मुलगी मोठी झाली हो

Written by

एकदा आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये एक 13 वर्षांची मुलगी डिलेव्हरी साठी आली.तिचे लग्न झालेले नव्हते.तिच्या आईवडिलांनी तिच्या गरोदरपनासाठी जबाबदार असणाऱ्या मुलावर बलात्काराची केस दाखल केली होती.त्या मुलाचे वय 21 होते.कायद्यानुसार तो सज्ञान होता.तो मुलगा त्यांच्या घराच्या शेजारीच रहात असे…  तिची डिलेव्हरी झाली.तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.आणि तो मुलगाही लग्नाला तयार झाला.त्यामुळे तिच्या आईवडिलांना केस मागे घ्यावी लागली.

मी विचार केला आधीच्या काळात बालविवाह व्हायचे तेव्हा आपण पालकांना जबाबदार धरायचो…..आता इथे जबाबदार कोण?

का झाले असे. थोडासा आई वडिलांचा इतिहास जाणण्याचा मी प्रयत्न केला.दोघेही रोजमजूर…. पोटाची खळगी भरण्यासाठी ते दुसऱ्या गावाला गेलेले.घरी फक्त आजी जीला नीट ऐकू येत नाही आणि नीट दिसतही नाही. ज्या वयामध्ये त्या मुलीला समजून घेणारं किंवा समजून सांगणारं असं कुणीच नाही. की या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात…..

आई वडील ही परिस्थितीमुळे दूर होते ….

त्या वेळेस परिस्थिती जबाबदार……

काल माझी एक मैत्रीण खूप परेशान होती…. अक्षर शहा तिच्या डोळयात आश्रू होते.तिला कारण विचारले…. तर ती म्हणाली माझी मुलगी रिया मला खूप त्रास देत आहे. उलट उत्तर देत आहे. कारण नसताना चिडत आहे.मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण ती ऐकायला तयार नसते. मला खूप कंटाळा आला आहे अश्या वातावरणाचा.

प्रत्येक वेळेस परिस्थितीच जबाबदार नसते.इथे आपला पालक म्हणून खूप महत्वाचा रोल आहे.त्यासाठी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे बदल समजून घेणे महत्वाचे….

वयोगट:मुलींमध्ये साधारण 10 ते 14,  या वयोगटातील मुलींमध्ये भावनीक,मानसिक आणि शारीरिक बदल घडत असतात.बालवायातून तरुण वयाला जोडणारा दुवा म्हणजे किशोरवय. या वयामध्ये मुलींमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते.त्यामुळे ते स्वतः काही निर्णय घेऊ लागतात….तसंच त्यांच्या मध्ये काहीतरी रीस्क घेण्याचे behaviour तयार होते.(risk taking behaviour).किशोरवयीन मुलीच्या मेंदूमधील भावनांचे centre activate होते. त्यामुळे उगाचच चिडणे, त्रागा करणे, भांडण करणे हे भावनात्मक बदल होत असतात.तसेच विरुद्ध लिंगी व्यक्ती विषयी आकर्षण निर्माण होने.वारंवार आरशामध्ये स्वतःला न्याहाळणे. असे मानसिक बदल होत असतात.

शारीरिक बदल : सुरुवातीला स्तनांची वाढ होते.

वयोगट :9 ते 11……त्यावेळेस कधी कधी एका साईडला छाती दुखते आणि कधी एकच स्तन सुजल्यासारखे दिसते.जे की अगदीच नॉर्मल असते.  गर्भपिशवीचा आकार वाढतो…..  चेहऱ्यावर आणि पाठीवर तारुण्यपिटिका यायला लागतात…..  काखेत केस येणे, जांघेत केस येणे…… मासिक पाळी येणे.सुरुवातीला अनियमित येणारी पाळी वर्ष सहा महिन्यात नियमित होते……

शरीराला एक विशिष्ट आकार येणे. तसेच उंचीची वाढ कमी होते.

पालकांनो आता इथे आपला खूप महत्वाचा रोल आहे.कारण मुलांचं घडणं बिघडणं बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं.

मानसिक बदल:आणि आपला पालक म्हणून रोल

1आपल्या पाल्याशी मैत्रीचे नाते निर्माण करणे.

2 त्यांना वेळ देऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधने, त्यांच्या अडचणी समजून घेणे….कधी कधी त्यांना छेडछाडीला सामोरे जावे लागते तश्या वेळेस योग्य मार्गदर्शन करणे.जेणेकरून आपल्या पाल्याला आपल्याजवळ कुठलीही गोष्ट व्यक्त करणे सुरक्षित वाटेल.

3 आपल्या पाल्याचे छोट्या निर्णयांचे स्वागत करणे.जेणेकरून त्यांनाही आपण consider करतोय याची जाणीव होईल.

4 आपल्या पाल्याची चिडचिड समजून घेणे.त्यावर त्यावेळी वाद न घालता शांत झाल्यावर चिडचिडीचे कारण समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

5 विरुद्ध लिंगी व्यक्ती विषयी आकर्षण निर्माण होने हे जसे नेसर्गिक आहे हे समजून घेऊन आपल्या पालकांची मुस्कटदाबी न करता त्यातील खाचखळगे, संभाव्य धोके आपल्या पाल्याना समजावून सांगणे.

शारीरिक बदल :आपला पालक म्हणून रोल

1 मुरूम किंवा तारुण्य पिटिकांसाठी चेहरा दिवसातून तीन ते चार वेळेस धुणे

2अनावश्यक केस काढण्यासाठी रेझर /हेअर remover चा योग्य वापर समजावून सांगणे

3 मासिक पाळीच्या चक्राकडे लक्ष देणे.सुरुवातीला अनियमित येते, नंतर नियमित होते.त्यांच्या स्त्राव कमी /अधिक आहे का याची माहिती घेणे.त्यांना सॅनेटरी नॅपकिनबद्दल माहिती देणे.स्वतःची स्वछता काय असते हे समजावून सांगणे.अंतर्वस्त्रे स्वच्छ ठेवण्यास सांगणे.  4 सॅनिटरी नॅपकिनचे प्रॉपर disposal समजावून सांगणे.

आहार :आहार संतुलित असेल तर रक्तक्षय( अनेमिया )होणार नाही. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, बिट, टोमॅटो, फळे हे नियमित घ्यावे.  ह्या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या किशोरवयीन मुलींचा काळ एकदम निरोगी आणि सुकर जाईल

लेख आवडल्यास like करा,share करायचा असल्यास नावासहित share करा.

TopBlog Contest November 2019

©® डॉ सुजाता कुटे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा