मी निर्भया बोलतेय!

Written by
  • 2 आठवडे ago

मी निर्भया बोलतेय!

आज मला थोडंसं बोलायचंय!मी बोलणार म्हणून लोक घाबरतील, दचकतील,आणि म्हणतील देखील कि काळरूपी अजगराने गिळलेल्या व्यक्ती केव्हापासून बोलायला लागल्या?पण ज्यावेळेस हाडामासांची जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात त्यावेळेस मृतांना देखील जिवंत होऊन बोलावं लागतं. छे हो!आज मी काही इथं समाजाबद्दल, लोकांबद्दल बोलणार नाही हो,मी आज फक्त आणि फक्त माझ्याबद्दल बोलणार आहे.
तर नमस्कार,अर्थात माझी ओळख तुम्हा सर्वांना माहीत आहे, मी निर्भया. खरं तर प्रत्येक व्यक्तीच स्वप्न असतं कि समाजामध्ये आपल्या चांगल्या कर्तृत्वामुळं लोकांनी आपल्याला ओळखावं, तशीच माझी ही इच्छा होती,पण आज तुम्ही लोक मला ओळखता आहात ते माझ्या कोणत्या कर्तृत्वामुळं नाही तर माझ्यावर रानटी पशुनी गाजवलेल्या कर्तृत्वामुळं.
आज मला माझ्या आयुष्याचा अपूर्ण प्रवास सर्वांसमोर मांडायचा आहे.मी दिल्लीतील राहणारी.माझ्या आई वडिलांची लाडकी मी मुलगी.खरं नाव माझं ज्योती सिंग. माझ्यावर झालेल्या दुष्कृत्यांमुळे मला मेडिया ने निर्भया  असं नाव बहाल केले. माझं शिक्षण हे खूप छान रित्या सुरु होत,12th नंतर मी माझी आवड होती म्हणून Physiotherapy साठी प्रवेश घेतला..आणि अखेर माझं graduation झालं..graduation झालं व माझं आयुष्यही संपलं.
ती रात्र माझ्यासाठी शेवटची ठरली …तो सिनेमा माझ्यासाठी शेवटचा ठरला… हो 16 डिसेंबर 2012 च्या दिवशी मी आणि माझा मित्र आम्ही रात्री सिनेमा पहायला गेलो होतो आणि सिनेमा पाहून परतून येताना त्या नराधमांनी जे केलं ते सांगताना आजही माझ्या  अंगावर काटा येतो.आणि माझ्या सोबत जे झालं ते तुम्हा सार्यांना माहितेय ना!
खरंच काय चूक झाली होती माझी? रात्री च्या वेळेस एकट्या बाईने प्रवास करायचा नाही? पण मी एकटी होतेच कुठे?? सोबत तर मित्र होताच ना! तुमच्यातलेच खूप जण मला म्हणतात की लहान-सहान कपडे माझ्या  अंगावर होते म्हणून असं झालं..खरंच किती तथ्य आहे ह्या तुमच्या बोलण्यात?? एका क्षणासाठी आपण गृहीत धरू कि माझ्या कपड्यामुळं असं झालं असावं,पण मग गेल्या वर्षी जी असिफा या कृत्याला बळी पडली तिचं काय, ती तर अवघ्या आठ वर्षांची होती, तिने कोणते छोटे कपडे घातले?? शी!  स्त्रियांच्या कपड्यावर बोट ठेवणार्यानी आधी स्वतःच्या बुरसटलेल्या  विचारांवर बोट ठेवा..  मनात उगीच म्हणलं कि जे आपल्यासोबत झालं ते इतर कोणासोबत नको व्हायला… इतक्यात ती प्रियंका रडत जवळ आली आणि म्हणाली अग, हे मनुष्य म्हणून घेणारे रानटी पशु कधीच सुधारणार नाहीत…
मला माझ्या भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,मला अजूनही हवा तसा न्याय मिळाला नाही तरीदेखील माझा विश्वास आहे.परंतु अश्याच गोष्टी वाढत चालल्या तर तो कितपत उरेल हे माहित नाही बरं का!मला एवढंच सांगायचं आहे की  नवीन कायदे निर्माण करू नका हो, जे आहेत ते तरी व्यवस्थित रित्या पाळले गेले पाहिजेत,याची खबरदारी घ्या. मला मान्य देखील आहे की माझ्या भारताच्या न्याय व्यवस्थेचं हे ब्रीद वाक्य आहे की “हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये” ह्या तत्वावर न्याय व्यवस्था काम करते आणि म्हणून खरंच झाल्या गेलेल्या प्रकारात खरंच कोणी निर्दोष तर अडकलेला नाहीये ना म्हणून कोर्टाच्या proceddings लांबणीवर जातात,
हे सगळं मान्य मला ,पण ह्या सर्व प्रकारात अश्या नराधमांचे गैरकृत्य वाढत जातात.. शिवाय तारीख पे तारीख असं होत चाल्यामुळे लवकर न्याय तो मिळत नाहीच, बिचारे माझे पालक कोर्टाच्या चक्करा खात 7 वर्षे त्यांनी त्यांचे पायचे जोडे झिजवले,खरंच अजून किती उशीर?? का त्या हिंस्त्र पशूंना अजून जिवंत ठेवलंय?का??असे खूप प्रश्न माझ्या मनात आहेत ?? विचारांचं वारूळ माझ्या मनात निर्माण झालयं आणि त्यातून हजारो प्रश्नांच्या मुंग्या आता बाहेर निघत आहेत..
मला माहित नाही की अजून किती दिवस हे अत्याचार बायकांना सोसावे लागतील,पण एक मात्र सांगते की ज्या देशात बाई ला मानाचं स्थान दिलं जातं नाही भले तो देश मग किती का उंचीवर असू दे,तो नरकासमान आहे..
बाप रे!खूप उशीर झालाय,मी तुमचा खूप वेळ घेतलाय ना..निघावं लागेल मलाही,  तुमच्याशी बोलायला मला 10मिनिटे पृथ्वीवर यायची परवानगी मिळाली होती,चला मी जाते…पण जाता जाता एवढच सांगते,कि फाशीची शिक्षा असूनही जर असे गुन्हे घडत असतील तर नक्कीच शिक्षेच स्वरूप कुठं तरी कमी पडतंय असं मला प्रामाणिक पणे वाटत.नाही नाही मी फाशीची शिक्षा बंद करा असे मी म्हणत नाहीच मुळी, पण मला काय वाटत कि कायद्यात किंवा शिक्षेत बदल करण्याची मुळीच गरज नाहीये,गरज आहे शिक्षेची हमी देण्याची.घराबाहेर पडलेल्या एका मुलीला जर कोणी मुलगा छेडछाड करतो असे चित्र असेल तर तिने घरात हा प्रकार सांगितल्यावर त्याच्याकडं दुर्लक्ष करू,किंवा मग रस्ता बदल असंच सांगितलं जातं, त्यामुळं त्याची मजल हि अगदी बलात्कार्यापर्यंत जाते,त्यामुळं घरच्यांनी वेळेस पोलिसांची मदत घ्यायला हवी, आणि योग्य रित्या त्याच वेळेस शिक्षा द्यायला हवी ….. सगळे म्हणतात कि ,काळ बदलतोय म्हणे कुठला काळ??आजही स्त्री म्हणजे एक खेळणं आहे अशी धारणा आहे 21व्या शतकात सुद्धा,हि च खेदाची गोष्ट आहे….आहो सीतेला ज्यावेळेस अशोक वाटिके मध्ये रावणाने ठेवलेलं त्यावेळेस तिच्या शरीराला चुकूनही स्पर्श केला नाही त्या रावणाने तो तर राक्षस होता,आणि तुम्ही माणसं म्हणून घेता ना?? खरंच आहात का माणसं?? मी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माझ्या case च्या निकालाची आतुरतेने वाट पाहतेय,माझी पूर्ण खात्री आहे की,न्यायपालिका हि योग्य निर्णय देईल..पण आता विलंब करू नये हीच विनंती…..

निर्भया

Article Tags:

Comments are closed.