मॅच्युर नवरा

Written by

सुधीर आई आणि बायकोच्या रोजच्या भांडणांन कंटाळला होता , आई ची चूक दिसली म्हणून आई ला बोललं की आई ला राग येई , बायकोला बोललं की बायकोला राग येई ,
सुधीर ऑफिस संपवून घरी आला की लगेच आईच त्याची बायको स्वाती बदल गाऱ्हाणे करणं चालू व्हायचं, स्वाती ने सकाळ पासून तो येई पर्यंत जे जे केलं त्याची डिटेल्स मध्ये माहिती आई सुधीरला सांगायला चालू करायची , हे सगळं झाल्यावर आई सुधीर ला स्वाती बद्दल भडकवण्याचा प्रयत्न करायची , मग सुधीर ही रागात येऊन स्वाती सोबत खूप भांडायचा , भांडणात स्वाती पण आई किती चुकीचं वागतात हे सांगण्याचा प्रयत्न करायची पण सुधीर एक शब्द ही ना ऐकून घेता स्वातीलाच खूप बोलायला, स्वातीला खूप वाईट वाटायचं , तिची भरपूर गोष्टीत चूक नसायची तरी सुधीर तिलाच दोषी ठरवायचा फक्त आईच्या सांगण्यावरून , याच स्वातीला खूप मानसिक त्रास व्हायचं, सुधीर न स्वाती च भांडण सुरू झालं कीं सुधीर च्या आई ला खूप आनंद व्हायचा , ती सुधीरला यासाठीच भडकवायची , पण सुधीर मात्र आईच्या शब्दावर विश्वास ठेवून स्वातीशी सतत भांडण करायचा,सगळा दोष तिलाच द्यायचं,हे सगळं एकंदरीत 1 वर्ष चालू होता , एकदा तर सुधीर चा रागाचा पारा इतका चढला की त्याने रागात स्वाती च्या कानाखाली दिली , स्वाती जमिनीवर कोसळली , हे पाहून सुधीर भानावर आला , तो तडक आपल्या खोलीत गेला न त्याला स्वतःवर विश्वास च बसत नव्हता की त्याने एका स्त्री वर हात उचलला, त्याला स्वतःचीच घृणा होऊ लागली, आपण एवढे दृष्ट झालोय की आपल्याला आपले संस्कार न मर्यादा पण कळू नये , हेच का आपले संस्कार ,हीच का आपण सुसंस्कृत , सुशिक्षित असल्याची लक्षणे, हाच का आपला पुरुषार्थ या अशा अनेक प्रश्नांनी सुधीर च मन सुन्न झाल, तो स्वाती कडे गेला, स्वातीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हता , तो स्वाती ची माफी मागतो , मला माफ कर बोलतो ,आणि आपल्या खोलीत जाऊन दार लावून शांत बसतो , रात्रभर शांत मनाने विचार करतो ,
आपण एक पुरुष म्हणून खरच कसा वागलं पाहिजे ? काय असतो एक मॅच्युर पुरुष ?
रात्रभर विचार केल्यावर याच उत्तर त्याला सापडत,तो सकाळी उठल्यावर स्वाती न आई दोघींना बोलावतो न सांगतो, मी इथून पुढे दोन स्त्रीयांच्या भांडणात अजिबात पडणार नाही , कारण मी एक पुरुष आहे दोन बायकांच्या भांडणात माझा खरा तर काहीच रोल नाही , तुम्ही दोघीही सुसंस्कृत , सुशिक्षित अहात , तुम्ही तुमची भांडण नक्कीच क्लिअर करू शकता, माझ्यापर्यंत आलीच नाही पाहिजेत , येथुनपुढे मी कधीच आई तुझीही बाजू घेणार नाही न स्वाती तुझीही नाही , मी दोघींशी ही प्रेमानेच वागणार , दोघींशिही सेम वागणूक ठेवणार , आता तुम्ही ठरवा कसा वागायच ते,आणि खरच सुधीर ने तसाच वागायचं ठरवलं,आईने कितीही स्वाती विरुद्ध भडकवण्याचा प्रयन्त केला तरी तो आई च्या बोलन्यात येत नसे, पूर्ण दुर्लक्ष करत असे , न स्वाती ने ही आईबद्दल काही सांगण्याचा प्रयन्त केला की तो सेम तसाच वागत असे, न एकाच वाक्य दोघींनाही सांगत असे ,
“ज्याचे प्रॉब्लेम ज्याचे त्याने क्लिअर करायचे , मी कोणाचाही वकीलपत्र घेणार नाही इथे सगळे शिकलेले आहेत”आता मात्र स्वाती आणि आई वैतागली, एके दिवशी तर दोघींचे कडाक्याचे भांडण झाले , दोघीही एकमेकींशी खूप जोरजोरात भांडत होत्या , सुधीर ने हे पाहिलं, आईला वाटलं माझा मुलगा माझी बाजू घेणार, न स्वातीला वाटलं सुधीर माझी बाजू नाही पण भांडण मिटवण्याचा प्रयन्त करेल , पण सुधीर ने असा काहीही केला नाही , त्याने हेडफोन कानात घातले न एकदम खुश मूड मध्ये सोफ्यावर जाऊन बसला आणि गाण्याचा आनंद घेऊ लागला , हे पाहून दोघीही अवाक झाल्या,हे सुधीरच असा वागणं 6 महिने असाच चालू राहिला , आणि आश्चर्य म्हणजे सासू सुनेमधली भांडण कमी होऊ लागली , कारण त्या सुधीर च्या आशा वागण्याला कंटाळून असा वागायला लागल्या होत्या , आणि बघता बघता दोघीमधले मतभेद पूर्ण संपले , एकमेकींना समजून घ्यायला लागल्या , एकमेकींना जीव लावू लागल्या.सुधीर ने विचार केला खरच किती सोपं असता एकाच घरातल्या 2 स्रियांना एकत्र करून ठेवण , सुधीर च्या मॅच्युर वागण्याने हे घडून आला , आशा सुधीर सारख्या लाखो पुरुषांना सलाम ज्यांच्यात उच्च शिक्षणासोबत एका पुरुषाने आपला कुटुंब एकत्रित राहावं म्हणून कसा सामंजस्य आणि मँचूरीटी ने वागलं पाहिजे हे कळत.

©bestone

पोस्ट आवडल्यास शेअर करायला विसरू नका

पोस्ट copyright सहित शेअर करा

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा