मी तुझीच रे ❤ भाग 4

Written by

मी तुझीच रे ❤ भाग 4

©प्रज्ञा सदानंद लोके

—————————————–

दिवसामागून दिवस जात होते….. मनाली आर्टिकलशीप करून CA च्या स्टडी मध्ये व्यस्त होती आणि इकडे विराज सुद्धा प्रोजेक्ट , प्रेझेन्टेशन यामध्ये बिझी झाला…..

एक दिवस अशोकरावांनी रेशम ला बांद्रा च्या ब्रांच मध्ये आर्टिकलशीप साठी पाठवलं….. ती तिचे काका मनोहरराव यांच्या हाताखाली आर्टिकलशीप चे धडे गिरवू लागली पण तिने ऑफिसमध्ये भनक देखील लागू दिली नाही की ती कंपनी तिच्या पप्पांची आहे…..एक आर्टिकल म्हणूनच तिचा वावर होता….

( लंच टाईम )

रेशम : मी जॉईन करू का तुम्हाला….. मी इथे नवीनच आलीय…..😊

मुलगी : हो का नाही….. आम्ही दोघी पण रोज एकमेकांची तोंड बघून बोर झालोय😉…..तुझं स्वागत आहे….🤗

त्या मुलीचा मजेशीर स्वभाव मात्र रेशम ला लगेच आवडला…..

Hiii…. मी रेशम….😅

(हात मिळवत) hello….मी मनाली….. आणि ही रामलीला…..सॉरी रमीला….😂

रमीला : तुझं कोणतं इयर आहे…..😮

रेशम : मी सेकंड इयर ला आणि तुम्ही…..😮

मनाली : आम्ही सुद्धा….😊

रमीला : तू पहिली कुठे होतीस…..🤔

रेशम : मी ह्याच कंपनी च्या दुसऱ्या ब्रांच ला होती…..पण इथे जास्त वर्कलोड आहे म्हणून ह्या ब्रांच ला आली…..😊

मनाली : ओके ओके…..आम्ही जॉईन झाल्यापासून इथेच आहोत…..😂

एकमेकांचे नंबर एक्सचेंज झाले आणि तिघी आपआपल्या कामाला निघून गेल्या….. त्यादिवसानंतर मात्र त्या तिघी लंच ला एकत्रच बसायच्या….

—––———————————-

आज विराज खूप खुश होता आणि त्याला कारण पण तसंच होतं….. त्याचा जिगरी दोस्त…. अभिषेक…. आज लंडन वरून येणार होता….. आज कॉलेज ला न जाता साहेब अभिषेक ला रिसिव्ह करायला एअरपोर्ट वर गेले…..

विराज( मिठी मारत ) : वेलकम टू इंडिया ब्रो…. काय बडी तिकडे गेला आणि विसरून गेला मला….😍😘

अभिषेक : भावा…. जान है तू मेरी…. तुला विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं….😍😘

विराज : बस….. मस्काबाजी नको…..काका-काकी वाट बघतायत तुझी…..चल तुला तुझ्या घरा जवळ सोडतो…..

दोघांचे ही टुमदार बंगले अगदी बाजूबाजूला असतात….. अभिषेक देशमुख….मंदार देशमुख आणि वासंती देशमुख ह्यांचा मोठा मुलगा…. परिणी चा लाडका भाऊराया…..उंचपुरा…. मनमिळावू….. साखर जशी दुधात लगेच विरघळते तसा हा अभिषेक….विराज आणि अभिषेक अगदी लहानपणापासून एकत्र असायचे…. ग्रॅज्युएशन नंतर जवळ जवळ 2 महिने अभिषेक लंडन ला होता…..

अभिषेक : ओए…. घरी चल पहिला….जाने नही देंगे तुझे….😒

विराज : फिल्मी….आहे मी अजून…. अरे उद्याच्या प्रेझेन्टेशनची तयारी करायचीय….. एक काम करशील का…. उद्या मला कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये भेट ना….आपली गॅंग असणार सगळी तिकडेच….तुझी भेट पण होईल…..🤗

अभिषेक : अरे पण मला एन्ट्री कशी मिळेल कॉलेज मध्ये….🤔

विराज : ते तू आपल्या अन्यावर सोड….😂

—————-–———————–

इतके दिवस एकत्र असल्यामुळे रेशम-मनाली-रमीला तिघींचाही मस्त ग्रुप झाला….. कधीही भटकायचं असेल तर तिघी नेहमीच तयार असायच्या….. पण रेशम ने मात्र तिची खरी ओळख लपवून ठेवली होती….आजपर्यंत सर्वांनीच स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्याशी मैत्री केली कारण ती एका बिझनेसमॅन ची मुलगी होती….आणि म्हणूनच तिने यावेळी आपली ओळख लपवली कारण तिला खरंच एका निस्वार्थ मैत्रीची गरज होती….बडबड्या मनाली बरोबर जरा तिचं जास्तच पटायला लागलं…..वेळ आली की खरं सांगू असा तिने विचार केला….

दुसऱ्यादिवशी ठरल्याप्रमाणे अभिषेक कॉलेज ला पोहचतो आणि काहीतरी जुगाड करून अनिश त्याला कँटीन पर्यंत घेऊन येतो….

अभिषेक : हॅलो guyz….कसे आहेत सगळे….😉👋

मजेत (प्रतीक्षा सोडून सगळे एका सुरात ओरडले….) 😍

अभिषेक : By the way….(प्रतीक्षाकडे बघत) न्यू ऍडमिशन कोण…..😅

Hii…. मी प्रतीक्षा…..😊

(तो बोलणार इतक्यात)

अनिश : आणि हा आपल्या विराजचा जिगरी दोस्त आणि ग्रुप चा बच्चन….. सॉरी बोलबच्चन….😂

त्याच्या ह्या बोलण्यावर सगळेच फिदीफिदी हसले…..😝

मधुरा : काय मग…. पुढचा काय प्लॅन तुझा….🤔

अभिषेक : सध्यातरी मास्टर्स करायचा विचार केलाय पण आधी 1 महिना तुमच्यासोबत मस्त टाईमपास करणार….😜

विराज : तू ऑलरेडी 2 महिने टाईमपास करून आलायंस….😒

अभिषेक : ओके भावा….उद्याच जाऊन ऍडमिशन फॉर्म घेऊन येतो….तुमचे लेक्चर्स झाले का आजचे….😮

करण : नाहीरे….. आज फॅकल्टी चा प्रोग्राम आहे…. सो आजचे पुढचे लेक्चर्स कॅन्सल…..😅

अभिषेक : मग काय तुम्ही इथे बसलात….. कुठेतरी हॉटेल मध्ये जाऊया का….खूप भूक लागलीय यार….😜

विराज : तुला भूक कधी नाही लागत ते सांग….😒

हो-नाही करत करत सर्वानीच संमती दर्शवली….. जवळच एका हॉटेल मध्ये सर्वजण गेले….

—————————–————

मनाली : अरे यार….. आपण आज बाहेर खाऊया का…. माझी खूप इच्छा आहे रे….😍

रमीला : दिवा….तुझी ही इच्छा ना रोजच होते हल्ली….😂

रेशम : आपण आठवड्यात 3 दिवस तरी बाहेरच खातो…. कळतंय का मॅडम….😝

रमीला : दिवा….तुझा पोटाचा टायर वाढत चाललाय बाहेर खाऊन खाऊन….गपचूप इथेच खा….😠

मनाली : गप यार….. उद्यापासून पक्का हेल्दी खाणार…. डाएटिंग वर आहे मी उद्यापासून…. आज मस्त खाऊन घेऊया….😝

रेशम : मनू आपली मैत्री झाल्यापासून मी 100 वेळा तरी हे वाक्य ऐकलं असेल…..😂

रमीला : ती नाही सुधारणार गं….नेहमीच आहे तीचं…. 10 मिनीटांनी लंच टाईम होईल….. तेव्हा जाऊया बाहेर….😊

चालता चालता एक पॉश हॉटेल दिसला…..मनाली तिथेच थांबली…..

रमीला : दिवा….. पुढे चल….. आपल्याला पगार किती मिळतो माहितीय ना…..😝

मनाली : हा ना यार….. सोड…. एक दिवस येईल…. जेव्हा मी तुला पार्टी देईल इकडे…. तू भी क्या याद रखेगी…..😒

त्या हॉटेल मध्ये जायला रेशम ला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही…..

तिथून निघताना मनाली ला तीच बाईक दिसली….. जिच्यामुळे तिच्या न्यू टॉप ची माती झाली होती….तिच्या रागाचा पारा चढला….😠

मनाली : रमी…. तिकडे बघ ना…. ती बाईक…. अगं तीच ती…. चिखलवाली स्टोरी…. आठवतेय का….😠

रमीला : बाई…. तू नंबर पाठ करून ठेवलाय का…..😒

रेशमला मात्र त्या दोघी कशाबद्दल बोलतायत काहीच कळत नव्हतं…..

रेशम : गर्ल्स…. मला पण सांगा…. कोणती बाईक….. कोणता चिखल….🤔

रमीला : मोठी स्टोरी आहे….खाताना सांगते तुला….दिवा…. चल तू….. उगाच नको ते नखरे नको…. बडी पार्टी वाटतेय कोणतरी….😒

मनाली : बडी की छोटी ते मी बघते…तुम्ही दोघी पण एक काम करा…. त्या गार्ड ला काहीतरी करण्यात बिझी ठेवा ना प्लिज….😖

त्या दोघी पण गार्डजवळ जाऊन काहीतरी पत्ता विचारत टाईमपास करतात….रेशम मात्र पहिल्यांदाच हा सगळा टाईमपास एन्जॉय करत असते….

कोणाचं लक्ष नाहीय हे बघून मनाली ने पिन मारून हळूच टायर मधली हवा काढली आणि दोघींना इशारा करून हळूच सटकली…. तिचा इशारा बघून त्या दोघीही पळाल्या….

मनाली : फायनली….. माझा बदला पूर्ण झाला….😎

रमीला : हवा तर काढलीस….. ह्यात कसला बदला….. काहीतरी मोठा राडा पाहिजे यार….मग मानेन तुला….मी असती ना तर सीट वैगरे डॅमेज केली असती….😋

रेशम : ओए रमीला….. तू पण काय पिन मारतेय तिला…. आज पकडलं असतं ना तर वाट होती….😒

मनाली : पण थँक्स टू यू गर्ल्स…. तुमच्यामुळे शक्य झालं….. कोणी बघितलं असतं तर माझाच चिखल केला असता….😝

पण मनाली ला हे कुठे माहीत होतं की कोणीतरी तिचा हा प्रताप ऑलरेडी बघितला होता….😂😂😂

क्रमशः ❤

( धन्यवाद वाचकहो, तुम्हाला स्टोरी कशी वाटतेय हे तुमच्या समीक्षामधून कळवा….तुमच्या समीक्षा माझ्यासाठी मोलाच्या ठरतील आणि मला पुढील लिखाणाला प्रोत्साहन देतील….❤)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा