मी तुझीच रे ❤ भाग 5

Written by

मी तुझीच रे ❤ भाग 5

©प्रज्ञा सदानंद लोके

————————————————————-

मजा मस्ती झाल्यावर सर्वजण हॉटेल मधून निघाले…..

( बाईककडे बघत )

विराज : अभि…. बाईक पार्क करून गेलो तेव्हा तर ठीक होती….. असं वाटतंय कोणीतरी छेडछाड केली आहे….😖

अनिश : कांड करायला तुझीच बाईक कशाला कोण घेईल….😂

अभिषेक : सोड विराज…. इथे जवळच मेकॅनिक वाला आहे…. आपण तिथे जाऊ…. डोन्ट वरी….(नजरेनेच त्याने मी बघतो काय ते असं आश्वासन दिलं….)😅

विराज मात्र विचार करत होता की कोणी आणि का केलं असेल….. बाईक ची हवा काढण्यात एवढं कसलं समाधान मिळालं त्या व्यक्तीला….. सगळ्यांचा मूड ऑफ होऊ नये म्हणून रागावर कंट्रोल ठेवून तो काहीही न बोलता निघून गेला…..

————————————————————-

रेशम-मनाली-रमीला लंच संपवून ऑफिस ला पोचल्या….

पियुन : मनाली मॅडम….. आज मोठे सर(अशोकराव) आले आहेत आणि त्यांनी तातडीने तुम्हाला बोलावलंय….

रमीला : तू काय पराक्रम केलाय आता…. मोठे सर सहसा ह्या ब्रांच ला येत नाहीत….आणि त्यात तुला का बोलावलंय…..😒

मनाली(पटेली मारत) : जबाबदारी च काम असेल बहुतेक…. तुला जमणार नाही म्हणून मला बोलावलंय…..😎

मनाली : सर,मी आत येऊ का???😌

अशोकराव : हा…. याना मिस मनाली….. बसा…..
तुम्ही इथे जॉईन होऊन किती टाइम झाला…..

मनाली : सर 1 इयर होईल…. थोडेच दिवसात….😊

अशोकराव : ठीक आहे…. काम कसं वाटलं इथलं तुम्हाला…..

मनाली : सर खूप काम आहे आणि शिकायला देखील खूप मिळतंय….😊

अशोकराव : तुम्हाला कशाची आवड आहे….😮

मनाली : सर…. मी समजली नाही….🤐

अशोकराव : म्हणजे काही आवडनिवड तर असेल ना…. रिकाम्या वेळेत काय करायला आवडेल तुम्हाला….😅

मनाली (मनात) : च्यामायला…. ह्यांनी बहुतेक बघितलं असणार मला गप्पागोष्टी करताना…. म्ह्णूनच असं बोलतायत….😣
सॉरी सर…..

अशोकराव : तुम्ही सॉरी का बोलताय…. मी फक्त एक साधा प्रश्न विचारला की तुम्हाला काय करायला आवडत…. म्हणजे वाचन…. खेळ…. आणि बरंच काही….😅

मनाली : हो सर….वाचन आवडत मला….😍

अशोकराव : आणि खेळामध्ये कोणता प्रकार आवडतो तुम्हाला….😂

मनाली : नाही सर…. मी कोणताच खेळ खेळत नाही….🤐

अशोकराव : असं कसं….. तुम्हाला बाईक ची हवा काढायला आवडत नाही का…. अहो नवीनच खेळ आलाय मार्केट मध्ये…..😂

मनाली (मनात) : ओहहह शीट…. म्हणजे ह्यांनी माझा पराक्रम बघितला आहे…..😞
मनाली च्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला….
सॉरी सर…. ते जरा…..😟

अशोकराव (तिला मध्येच थांबवत) : मिस मनाली…. तुम्ही तुमची आवड जोपासा…. पण ऑफिस टाईम मध्ये नाही…. नाहीतर कारवाई होऊ शकते…. लक्षात असू द्या…. काहीही म्हणा…. हिंमत मात्र बरीच आहे हा तुमच्यात….😂

मनाली (मनात ): चांगलं बोलतायत की वाईट हेच कळत नाहीय….. मनू सॉरी बोल आणि कल्टी मार….
सॉरी सर यापुढे असं होणार नाही…..😟

(बाहेर आल्यावर)

रमीला : काय ग…. एवढं काय जबाबदारी च काम दिलं तुला सरांनी….😒

मनाली (विचार करत) : हिला काय सांगू आता…. सांगितलं तर गावभर करेल…. सोड मनू…. मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात…..🤐
काही नाही ग…. आपली जॉइनिंग डेट आणि काम कसं आहे वैगरे विचारत होते….. आता काम कर आणि मलाही करुदे….😒

————————————————————-

अभिषेक : काकी आत येऊ का….. विराज आहे का घरी….😁

जानकीबाई : अरे अभि…. कसा आहेस….. फक्त त्यालाच भेट तू…. येऊन 2 दिवस झाले आणि आता येतोयस…..😒

अभिषेक : काकी मजेत आहे मी…. थोडा बिझी होतो फिरण्यात तुमच्या मुलाबरोबर…..😂

जानकीबाई : ते तर माहीतच आहे रे…. तू असल्यावर दुसरं कोणी दिसतं का त्याला…. तो रूम मध्ये आहे त्याच्या…. तुला मी खायला रूम मधेच पाठवते….😅

अभिषेक : अहो काकी….. कशाला त्रास घेताय….. राहुद्या…. 🙄

जानकीबाई : अभिसाहेब….. लहानपणी ना हक्काने मागून खायचास….. आता बराच मोठा झाला की रे…. त्रास वैगरे बोलून परकं करू नको…. जा मी पाठवते…..😒

अभिषेक : विराज …. मी आत येऊ का…..😂

विराज : तुला कधीपासून परमिशन लागायला लागली रे भावा….😒

अभिषेक : तुझं काम केलं मी…. पार्टी पाहिजे तुझ्याकडून….😊

विराज (रागाने) : कोणी केला होता तो सगळा प्रकार….😠

अभिषेक : कोई तो लडकी थी भाई….. मॅटर काय आहे विराज….😂

विराज (शांत राहून ) : लडकी कोण….🤔

अभिषेक : तिने स्कार्फ बांधला होता यार…. त्यामुळे कशी दिसते माहीत नाही…..😞

विराज (दचकून) : खरंच…..स्कार्फवाली म्हणजे revenge time…..😍

अभिषेक : तू का एवढा रिऍक्ट होतोय…. आणि कसला बदला….😒

विराज : ऐक ना अभी….. मी ओळखलं कोणी केलं असेल….. पण मला त्या स्कार्फ शिवाय काहीच माहीत नाही…. मी फक्त डोळे बघितले आणि पुढचं समज ना रे…..😍

अभिषेक : विराज…. तू प्रेमात पडलाय का….😂

विराज : अरे तसं नाही…. पण मला त्या मुलीला भेटायचंय…. तिच्याशी बोलायचंय…..तिच्या डोळ्यात ना एक वेगळीच जादू होती यार….😄😍

अभिषेक : पण ती मुलगी भेटली कुठे तुला….. आणि ती एवढी मस्त असेल तर कांड तरी कशाला केले असले…..😒

विराज ने त्याला सर्व स्टोरी सांगितली…..

अभिषेक : ओहह….. असा मॅटर आहे तर….. भावा ही जबाबदारी तू आता माझ्यावर सोड…. 1 महिन्यात तुला त्या मुलीचा बायोडेटा देतो बघ…..😂

विराज : तुला वाटत नाही का…. की तू खूप कमी वेळ सांगतोय…..😒

अभिषेक : इतनी बेकरारी….सॉरी…. सॉरी….. पुढच्या आठवड्यापर्यँत देतो….😝

( तेवढ्यात श्रेयश आतमध्ये येतो )

श्रेयश : मम्मा ला सांगायला पाहिजे की दादूच आता लग्न
करून द्या….. मुलगी तर ऑलरेडी बघीतलीय दादूने….😜

विराज : ओए….. तू कधी आला…. आणि असं चोरून ऐकायचं नसतं श्रेयश….. कधी सुधारणार…..😖

अभिषेक : Aaaaa….. त्याला काय ओरडतो…. छोटा भाऊ आहे आपला…..(श्रेयश ला टाळी देत) श्रेयश तू आणि मी आपण दोघे मिळून वहिनीला शोधू…..😝

विराज : अरे बाबांनो…. वहिनी काय…. मला फक्त त्या मुलीशी एकदा बोलायचय…. लग्नापर्यंत कुठे जाताय…..😒

अभि आणि श्रेयश : ते आमचं आम्ही बघू…..😜

( जेवताना )

अशोकराव : काय मग रेशम…. न्यू ब्रांच मध्ये कसं वाटतंय काम करायला…..😅

रेशम : खूप मस्त आहे पपा….. शिकायला सुद्धा खूप मिळतंय…..😄

अशोकराव : कोणी फ्रेंड्स मिळाले की नाही….😮

रेशम : खूप मस्त ग्रुप झालाय पपा…. मी मनाली रमीला…. त्यांच्यासारखे फ्रेंड्स आजपर्यंत नाही मिळाले मला असं वाटतंय….😍

अशोकराव : माझं लक्ष आहे बाळा तुझ्याकडे आणि तुम्ही पण अभ्यासाकडे लक्ष द्या…. हवा काढन्यात वेळ नका घालवू….😂

विराज : म्हणजे पपा…..🤔

अशोकराव : अरे मी म्हणतोय की हवेत नको राहू…. परिक्षा कठीण असते CA ची…. समजतंय ना….😝

रेशम समजली की कोणीतरी चुगली केली किंवा पपांनी बघितलं आपल्याला….

हो पपा…. समजतंय मला….🤐

अशोकराव (श्रेयशकडे बघत) : आणि तुम्ही पण अभ्यास करा….. हिरोगिरी कमी करा आता…..😒

श्रेयश समजला की आता लेक्चर चालू होणार…. फक्त हो बोलून श्रेयश लगेच जेवून उठला…..

रेशम (विचार करत) शीट…. मी आता ह्या दोघींना कसं सांगू की पपांना सगळं कळलंय ते…. मग मला माझी ओळख पण सांगावी लागेल….. राहूदे नकोच सांगायला…. 😞

(फोनकडे बघत) पण ह्याने मला कॉल का नाही केला अजून…. जरा विचार नाही का येत मनात की आपली कोणीतरी वाट बघतंय…..😠
रागाने फोन स्विच ऑफ करून रेशम झोपायला गेली…..

————————————————————-

इकडे मनाली मात्र त्या बाईकवाल्याचा विचार करत होती…..
(स्वतःशीच) मनू…. सोड आता त्या बाईकवाल्याला…. नाहीतर तुलाच काढून टाकतील कामावरून…..थोडक्यात वाचलीय तू….बाबांना कळलं तर थोबडाच आउट होईल तुझा…. उद्यापासून फक्त कामच करायचं….. नकोच त्या उचापती…..😣

क्रमशः ❤

(मनाली बोल्ली तर आहे की उचापती बंद….तुम्हाला काय वाटत….. आपली हिरोईन खरंच सुधरेल…..???? आणि आपली साधी वाटणारी रेशम कोणाच्या बरं कॉल ची वाट बघत असेल?? लवकरच कळेल…..तुम्हाला स्टोरी कशी वाटतेय हे तुमच्या समीक्षामधून कळवा….)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा