मुखवटा,…

Written by

मुखवटा,..😊

©स्वप्ना मुळे,… औरंगाबाद.

टाळ्यांच्या गजरात ती खाली बसली खरी पण आता तिला हृदयाची जास्तच धडधड जाणवायला लागली,…नवऱ्याच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात आपण भाषण करून आणि मन मोकळं करून टाळ्या घेतल्या खऱ्या पण घरी गेल्यावर नक्कीच आपण बोलणे खाणार,..ती हळूच चोरून पलीकडे अगदी आनंदात असणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे पहात होती,… आज त्याच्या सोबत ऑफिसात आल्या पासून तिला जाणवत होतं,…आपण घरी अनुभवतो त्यापेक्षा वेगळा माणुस त्यात लपलेला आहे,…अगदी शांत,साधा ,सरळ अश्या कितीतरी पदव्या लोक त्याला भाषणात देत होते आणि ते ऐकून तिला आनंद होण्यापेक्षा दुःखच जास्त होत होतं,… कारण हे लोक सांगताहेत असाच तर जोडीदार अपेक्षित होता आपल्याला,…पण सतत चिडणारा, रागावणार,…मनात आलं तर खूप प्रेम नाहीतर शिव्यांची लाखोली वाहणार नवरा आपल्या नशिबी आला होता,…माहेरी आई वडील नसल्यामुळे भावाने ज्याच्याशी जोड बांधली ती जोड कितीही त्रास झाला तरी सोसण गरजेचं होतं,…आधी लोक लाजेने आणि मग लेकरं झाले म्हणून ती सगळं सहनच करत आली होती,…पण आता आपल्या नवऱ्याची ही ओळख बघून तिलाही वाईट वाटलं हा घरी पण असाच असता तर,…आज त्याच्या संतापी स्वभावाने हरवलेले कितीतरी आनंदाचे क्षण माझ्या व मुलांच्या ओंजळीत असते ना,…😢…ती विचारात हरवली पण परत टाळ्या वाजल्या मुळे ती भानावर आली,…
एक सहकारी नवऱ्याविषयी बोलत होता,…तो म्हणाला मी पेंडसेना निवृत्तीच्या शुभेच्छा तर देतोच पण हि सेवा ज्या अर्धांगिनी मुळे ते पार पाडू शकले त्या अर्धांगिनीला देतो,… आम्ही नोकऱ्या करत असलो तरी,..आपलं शरीराचं व मनाचं कार्य नीट चालावं म्हणून तयार होणार चवदार अन्न म्हणजे डबा त्या अगदी सुंदर पाठवायच्या,..मी नेहमी पेंडसे सोबत जेवायला बसायचो ,..त्यांनी डबा उघडताच सुंदर रंगसंगतीच,..आकर्षक ठेवलेलं सॅलेड,…मऊ लुसलुशीत पोळ्या,…चवदार भाजी,…अगदी बघुनच प्रसन्न वाटायचं, ..पेंडसेच्या 35 वर्ष सेवते त्या डब्याला कधीही,रागवलेला,रुसलेला, चिडलेला रंग नव्हताच कधी तो डबा कायम सात्विक होता,…आता त्यांना जरा ह्यांच्या निवृत्तीने आराम मिळेल,…शुभेच्छा दोघांना पण,…
त्याच्या भाषणानंतर तिला उगाच नवऱ्याने डोळे पुसल्या सारखं जाणवलं,….ती नंतर सगळी भुतकाळातच हरवलेली होती कारण आजच्या ऑफिसतला हा 35 वर्ष सेवा करणारा माणुस हे सगळे जसा सांगत होते तसा ती तिच्या भुतकाळात शोधू पहात होती,…टाळ्या, बुके,शॉल सगळं भोवताली पडून होतं आणि ती हरवलेली,..
कारच दार उघडलं,…”आई उतरतेस ना,..घर आलं आपलं?” मुलाच्या हाकेने ती भानावर आली,.. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,.. तू तुझ्या भावनांना वाट करून दिलीस आज,..तुम्ही जसं सांगताय तसे नव्हतेच कधी माझे मिस्टर हे बरोबरच सांगितलं आहे तू उगाच ताण घेऊ नको,..येतीलच ते आता चल बघू काय म्हणतात,….

ती हॉलच्या झोपाळ्यावर बसली होती,..पेंडसे आले घरात तशी ती भित्र्या सश्यासारखी घाबरली,..ते तिच्या जवळ येऊन बसले,…”झालो एकदाचा निवृत्त,..”त्याने तिच्याकडे बघितलं,.”पेंडसे बाई छानच बोलता की तुम्ही,…”हे खोचक असेल असं तिला वाटलं ती हळूच म्हणाली ,”थोडं चुकीच बोलल्या गेलं का??”
त्यांनी चटकन तिचे हात धरले,..आणि ते रडायला लागले,..चुकीच नाही ग खुप उशिरा बोललं गेलं,..बाहेरच्या जगात मुखवटा ठेऊन वागताना घरातल्या माणसांच्या मन ,भावना ह्यांची जाणीव नाही ठेवली ग आणि आज निवृत्त होताना वाटतंय,…काय कमावलं मग मी,..ऑफिसतला नाव ,पैसा पण तुम्हाला मी तसा कधी भेटलोच नाही हे सगळ्यात मोठं दुःख आता टोचतंय,…😢…
©स्वप्ना मुळे,.. औरंगाबाद..

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा