मोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न

Written by

 

रेणूच्या आईला वैताग आला होता लोकांच्या प्रश्नांचा. लग्न झालेली लेक वर्ष भराच्या नातवाला घेऊन रागानेच माहेरी आली होती.

आणि आता महिना होतं आला तरी देखील जायचा पत्ता नाही सासरी. त्यामुळे लोकांना बोलायला विषय मिळाला होता.

बाहेर कुठे गेल्या काकू की त्यांना लोकांच्या प्रश्नांना समोर जाव लागत होतं.
“काय हो काकू रेणू अजून गेली नाही का?
बरेच दिवस झाले न तिला येउन.. ”

काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं रमा काकूंना.

रेणू का आली? याच कारण त्यांना पण माहित नव्हतं… विचारायला गेलं तर रेणू सांगायला तयार नव्हती…
उणे पुरे तीन, साडेतीन वर्ष होत आले असताना..एक छान बाळ असताना, अचानक असं काय झालं ज्यामुळे रेणूला इतकी टोकाची भूमिका घ्यावी लागली? व माहेरी यावं लागलं…
आज मात्र काकूंनी तिला विचारलंच…

“रेणू सांगशील का नेमक काय झालं ते… सगळे लोक विचारतात.. त्यांना काय सांगयच ग” काकूच्या बोलण्यात मुलीविषयीची काळजी होती व डोळ्यात पाणी..😢

“मला नाही जायचं… मी जेंव्हा रागाने आले तेंव्हा रमण होता न तिथे..(रमण म्हणजे रेणूचा नवरा ) त्याने मला थांबवलं नाही….. त्याला माहित आहे माझ्या रागच कारण… मी नाही जाणार स्वतःहून.. तो येईल मला घ्यायला…
मी स्वतःहून परत गेले तर माझ्या सासरचे म्हणतील हिला गरज आहे म्हणून आली परत..

मी घराबाहेर पडताना रमणने एकदाही म्हंटल नाही.. “थांब ग नको जाउ”….त्याने त्या वेळी थांबवलं असत तर….??? ” 😡
 

हो.. जावई बापूंनी नाही थांबवलं… मला सांग, तू तरी कुणाचं ऐकतेस का? किती तुझा तो राग… रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. हे माहित आहे न तुला.

अग कारण तर कळू दे वादाच… काही तरी तोडगा काढता येईल आपल्याला..
अशी किती दिवस बसणार आहेस माहेरी… आम्हाला पण विचारणारे व बोलणारे लोकं आहेत. लोकांनी मागे धुसपूसने सुरु केले आहे. ते वाढायच्या आत तू मला तुमच्या भांडणाचं व माहेरी येण्याचं कारण सांग.. 😢😢😢इतकं बोलून रमा काकूने पदर डोळ्यांना लावला..

 

रेणू कुणाच ऐकेल तर न… तिचा पारा आणखीच चढला. तिला फक्त हेच कळलं की “आईला लोकांच्या बोलण्याची काळजी आहे. स्वतःच्या इज्जतीची काळजी आहे. आपल्या मुलीची नाही ”
आईच्या त्या सांगण्यामागे, रागाने बोलण्यामागे एका आईची काळजी, माया, ममता तिला दिसतं नव्हती. तिला आईच्या बोलण्याचा राग आला आणि त्या रागातच ती..

“हे बघ आई… रमणला माहित आहे काय झालं ते.. त्याला त्याची चूक कळेल व येईल तो मला घ्यायला… मला या विषयावर बोलायचं नाही आता. तू माझं डोकं नको गरम करुस ”
 

रेणूच्या या बोलण्यावरून आणि वागण्यावरून इतक  लक्षात आलं होत कि जे झालं ते दोघातच. नवरा -बायको शिवाय यांच्या वादाचं कारण कुणालाच माहिती नव्हतं… बाकीच्यांना म्हणजे सासरच्यांना देखील यांच्या वादाच कारण माहित नव्हतं..
 

रमा काकूंना कळेना काय करावं..त्या नेहमी मला त्यांचे प्रॉब्लेम सांगत होत्या, आणि रेणू सुद्धा माझ्याशी मैत्रिणीसारखी राहायची.. त्यामुळे काकू माझ्या कडे आल्या… काहीशा नाराज होत्या. त्यांना मी बसायला लावल आणि छान कडक☕ चहा दिला. आणि हळूच विषयाला सुरुवात केली
“काकू काय झालं सांगाल का?”

 

“जया मी कंटाळले ग या रेणूला व लोकांच्या प्रश्नांना. काल तिला कारण विचारलं ग मी निदान वादाचं कारण तरी सांग पण ही शहाणी काही म्हणजे काहीच सांगायला तयार नाही…
तुझं नि तिच छान पटायचं न ग. तुझी आणि तिची छान मैत्री आहे न. कॉलेजच्या सर्व गप्पाटप्पा सांगायची न तुला रेणू. आता विचारून बघ न ग तू तिला. तुला सांगेल तर..प्लीज ग जया.. 🙏
काकू, प्लिज काय म्हणताय.. असं म्हणून मला परकं नका करू. तिला विचारायचं बऱ्याच दिवसाचं होतं माझ्या डोक्यात. पण कस विचारू मी स्वतःहून… शेवटी तिची पर्सनल लाइफ आहे.

आणि मला देखील वाटलं की रेणू स्वतः येईल सांगायला. पण अजून तिने विषय काढलाच नाही हो माझ्या जवळ.

काकू :- तुला तर माहीतच आहे ग ती किती हट्टी आहे रेणू , राग पण लवकर येतो तिला. पण लग्नानंतर समजदार व्हावं लागत न. ही अशी कशी ग… ☹️☹️

जया तुला सासरी येउन 10वर्ष होतील… पण तू कधीच रागाने माहेरी गेलेली नाही बघितलं मी. तू पण हिच्याच वयाची होती न लग्न करून आली तेंव्हा. तुला नव्हता काहीच त्रास, असेलच न.. काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागतो. संसार म्हंटल तर भांड्याला भांड लागणारच आणि ते वाजणारच.
 

बर हिच काय बिनसलं ते सांगावं तरी… त्यावर उपाय करता येईल. एकतर नातं तोडून टाकता येईल नाही तर दोघांना एकत्र बसवून समजूत काढता येईल.

कंटाळले ग बाई मी या पोरीच्या अशा वागण्याला आणि लोकांच्या प्रश्नाला देखील. तू समजव ग बाई तिला… छोटं बाळ आहे.. निदान कारण तरी कळू दे म्हणा आम्हाला…” इतकं बोलेपर्यंत काकूंचे डोळे पाणावले.. 😢😢त्या

पाणावलेल्या डोळ्यांनी व आशेनी काकू माझ्याकडे बघत होत्या.

काकू मी आधीच बोलणार होते तिच्याशी पण कस बोलू मी शेजारीच न तुमची… आणि लोकांच्या प्रश्नामुळे तुम्हाला होणारा त्रास दिसत होता मला. त्यात आणखी मी भर नको घायला, म्हणून मी तुम्हाला सुद्धा काहीच नाही म्हणाले.

 

मला वाटत होत रेणू स्वतः येईल अधिसारखी “वहिनी.. वहिनी…” करत आणि सगळं सांगेल.
पण

तस काहीच झालं नाही. काकू मी बोलते उद्या तिच्याशी.. प्रयत्न करून बघते भांडणाचं कारण काय आहे ते जाणून घेण्याचा. तसं तुम्ही उद्या गजानन मंदिरात आरतीला जाता न तर त्याच वेळात येउन विचारेल मी तिला माझ्या पद्धतीने.

काकू :- हो विचार बाई एकदाच व काढ तिची समजूत. तिला मात्र कळू नको देऊस मी हे करायला लावल म्हणून. तिचा निर्णय तिला घेऊ दे… आपण कोणत्याही परिस्थितीत तिच्या सोबत आहोतच.
इतकं बोलून काकू घरी गेल्या. मी त्यांना म्हणाले तर कि मी बोलते …

पण… काय?? व कस??? तिच्याकडून वादाच, माहेरी येण्याचं कारण काढून घ्यायचं याच विचारात होते… विचारा विचारात माझ्या कामात देखील गडबड झाली.

झोपायला गेले तरी झोप येईना. या सर्व विचारात रात्री माझा कधी डोळा लागला कळलंच नाही.
नवीन पहाट नवी उमेद देते म्हणतात न.. बस त्याच उमेदीने मी बोलायचं ठरवलं..

आज गुरुवार म्हणजे काकू गजानन महाराजांच्या मंदिरात आरती व भजनाला जातील संद्याकाळी.. एक तास तरी तुम्ही परत यायचं नाही असं सांगितलं होतच मी ..

तीच वेळ रेणू सोबत बोलण्यासाठी योग्य आहे , म्हणून मी रमा काकूंच्या घरी गेले.

“काय करतेयस ग रेणू… आणि तुझं पिल्लू कुठे आहे..? ”

रेणू :- ये ग वहिनी… बच्चू आई सोबत मंदिरात गेलाय..

मी:- आले ग.. काय चाललंय तुझ हल्ली. म्हणजे बरेच दिवस माहेरी मुक्काम झाला.. मला काही प्रॉब्लेम नाही ग बाई त्याचा. तू काही माझ्या घरी नाही येत राहायला पण

आपली मैत्रीण अडचणीत तर नाही न..? याचा विचार केला इतके दिवस आणि आज हिम्मत करून तुला विचारायची हिम्मत केली.

रेणू :- काय वहिनी हे.. मैत्रीण म्हणतेस न मग विचारायचं होतं न आधीच.

मी :- विचारलं न आता सांग की मग.. काय बिनसलं तुझं? तू जॉब करायचीस न सासरी मग इतक्या सुट्ट्या कशा काय मिळाल्या तुला? आणि हे बघ रेणू.मला न नीट व सरळ सांग बाबा.

रेणू :- अग आधी करायचे ग जॉब.. मग बच्चू झाला तेंव्हा काही महिने सुट्ट्या घेतला. जेंव्हा जॉईन व्हायचा विचार केला तेंव्हा माझा जीव बाळात घुटमळला. याची मला व याला माझी इतकी सवय झाली एकमेकांची.

आणि बच्चूला न माझ्याशिवाय कुणीच पाहिजे नसते.. रमण पण म्हणाला बाळाला बघ… जॉब नको करू… नंतर करशील तुला वाटेल तर. तू तिकडे नोकरीं करशील अर्ध लक्ष इकडे व अर्ध लक्ष तिकडे. आणि आता बाळाला तुझी जास्त गरज आहे. त्यामुळे मी जॉब सोडला कधीचाच.

मी :- अरे वा ! छान.. किती समजदार आहे ग रमण .. नाहीतर आजकालची मूल, शिकलेली मुलगी करतातच या साठी कि तिने जॉब करून चार पैसे कमावले पाहिजे.. नशीबवान आहेस.. रमणसारखा समजदार नवरा मिळाला तुला..

रेणू :- कसलं नशीब ग वहिनी.. महिना झाला मी इथे येउन.. आला का तो मला घ्यायला… काळजी आहे का त्याला आमची. साधा फोन तरी करावा तर ते देखील नाही.

जस काही सगळी गरज मलाच आहे. त्याला मी असले काय नी नसले काय काहीच फरक पडत नाही.
मग मला देखील फरक पडत नाही त्याचा.

मला जे पाहिजे होत तेच झालं…. रेणूनेच विषय काढला…

मी :- एक विचारू का ग रेणू … बघ तुला पटलं तर तू सांग मला.. नाही तर काही जबरदस्ती नाही. शेवटी तुझी पर्सनल लाईफ आहे आणि मी कितीही झालं तरी शेजारीच.

रेणू :- विचार न ग वहिनी… शेजारी म्हणून तू परकं केलंस का मला. तू मैत्रीण आहेस ग माझी वहिनी. बस मी चहा ठेवते…

मी :- चहा राहू दे. तू जर मला खरच मैत्रीण मानत असतीस तर…. तुझी प्रॉब्लेम मला स्वतः येउन सांगितली असतीस. तूच तर परकं केलंस मला.

आणि

….खरंच तू मला आपलं समजतेस तर .. तू मला हे सांग कोणत्या गोष्टीचा राग आला तुला जे तू स्वतः माहेरी निघून आलीस…?

रेणू :- वहिनी ते मी नाही सांगू शकत.. प्लिज ते नको विचारूस मला… प्लीज काही गोष्टी नाही न सांगू शकत आपण सगळ्यांना. तशीच ही देखील आहे.. नको न विचारू मला. म्हणूनच तर मी स्वतः आले नाही तुला काही सांगायला.

मी पुन्हा अनुत्तरीतच राहिले.

काकूंचे पाणावलेले डोळे आठवले आणि मी पुन्हा बोलायला लागले.. कारण काकूंनी खुप विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली होती. आणि माझंही मन स्वस्थ बसू देत नव्हतं मला. मग काय पुन्हा दुसऱ्या पद्धतीने तिला बोलत करण्याचा व कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी..

 

बर… नाही विचारत तुला काही. तुला वाटेल तेंव्हा सांग.. पण एका प्रश्नाचं खरं.. खरं उत्तर देशील का??

रेणू :- माहेरी येण्याचं कारण सोडून विचारत असशील तर सांगेल मी..

मी :- नाही विचारत म्हणाले न तुला मी. दुसराच प्रश्न आहे माझा..

रेणू :- विचार मग काय विचारायचं आहे ते.

मी :- तुला वाटत का तू सासरी परत जाव म्हणून????
क्रमशः…….

आता रेणूचं काय उत्तर असेल? आणि त्यावर जया काय तोडगा काढेल??

सरळ उत्तर देण तर टाळलं रेणूने.. मग जया तिला कस व कोणत्या पद्धतीने समजावून सांगेल?

जया सोबत बोलल्यावर रेणू जाईल का सासरी परत??

यासगळ्यांची उत्तरे पुढील भागात.. तो पर्यंत विचार करा.. 🤔🤔
Like करा, कमेंट करा आवडल्यास शेअर नक्की करा पण नावासहित. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा ©®जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल..

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा