मेहनतीचे फळ

Written by
  1. आई धुणी भांडी करत होती. दारुडा बाप आणि खाणारी तोंडं आठ .मुक्ता सगळ्यात मोठी, जेमतेम 18 वर्षाची .2 वर्षांपासून कुंटबासाठी बार मध्ये नाचत होती. ती अतिशय सुंदर नृत्य करीत असे. तिथे तिची ओळख एका तरुण आणि श्रीमंत अशा श्रीकांतशी झाली. तिच नृत्यावर असलेल प्रेम आणि निष्ठा त्याने हेरली आणि या दलदलीतून तिला बाहेर काढण्याचे ठरविले. बार मालकाशी बोलून त्याने तिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. तिनेही अतिशय कष्टाने श्रीकांतची मेहनत फळाला आणली. एका नृत्याच्या कार्यक्रमाने सुंदर नृत्यांगना म्हणून श्रीकांतने तिला नावारूपाला आणले. तिने बारबाला ही स्वतःची ओळख पुसुन एक उत्तम नृत्यांगना म्हणून स्वतः ची नवीन ओळख निर्माण केली.
Article Categories:
नारीवादी

Comments are closed.