मी तुझीच रे ❤ भाग 7

Written by

मी तुझीच रे ❤भाग 7

©प्रज्ञा सदानंद लोके

————————————————————-

आज बास्केटबॉल ची मॅच होती आणि सर्वजण खूप excited होते…..कारण कॅप्टन आपला हिरो होता….. बरोबर ओळखलंत….. विराज….. सगळे पहिले त्याला भेटायला गेले….

अनिश : ओए हिरो…. जिंकलीच पाहिजे हा आपली टीम नाहीतर तुला टवका देणार….😂

विराज : अरे बाबांनो…. मी पूर्ण प्रयत्न करणार जिंकण्यासाठी…. अनिश….अभि येणार आहे….त्याला आत आणायची जबाबदारी तुझी….

अनिश : जो हुकूम सरकार….

प्रतीक्षा : ऑल द बेस्ट विराज….😊

विराज : थँक्स….

आता तुम्हाला वाटेल की ही specially का ऑल द बेस्ट बोलली…..कळेल हळूहळू…..😉

सर्वजण मॅच च्या ठिकाणी पोचतात….

प्रीती : अन्या…. मला बसू दे ना करणच्या बाजूला….😍

अनिश : अगं बाई…. तू मॅच बघायला आली की कविता ऐकायला….😒

प्रीती : तू बाता नको मारुस….तू मला बसायला देतोय कारण तुला प्रतीक्षा च्या बाजूला बसायचंय….😜

अनिश : मॅडम…..हळू बोला जरा…. ऐकेल ती….

मॅच च्या वेळेला विराज च्या पायाला दुखापत होते आणि जिंकत आलेल्या मॅच वर पाणी सोडायला लागतं….

अभि विराजला सोडायला घरी जातो….विराज चा मूड तसा ऑफ होता पण आता अभिकडून स्कार्फवाली बद्दल काही माहिती मिळेल ह्या विचाराने त्याचा चेहरा उजळला….

श्रेयश : दादु…. तू चक्क हरला…..😂

विराज : शहाण्या….. पाय दुखावला म्हणून हरलो…. नाहीतर विराज सरपोतदार कधी हरत नाही…. लक्षात ठेव….😎

श्रेयश : तुझं कीर्तन आपण रात्री ऐकू…..अभिदा…. तू वहिनीची माहिती काढली का….😍

अभिषेक : तसं थोडफार समजलं आहे तिच्याबद्दल….

विराज (उपहासाने) : तुझ्या हातून कोणतं काम पूर्ण झालंय का आजपर्यंत…..😒

अभिषेक : एकतर तुमचं काम करा…. वरून एवढं ऐकवणार….. जा आता….. जे समजलं ते पण नाही सांगणार…..

विराज : आता भाव नको खाऊ….बोल लवकर…. नाहीतर फाईट देईल…..👊

अभिषेक : ती एक मुलगी आहे….

विराज : अरे वा….. खूप थँक्स…. बरं झालं सांगितलं नाहीतर कळलं नसत मला….

अभिषेक : किती ती आतुरता….. ओके ऐक….. फक्त एक गोष्ट समजली…..तुला माहितीय का त्यासाठी मी किती कष्ट घेतले…..😒

विराज : तू आता सांगतो की नाही लवकर…..

अभिषेक : ती ज्या कंपनीत आता जॉब करते ती कंपनी भविष्यात तिच्या मालकीची होऊ शकते…..अर्थात तू ठरवलं तर…..😂

विराज : अरे यार….ही काय दमशेराज खेळायची वेळ आहे का…..

अभिषेक : कसा रे तू पण….ती तुमच्या ऑफिस ची एम्प्लॉयी आहे….😜

श्रेयश : वहिनी आपल्या ऑफिस मध्ये जॉब ला आहे….हे तर मस्त झालं ना अभिदा….😍

विराज : तू गप जरा श्रेयु…. वहिनी वहिनी काय लावलंय…. अभि तू मस्करी तर करत नाहीय ना….

अभिषेक : नाही रे बाबा…. ती खरंच तुमच्या ऑफिस मध्ये आहे…. त्याच एरिया मध्ये असलेल्या ब्रांच मध्ये असेल…..I am not sure…..🤔

विराज : पण तू इतक्या खात्रीने कसा सांगू शकतोस की ती आमच्या ऑफिसची एम्प्लॉयी आहे…..

अभिषेक : अरे आयडेंटिटी कार्ड…..तुमच्या ऑफिसच आहे….. ज्या हॉटेलमध्ये आपण गेलेलो त्याच्या मालकाचा मुलगा माझा मित्र आहे….आता बाकी सगळं कसं मिळालं ते नको विचारू…..😒

विराज : रेशम पण तर त्याच ब्रांचला आहे आर्टिकलशीप ला…. तिला विचारलं असतं पण नको…. एवढी माहिती पुरेशी आहे…. पुढचं बघू पुढे…..

अभिषेक : तुमची परमिशन असेल तर मी आता निघू का….. नंतर भेटू…. तू काळजी घे…. ताण नको देऊ पायावर….

निघताना रेशम ला दरवाजाजवळ अभि धडकतो…..

अभिषेक : मला तुला भेटायचंय….. उद्या 5 वाजता मराठा कॅफेमध्ये भेटुयात…..

रेशम : पण अचानक काय झालं अभिषेक….

अभिषेक (वैतागून) : प्लिज…. माझ्याकडे आता वेळ नाही….. उद्या बोलू….😣

रेशम : पण मी 6 ला सुटणार…..

अभिषेक : ओके….. मग 6.30 पर्यंत भेट कॅफेमध्ये….

ह्याला मधेच काय झालं असं विचार करत रेशम दादूला बघायला रूममध्ये गेली….

रेशम : दादु….. तू ठीक आहेस ना…. असा कसा दुखावला पाय….😟

विराज : अगं…. थोडा लचकला…. होईल ठीक…. नको काळजी करुस…..😅

रेशम : श्रेयु….. जरा अभ्यास केला तर बरं होईल….😒

श्रेयश : आता जरा मी बिझी आहे ग महत्त्वाच्या कामामध्ये….😎

रेशम (टपली मारत ) : हा दिसतंय….. तुझं काम….. वॉट्सअप्प वर चॅटिंग….😂

दोघांना बाय बोलून रेशम रूममध्ये जाते….

————————————————————-

(दुसऱ्या दिवशी संध्याकाळी)

रेशम : अभिषेक…. तू अचानक का बोलावलं….🤔

अभिषेक : थांब जरा….. काहीतरी ऑर्डर करू…. नाहीतर परत बोलशील उपाशी बसवलं….😅

रेशम : नाही रे…. खूप हेवी लंच झाला आज….. काही नको मला….

अभिषेक : ठीक आहे…..सरळ मुद्दयला हात घालतो….. ज्यादिवशी श्रेयशच नाटक होतं….. त्यादिवशी मी तुला एका मुलासोबत बोलताना बघितलं…..😒

रेशम मनातून खूप घाबरली पण तिने तसं दाखवलं नाही…..

रेशम : मग त्यात काय…. मी बोलू शकत नाही का मुलांशी…..🤔

अभिषेक : नाही….. तसं काही नाहीय….. तू बोलू शकतेस….. मला तुला काही बोलायचा हक्क पण नाही….

रेशम : मग तू का मला विचारतोय…..

अभिषेक : कारण तू लपून भेटत होती त्याला….. आणि मला चेहऱ्यावरून तरी तो मुलगा चांगला नाही वाटला….. तुझं काय चालू आहे ते नाही माहीत….. पण तरीही तुला सांगतोय….. मुलांकडे बघून सांगू शकतो की तो कसा आहे….😑

रेशम : तू काय माझा पाठलाग करत होता…..सोड…. तसं पण तो दादूचा फ्रेंड आहे…..🙄

अभिषेक(विचार करत ) : विराजचा फ्रेंड???ओके…. मला पहिली त्याची माहिती काढू दे….. तू नंतर ठरव काय ते…..

रेशम : प्लिज अभिषेक…. तू लांब राहा ह्या सगळ्यांपासून….. मला माहितीय तुला माझी काळजी आहे….. पण हे माझं पर्सनल लाईफ आहे….. सो प्लिज दूर राहा….. दादूला सांगायचं विचार पण करू नको…. नाहीतर परिणामाला तू जबाबदार असशील….😠

अभिषेक : रेशम….. तुला कळतंय का तू काय बोलतेय…. आंधळी झालीय तू….😖

रेशम : हो….. मला सर्व समजतंय….हा विषय माझ्या समोर नको यापुढे…. प्लिज जाऊया इथून…..😑

दोघेही बाहेर पडताना नेमका श्रेयश त्या कॅफे मध्ये फ्रेंड्स सोबत येत असतो…..

(दोघांना बघून)

श्रेयश (मनात ) : ह्या दोघांचं काही असेल का….. wow अभिदा आणि रेशम मस्त वाटेल…..पण असं काही नसेल तर…. अभिदा तर माझा कानच फोडेल…. डिटेक्टिव्ह श्रेयश….. विचार करून पावलं उचलायला हवीत…..😎

तिथून बाहेर पडल्यावर रेशम बॉयफ्रेंडला कॉल लावते….

तो : कुठेयस तू रेशम…. तुला कधीपासून कॉल करतोय….. उचलता येत नाही का…..एवढी कशामध्ये बिझी आहेस….

रेशम : अरे हो हो….. शांत राहा जरा….तू भेट…. सर्व सांगते….

थोड्याच वेळात तो येतो…..

तो : काय झालं…. बोल आता…. कुठे होतीस…. कोणाबरोबर होतीस….😖

रेशम : अरे मराठा कॅफेमध्ये गेलेली…. अभिने बोलवलं होतं…..

तो : त्याने तुला का बोलवलं…. एवढं काय काम होतं त्याचं की जे बोलायला त्याला कॅफेमध्ये यावं लागलं….. आणि तू मला आधी का सांगितलं नाही…. तू पण आतुर होतीस का त्याच्यासोबत जायला…..😠

रेशम : प्लिज ना…. ऐकून तर घे…. त्याला आपल्याबद्दल समजलं बहुतेक….

तो (घाबरून) : मग तू काय बोललीस….सांगितलं नाही ना….😨

रेशम : नाही…. मी काही नाही बोलली….. आणि त्याला सांगितलं की तू माझ्या लाईफ मध्ये ढवळाढवळ नको करू…..😑

तो : अरे मेरी शेरनी…. दिल आ गया तेरे पे😍….चल कुछ खाते है हॉटेल मे….

रेशम : नाही…. आता नको…. भूक नाहीय आणि ऑलरेडी लेट झालाय घरी जायला….😑

तो : भूक नाही की त्याच्यासोबत खाऊन झालंय….😖

रेशम : प्लिज ना….. संशय घेणं कधी थांबणार तुझं….मी वैतागलीय ह्या सगळ्याला….😠

तो : अरे राणी….. मस्करी करतोय ना तुझी…. चल बस बाईकवर….घरी सोडतो तुला…..😅

क्रमशः ❤

(नमस्कार वाचकहो, तुम्ही दिलेल्या सपोर्ट साठी खूप खूप धन्यवाद…. काय मग…. आज मनाली ला मिस केलंत ना….. लवकरच येईल ती तुमच्या भेटीला….. जरा आज आराम करत असेल बिचारी😂….आणि रेशम चा बॉयफ्रेंड अभिषेक नाही हे तर स्पष्ट झालं…..मग तो कोण….आणि आपल्या विराज ला स्कार्फवाली चा पत्ता कळेल का…… लवकरच समजेल…..)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.