मी तुझी आई असते तर…..???

Written by

किती रागावतेस ग मम्मा..

एक तर ही शाळा,

त्या बॅगच ओझ,

पुस्तकातील न समजणारे इंग्रजीचे मोठे मोठे प्रश्न,

खेळायचा तास असला तरी देखील क्लास टीचर त्यांचाच विषय शिकवतात.. म्हणजे खेळण्याच्या नावावर शून्य वेळ…

घरी आलं की ट्युशन, मग काय ते विविध क्लासेस.. जाम कंटाळा आला मला या सगळ्यांचा..

मी तुझी आई असते तर….

इतक्या छोट्या बाळाला शाळेत नसत पाठवलं, एक्स्ट्रा क्लास नसते लावले,

अभ्यासासाठी रागावले नसते,

खूप….खूप खेळू दिल असत,
मी पण बाळासोबत खेळले असते,

आणि सगळ्यात महत्वाचं तो मोबाईल फोडून टाकला असता..

तोच असतो न तुमच्या जवळ आम्हा मुलांनपेक्षा जास्त वेळ..???

मी तुझी आई असते न मम्मा तर खूप छान झालं असत.???

समाप्त.. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते 100शब्दांची कथा… एका आणि सर्वच लहान मुलांच्या मनातील भावना 100शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय मी..कशी वाटली ते सांगा.. like करायला विसरू नका. आवडल्यास शेअर करा..पण नावासहित  धन्यवाद ?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा