रविवारी जाते….. मला सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आवडतो….. खूप मस्त वाटतं तिकडे गेलं की….. पुढच्या रविवारी भेटूच….❤

जानकीबाई : हो नक्कीच बेटा…. नीट जा हा….

मनाली : हो….. काळजी घ्या….. बाय…..

विराज (मनात) : नकटीच्या नाकावर राग बराच आहे….. विराज…. खूप मेहनत घ्यावी लागणार मॅडम च्या मागे……😜

——————————————————-

मनाली ऑफिसला पोहोचते…..तिच्या डेस्कवर स्वीटस चा डबा असतो…..

मनाली : रमीला….. काय आहे रे हे…..

रमीला : मला काय माहीत…..ओपन तर कर….. नाहीतर राहूदे….. स्वीट्स च्या डब्यात बॉम्ब असेल तर…..😨

मनाली : काहीही असतं हा तुझं…. असं बोलत मनाली तो डबा उघडते आणि बघते तर काय…. त्यात रसमलाई असते…..

रमीला : अरे वाह मनू……तेरे लिए रसमलाई….. दादा ने पाठवली का परत….😍

मनाली : नाही रे….. आम्ही तर खाल्ली त्या दिवशी घरी….. मग कोणी पाठवली असेल…..

रमीला : सोड ना…..आपण खाऊया…..

मनाली : अग हावरे….. सुधार बाई लवकर…. थांब मला माहित आहे हे कोणाचं काम आहे….😒

मनाली रमीला आणि सोबत रासमलाई घेऊन रेशम कडे जाते…..

मनाली : हे काय चाललंय रेशम….

रेशम : कुठे काय मनू…..

मनाली : मी एवढी मूर्ख नाही रेशम….. आणि तुला ना बटाटि ने मदत केलीय हे पण महितिय मला…..😠

रमीला : नाही हा मनू…. तुझा विश्वास नाही का माझ्यावर…..

मनाली : अरे विश्वास आहे म्हणून तर तुझं नाव घेतलं ना….. तुमच्या दोघींची युती झालीय बहुतेक…..😑

रमीला : मनू कर ना ग माफ तिला….. बिचारी रसमलाई….. आज तरी खाऊ दे ग तिला….

मनाली : तुम्ही खायचं तर खा…. मला खूप काम आहेत…. मी जाते…..

काहीही ऐकून न घेता मनाली जाते…..

रेशम : आता काय करायचं ग रमीला…..कसं मनवू तिला…..

रमीला : ते तू ठरवं…..तोपर्यंत मी जरा टेस्ट करू का……

रेशम सरळ उठून मनाली कडे जाते…..

रेशम (रडवेल्या चेहऱ्यांने) : मनू…. मला मनापासुन माफ कर…..खरं तर ओळख मी लपवली…. पण तरीही तुमच्याशी मैत्री केल्यावर खरी दोस्ती काय असते ना ह्याचा अंदाज आला….. नेहमी वाटायचं की खरं सांगून टाकेलं तुम्हाला….. पण तुमची reaction काय असेल ह्याचीच भीती होती मला….. इतकी सुंदर मैत्री नाही ग गमवायची….. मी afford नाही करू शकत तुम्हाला गमावणे….. प्लिज मनू….. माफ कर ना एकदा….😢

आणि एवढं बोलून रेशम रडायला लागते….. मग काय मनू लगेच पिघळते…..

मनाली : सॉरी रेशम….. खूप त्रास दिला ना मी…. पण तुला पण काय करू ग….. तू खोटं बोलली हेच पचत नव्हतं…..😢

रेशम : सॉरी मनू….. त्यादिवशी दादा ला पण खूप वाईट बोलली मी….. खरंच माफ कर ग…..😢

मनाली : ते राहूदे ग…. मी समजू शकते की तू माझ्या काळजीपोटी बोललीस…..😊

रमीला : तुमचा भरत मिलाप झाला असेल तर आपण खाऊया का….. भूक लागली रे….😜

तिघिही एकमेकांना मिठी मारतात आणि एक सुंदर मैत्री तुटण्यापासून वाचते…..

——————————————————-

दिवसामागून दिवस जातात…. रेशम रमीला आणि मनाली ह्याची मैत्री अजूनच खुलत असते….अगदी बहिणी वाटतील असं नातं होतं….

ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे तिघी जणी गप्पा मारत काम करत असतात….. तेवढ्यात रेशम ला रोहन चा फोन येतो…..फोन वर बोलल्यापासून ती खूप डिस्टर्ब असते….. मनाली तिला खूप वेळा विचारते पण ती वेळ मारून नेते….. पुन्हा तिला कॉल येतो…..लगेच येते असं सांगून ती ऑफिसखाली जाते…..

रेशम : काय झालं रोहन….. बाबा कसे आहेत…..बरे आहेत का….😢

रोहन : नाही ना ग….. त्यांना अटॅक आला….खूप मोठं ऑपरेशन आहे…..आई तर नुसती रडतेय….खुप टेन्शन आल आहे ग…..😭

रेशम : नको ना टेन्शन घेउ बाळा….. मी आहे सोबत तुझ्या…..😦

रोहन : ऑपरेशन नाही झालं ना….. तर आम्ही गमावून बसू ग बाबांना….😭

रेशम : किती खर्च सांगितलाय….

रोहन : दीड लाख…..कसे उभे करणार आम्ही एवढे पैसे…..

रेशम : मी दिले असते….. पण एवढे पैसे नाही रे…. घरी पण लगेच समजेल…..

रोहन : नाही ग…तुझ्याकडून नाही घेऊ शकत मी पैसे….

रेशम : असं का बोलतोस रोहन….आपण वेगळे नाही आहोत…..मी देऊ का थोडे….

रोहन : किती आहेत तुझ्याकडे सध्या…..मला स्वतःला लाज वाटतेय मागायला…. पण काही मार्ग नाही ग…. मी काहीतरी जुगाड करतो…..थोडे असतील तरी चालतील….. मी तुझी पै पै चुकवेल…..😳

रेशम : असं नको ना बोलूस रोहन….. तू माझा आहेस….. कोणी परका नाही…. पैसे परत करायची भाषा नाही करायची…. 1 लाख देऊ शकते मी…. पण बाकीचे कसे मिळणार तुला…..

रोहन : ते मी बघतो….. आईचे दागिने आहेत….. गहाण ठेवेल….. दुसरा पर्याय पण तर नाही…. तू कधी पर्यंत देऊ शकशील….

रेशम : मी तुला 3 दिवसात देते….मग ते तू हॉस्पिटलमध्ये भर म्हणजे प्रोसेस तरी चालू होईल….

रोहन : हो चालेल….. मी बघतो….. बाकीच काय करायचं ते…..

रेशम : मी येऊ का बाबांना बघायला….. मला खूप काळजी वाटतेय…..😞

रोहन : नको ग…..आधी नको…..ऑपरेशन झालं की ये….. आता तरी येऊन काय करणार तू….. आता जा तू ऑफिसमध्ये….. नाहीतर कोणीतरी बघेल…..

रेशम : हो मी जाते…… तू तुझी आणि आईबाबांची काळजी घे…..😣

पण दोघांनाही ही जाणीव नसते की त्यांना ऑलरेडी कोणीतरी पाहिलेलं असतं…..

——————————————————-

रात्री जेवत असताना श्रेयश ला एक फोन येतो…..
फोन वरचं नाव बघून श्रेयश विचार करत च कॉल रिसिव्ह करतो….. नाव माहीत असून सुद्धा मुद्दाम विचारतो……

श्रेयश : हॅलो कोण बोलतंय…..

समोरून : ते महत्त्वाचे नाहीय…..मला ग्रेव्ह पार्क मध्ये उद्या संध्याकाळी 7 ला भेट….. खूप महत्त्वाच बोलायचंय…..

श्रेयश : पण काय…..

समोरून : ते आलास की कळेल बाय…..

क्रमशः ❤

(नमस्कार वाचकहो…..

कसा वाटला आजचा भाग…..

विराज तर मनालीला मनवणारच…..तिघी सुद्धा परत एकमेकींच्या जिवलग झाल्या…..😍

पण आता ह्या रोहन ला नक्की काय गरज पडली…..खरच त्याचे बाबा आजारी असतील का…..की तो रेशम ला फसवतोय…..आणि ह्या दोघांना कोणी बघितलं असेल…..😨

आपल्या श्रेयश ला आलेला कॉल कोणाचा असेल बरं….. कोणी मुलगी तर नसेल…..बिचाऱ्याच्या प्रेमात पडलेली….😜

तुमच्या अभिप्रायमधून नक्की कळवा….पुढील भाग 17 जानेवारी ला प्रकाशित होईल…..

वाचत राहा….खुश राहा…..

धन्यवाद ❤)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.