मुलांच्या परीक्षा आणि पालकांच्या अपेक्षा

Written by

मुलांवर असलेलं अपेक्षेचं ओझं

नवीन वर्ष सपंतच आलय.
दहावी, बारावीच्या मुलांना वेध लागलेत ते अभ्यासाचे.
बस …आता एकच महीना उरलाय परीक्षेसाठी.
मुलांच्या परिक्षेसोबतच आई- वडिलांची पण परीक्षाच…
मी थोडं माझं मत व्यक्त करू इच्छिते. जरुरी नाहीं की सगळ्यांनाच पटेल. ज्यांना आवडेल त्यांनी नक्कीच यावर विचार करावा.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.आपले जीवन सुद्धा स्पर्धेमय झालेलं आहे……स्पर्धा म्हणजे चढाओढ,दुसऱ्याला मागे टाकण्याची प्रवृत्ती….म्हणूनच स्पर्धा ही आजच्या काळाला अनुसरून प्रगतीसाठी फार आवश्यक झालेली आहे.
स्पर्धेशिवाय व्यक्तिमत्वाचा विकास शक्यच नाही,अस आपण वारंवार ऐकतो, म्हणूनच प्रत्येक पालक आपल्या मुलांना स्पर्धेत उतरवू पहात आहे, मग ती स्पर्धा कोणतीही का असेना???
शाळेतील चार भिंतीच्या आत चार पाच तास बसून बिचारा लहानसा जीव थकून जातो,घरी आल्यानंतर परत कुठले ना कुठले क्लाससेस…
त्यासाठी लागणारा वेळ,पैसा,परिश्रम, यासाठी पालक तयार आहेत,मग ती व्यक्ती कारकून का सुद्धा असेना….
स्पर्धेसाठी आपण आपल्या पाल्यासोबत धावतोय, ते सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी….खूप खूप वेड्यासारखं धावत सुटलोय आपण…पण कधी हा विचार करीत नाही, की त्या शिखरावर एकच व्यक्ती असेल, जाच्यात ती क्षमता असेल.
माझा सांगण्याचा उद्देश हाच की,आज शाळेत सर्वच विषय शिकविले जातात,पण प्रत्येक मुलाची आवड भिन्न असते,प्रत्येकाला प्रत्येकच विषय झेपतीलच अस शक्यच नाही.
आपल्या पाल्याची आवड पाहून त्यातच त्याला करिअर करू द्या,जेणेकरून अपेक्षेच्या आहारी जाऊन विद्यार्थी वाईट पावले उचलणार नाहीत.
आजच विद्यार्थी अनेक वाईट मार्गाला लागलेले आहेत, जसे की काही कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या सुद्धा करायला मागेपुढे बघत नाही.
आणि मला वाटतं दिवसेंदिवस हे प्रकार खुप वाढत चाललेय.
मला तरी असं वाटतं की अपेक्षा करा,पण त्यांची बौद्धिक क्षमता ओळखून,त्याच्या आवडीच्या क्षेत्राकडे त्याला वळू द्या.
शेवटी एकच सांगावस वाटतं, की मुलांवर ओझंच टाकायचं असतील तर चांगल्या विचारांचं टाका, चांगले संस्कार त्यांच्यात रुजवा.
मोठा आणि नामवंत तोच बनतो,ज्याच्यात मोठं बनण्याची भावना दडलेली असते.
त्यांचं बालपण हिरावून , बंदिस्त वातावरणात शिकवण्यापेक्षा त्यांना मोकळ्या वातावरणात खेळू द्या..
,©️®️लता जुगल राठी
Share करा पण नवासह ही नम्र विनंती🙏🙏

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.