मोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)

Written by

मोडका संसार वाचवण्यासाठी भाग 2

मी रेणूला विचारलेला प्रश्न की “तुला सासरी परत जावस वाटत का?” यावर रेणूचं उत्तर आणि भाग दोन पुढील प्रमाणे..

रेणू :- हो ग वहिनी जावस वाटत आहे. रागाच्या भरात निघून आले मी माहेरी. माझा बच्चू पण “पापा.. पापा ” करतो. तिकडचे आजी -आजोबा सगळ्यांची आठवण येते त्याला.
माझे सासरे त्याला संद्याकाळी रोज फिरायला न्यायचे. आणि सासूबाई देखील मंदिरात गेल्या की याला घेऊनच जायच्या. त्यामुळे त्याला फिरण्याची एव्हडी सवय न.. इथे बाबा काही बाहेर जात नाही. आई घेऊन जाते कधी -कधी मंदिरात आजच्यासारखी.

आणि माहिती आहे का ग वहिनी त्यांची आत्या तर कॉलेज मधून आली की याला घेऊन जाम मस्ती करायची.. स्वारीला तर जणू आत्यासोबत खेळायची वाटच असायची.. “कधी आत्या येते आणि मी मस्ती करतो ”

मी :- अरे वा भारीच लळा ग पिल्लू ला घरच्यांचा. आणि ते देखील का नाही लाड पुरवणार एकुलता एक नातू त्यांचा आणि पहिला देखील. तुझी नणंद तर खुश होईलच न तीच प्रमोशन केल या बच्चू ने.. “आत्या “म्हणून..
मला एक नाही कळत… सगळं आनंदी आंनद आहे. तुझ्या बोलण्यात सासूबाई, सासरे नणंद यांच्याविषयी सांगताना कुठेही कटुता, तिरस्कार नव्हता.. मग नेमक झालं काय की तू माहेरी आलीस.
मी विचारत नाही आहे तुला, मी स्वतःचं विचार करतेय. 🤔🤔🤔🤔

कारण आजकाल मुली सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी येतात. आणि तू तर सगळं चांगलंच सांगत आहेस… म्हणून मला आपला विचार आला??? 🤔🤔🤔🤔

रेणू :- वहिनी तू घुमून -फिरून पुन्हा त्याच प्रश्नावर आलीस बघ…. अग नाही न सांगू शकत मी तुला काय झालं ते.
मी रागात निघून आले तेंव्हा रमण होता न तिथे उभा… ढिम्म कुठचा.. फक्त बघत राहिला. “नको न ग जाऊ ” असं एकदा म्हणाला असता तरी थांबले असते न मी 😔😔😔.
बर इथे आल्यावर कॉल करून समजूत तरी काढायची माझी.. तर ते देखील जमत नाही त्याला.. 😔☹️☹️.
साधा मुलाशी बोलायला तरी कॉल करावा तर नाही 😠😠😠
कसला इगो आहे इतका काय माहिती 😠😠.
जर त्याला काही गरज नाही माझी बच्चूची तर काय मलाच गरज आहे का त्याची… तर अजिबात नाही.
मला देखील त्याची काहीच गरज नाही.

आता, मला वाटत आपलं कधी, जाव परत म्हणून.. पण मी जर गेले न.. तर रमण म्हणेल व बाकीचे देखील “आली गेल्या पावली परत, हिलाच गरज आहे आमची.आम्हाला नाही हिची गरज. ”
खरच का ग वहिनी मला गरज आहे??
राहू शकते मी पण मुलाला घेऊन.. रमण ने यायला हवं होतं न मला घ्यायला… पण तो नाही आला… मग मी पण जाणार नाही… 😠😠😠😠अतिशय रागात बोलत होती रेणू हे सगळं…

आता हिला काय बोलाव व कस बोलाव याचा विचार करत होते. इतकं मात्र कळलं की.. या नवरा -बायको दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. आणि “तो येईल घ्यायला तरच जाईल परत..” म्हणजे रेणूला परत जायचं आहे पण हिचा इगो आडवा येतोय.
आणि राहिली गोष्ट रमण ची तर त्याची बाजू आपल्याला माहितीच नाही… पण आपल्या रेणूचा राग तर परिचित आहेच मला…. सगळा विचार करून शेवटी मी बोलायला सुरुवात केली.

बर बाई.. शांत हो.. पटत मला तुझं. आता मी काय सांगते ते नीट ऐक, मधे मधे बोलू नकोस. तुला पडलेले प्रश्न मला नंतर विचार.पण माझं एकदा शांतपणे ऐक आणि विचार कर.

तुमच्यातला वादाचा मुद्दा फक्त तुम्हालाच माहित आहे.कारण तू ते सांगायला तयार नाहीस. रमण ची बाजू आम्ही विचारायला जाणार नाहीच. तू आमची आहेस व तुझ्यावर विश्वास आहे पण तुझ्या 😠😠रागावर नाही ग बाई विश्वास..

त्यामुळे चूक तुझी कि रमणची हे मी नाही सांगू शकत. मात्र… तू प्रांजळ पणे सांगू शकतेस की चूक कुणाची होती मला नको सांगू स्वतःला सांग..

हे बघ रेणू…. चुका दोघांच्याही असू शकतात..त्यातही जास्त चूक कुणाची हे तुम्हालाच माहित. तुमच्या या वादाचे साक्षीदार तुम्ही दोघेच आहात. निपक्षपातीपणे उत्तरही तुम्हीच देउ शकता स्वतःच्या मनाला.
मी तुझी वहिनी या नात्याने तुझ्या बाजूने विचार केला,तर तू योग्य आहेस असच मला म्हणावं लागेल.
पण… तुला वाटत “त्याने घ्यायला यावं” सगळा राग विसरून याचाच अर्थ तुला जायचं आहे परत सासरी,
मात्र

स्वतः नाही.. त्याने यावं घ्यायला. याचाच अर्थ तू ज्या गोष्टी साठी माहेरी आलीस ती तुलाच शुल्लक वाटत असेल असं मला आता तुझ्या बोलण्यावरून तरी वाटत.
मी आताही तुला उत्तर विचारत नाही आहे. माझा मी लावलेला तर्क सांगतेय.

आता विषय आहे तू जायचं परत सासरी कि त्याची वाट बघायची तुल घ्यायला यायची…

त्यावर बोलतेच मी थोडं.. तू ऐकून घे, पटलं तर त्यातलं घे काही नाहीतर मला वेडी समजून सोडून दे. पण आज मी बोलणार तुला. कारण काकूंना जो त्रास होतोय तो नाही बघवत मला..
आणि

हो.. त्रास तुझा नाही होतं. लोकांच्या बोलण्याचा होतोय. तू मुलगी आहेस त्यांची, तुझी जबाबदारी त्यांचीच ग पण तू काही सांगत नाही म्हंटल्यावर आईच्या जीव कासावीस नाही का होणार..

रेणू.. :- म्हणजे आईनी तुला सांगितलं का माझ्याशी बोलायला..?

मी :- त्यांनी कशाला सांगायला हवं..काल कॉलनीतल्या बायांची मिटिंग होती कोजागिरी पोर्णिमेसाठी. दरवेळी काकू हिरहिरीने सहभागी होऊन बोलायच्या पण काल अगदी गुमसुम होऊन शेवटी बसल्या होत्या, सगळ्यांची नजर चुकवत. आणि समोर बायांच्या गोष्टी सुरु होत्या तुझ्या विषयी “आली बर रमाबाईंनची फटाकडी पोर माहेरी ” नाहीच नांदली शेवटी सासरी ” “मला तर आधीच माहिती होतं हिचा काही निभाव नाही लागणार सासरी ” असं बरंच काही बोलणं सुरु होतं. आणि मी ते ऐकून देखील गप्प होती. कारण तू कधी मला तुझा हा प्रॉब्लेम सांगितला नाहीस. तुझी आई काय.. बिचाऱ्या खाली मान टाकून बसल्या होत्या. त्यांच्या गोष्टीकडे कानाडोळा करत.

म्हणून मी ठरवलं तुझ्याशी या विषयावर बोलायचं. म्हणजे तुला जायचं नसेल सासरी तर माझी एक मैत्रीण वकील आहे. आपण तिच्याकडून लिगली नोटीस पाठवू त्याला. आणि घटस्फोट घेता येईल….

रेणू :- काहीतरी काय बोलतेस वहिनी… डायरेक्ट घटस्फोट घ्यायचं काय म्हणतेस. इतकंही काही झालं नाही जे गोष्ट तोडण्यावर येईल. मला जरा राग आलाय, आणि तो घ्यायला यायला हवा, इतकंच वाटत मला.

मी :- अच्छा म्हणजे तुला वाटत तू स्वतः गेलीस तर  ते म्हणतील “हिला गरज आहे, म्हणून आली ”  हो न… बरोबरचं आहे तुझं.. तू स्वतः गेलीस तर तुझा इगो दुखावेल तुला कमीपणा येईल सासरी.. मग तुझीच जास्त चूक असली तरी तू काही जायचं नाही.. “येईल रमण घ्यायला ”

रेणू जरा विचारात गुंतली होती.. त्यावरून इतकं कळलं होतं.. की चूक मॅडमची जास्त होती आणि माझ्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम होतं होता.माझं बोलणं ती आता शांतपणे ऐकत होती. मग काय मी देखील माझं बोलणं कंटिन्यू केल…..

अग रेणू रमण व त्याच्या घरचे देखील म्हणतं असतीलचं की “ती स्वतः गेली, आपण तिला जा नाही म्हणालो,.. येईल तिची ती राग शांत झाल्यावर..” तूच म्हणालीस न तू निघून आलीस, रमण किंवा त्याच्या घरच्यांनी नाही न काढलं तुला हात धरून बाहेर??? हा प्रश्न देखील तूच विचार स्वतःला, मला नको बाई उत्तर.

तुझे सासू-सासरे रमणला म्हणतं असेल “तू गेला घ्यायला कि याला गरज आहे म्हणून आला हा असं तुझे सासरचे म्हणतील.नको जाऊस, जावई आहेस तू. तुझा मान मोठा. आणि तुझी चूक नाही न मग तू का लहान बनून जातोस तिला घ्यायला. येईल गेल्या पावली परत ”
आता बिचारा रमण मोठ्या संकटात सापडला… इकडे बायको.. मुलगा हवा आहे आणि तिकडे आई -बाबा असं म्हणतं आहे. कुणाच ऐकायचं व कुणाच नाही.. हा यक्षप्रश्न त्याच्या समोर उपस्थित झाला असेल.

म्हणजे मी आपला एक अंदाज लावतेय ग… बघ तुम्ही दोघेही.. लोक काय म्हणतील…घरचे काय म्हणतील याच विचार करून चुपचाप एकमेकांची वाट बघत बसले आहात..

“मीच का जाउ? “, “तो येईल घ्यायला ” , “ती येईल गेल्यापावली परत ” यात मला फक्त इगो दिसतोय… तो कुणाचा ते तुमच तुम्ही ठरवा.
अग रेणू गरज दोघांनाही असते ग. मात्र सगळ्यात जास्त गरज असते ती बाळाला आई व बाबा दोघांची याचा विचार केलास का?
“मीच विचार करू का?” हा प्रश्न आला असेल तुला.. पण माझ्या बोलण अजून संपलेलं नाही. मी याचं उत्तर देण्याऐवजी तुलाच ते मिळेल जर स्वतःच्या मनाला चाचपडल तर.. काही प्रश्न तुझ्यातल्या आईसाठी, पत्नीसाठी, सुनेसाठी, वहिनी साठी. याची उत्तर मला नको देऊस तुझी तूच शोध विचार कर आणि निर्णय घे.

ज्या गोष्टीवरून वाद होत होता…ती खरंच खूप महत्वाची होती का जेणेकरून तू माहेरी येण्याचा निर्णय घेतलास ? 
त्या वादाच्या कारणामुळे तुला रमण सोबत राहण्याची काहीच इच्छा नाही का?

या वादात चूक दोघांची अर्धी -अर्धी होती का????
रमणची जास्त चूक व तुझी खुप कमी चूक होती????

तू इतके दिवस झाले माहेरी आहेस.. म्हणजे तुला आता रमण शिवाय राहायची सवय झाली का?????

मुलाला घेऊन आयुष्य भर एकटी राहशील का ?

दुसरं लग्न केल तू तरी तुझ्या मुलाला तो दुसरा बाबा स्वीकारेल का त्याला रमण सारखं प्रेम देईल का????

सासू -सासरे, नणंद यांचा किती वाटा आहे तुमच्या भांडणात??? ते तुला त्रास द्यायचे का घर सोडून जाण्याइतपत??
हे काही प्रश्न तू स्वतःला विचार आणि त्याच उत्तर शोधून या सगळ्यावर तोडगा काढ.

मी तुला दोष देत नाही आहे किंवा तुझीच चूक आहे असं देखील म्हणतं नाही आहे. पण काही गोष्टी या रागाच्या भरात करून बसतो आपण आणि मग त्याचा पच्छाताप करत बसावं लागत आयुषभर..

मी स्त्रियांनीच तडजोड करावी असं नाही म्हणतं ग…. पण हा समाज स्त्रीलाच तडजोड करायला भाग पाडतो.

त्या समाजाने अलिखित नियम केला आहे हा. चूक असो वा नसो स्त्रीने हार मानायची. मी तुला हार मानायला लावत नाही आहे. जर तुला सासरच्यांनी चूक वाटत असेल जास्त आणि परत जायचं नसेल तर वकील करूच आपण. मात्र वादाचं कारण शुल्लक असेल तर….. 🤔🤔🤔तुझा रागीट स्वभाव याला जास्त कारणीभूत असेल तर 🤔🤔🤔यासाठी तुला, स्वतःला चाचपडायला काही प्रश्न दिलेत मी

समाजाने पुरुषांना वेगळं महत्व दिल आहे. “पुरुष श्रेष्ठ…त्याची चूक असली तरी त्याने ती मानायची नाही” मी असं नाही मानत ग..

पण… समाज आपण बदलू शकत नाही…
रमण ची इच्छा असेलही तुला घ्यायला यायची पण घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल याला घाबरून तो नसेल येत तुला घ्यायला.
कारण हाच समाज त्याला म्हणेल न “पुरुष कधी बायको पुढे झुकतो का.येईल ती परत तिच गेली न.यायची येईल नाहीतर तुला काय कमी आहे मुली देणाऱ्यांची ” आता सांग अशा लोकांच्या बोलण्याला काय उत्तर देईल तो. तो देखील याचं समाजात घडलेला, वाढलेला पुरुष आहे. काय बरोबर न माझं.
माझं बोलणं ऐकून रेणू निशब्द झाली होती आणि विचारांच्या सागरात हेलकावे घेत होतं तीच मन. चारही बाजूने तिच्या विचार शक्तीवर घाला केला होता मी. त्यामुळे ती बुचकळ्यात पडली होती. त्यात भरीस भर म्हणून मी आणखी एक शेवटचा बॉल टाकलाच.. यामुळे हिची विकेट जायला हवीच हाच मूळ उद्देश होता.

काय ग रेणू तुला रमणचा एखादा जवळचा मित्र माहित आहे का? नाही म्हणजे त्याला कॉल करून त्याच्या कडून रमणला काय वाटत हे कळत असेल तर बघ.
त्याला पण तू यावंसं वाटत असेल पण…. ” येईल राग शांत झाल्यावर.. किंवा लोक मलाच बोलतील ”  याचा विचार करत बसला असेल तो… तो तिकडे विचार करत बसेल व तू इकडे..

तो येईल घ्यायला ” “ती स्वतः परत येईल”  यातआता महिना होतं आला… या महिन्याचं रूपांतर 1वर्षात…. मग 3 तीन वर्षात …आणि 5वर्षात किंवा त्याहूनही जास्त काळ होऊ शकतो. वर्षामागून… वर्ष निघून जातात.आणि एकमेकांची वाट बघत शेवटी नात्यातला जिव्हाळा संपतो. आणि नातं तुटायला फक्त सरकारी कागद नाममात्र ठरतो… कारण नातं तर या पाच वर्षात कधीचेच तुटलेलं असते.
आणि खरं सांगू का रेणू… यात खऱ्या अर्थाने भरडली जातात चिमुकली मूल. आणि संपत जातात आपली उमेदीची वर्ष, विरहात… वाट बघण्यात.
बघ रेणू तू चुकलीस असं नाही म्हणतं मी.. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, रागात निर्णय घेणं महागात पडू शकत. किंवा आपला इगो कुरवाळत बसण्याची देखील कधी कधी फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. बऱ्याच जणींचं असं आयुष्य बरबाद होताना बघितल मी आणि तेही शुल्लक गोष्टीवरून.
वेळ निघून गेल्यावर मग त्या पच्छाताप करत बसल्या.. “आधीच निर्णय घेतला असता तर बर झालं असत..”
आणि हो….. पुन्हा एकदा वादाचा मुद्दा इतका महत्वाचा होता का, कि तुला माहेरी यावं लागलं?याचा विचार नक्की कर.
स्त्रियांनी हार मनू नये ग …पण थोडा जास्त विचार करावा असं मला वाटते. आपली चूक नसेल तर हिम्मतीने लढावं… आणि जर आपली चूक असेल तर तितक्याच हिमतीने ती स्वीकारून संसार सुखाचा करावा…

खूप बोलले का ग मी…..तू माझीच आहेस… तुझ्याविषयी आपुलकी आहे म्हणून बोलले मी…

रेणू शांत झाली होती..विचारात गुंग झाली होती.. मला जे हवं होतं ते झालं होतं. तिच्या मनात मी प्रश्नांचा कल्लोळ माजवला होता. त्यामुळे ती नक्कीच ती कोणत्यातरी निर्णयापर्यंत पोहचणार हे नक्की होतं.

इतक्यात काकू आल्या मंदिरातून.. आम्ही नजरेनेच इशारा केला एकमेकींना.. ” घे ग जया प्रसाद, कधी आलीस? काय ग रेणू चहा केलास कि नाही वाहिनीसाठी की बसल्या गप्पा करत”  असं बोलून काकूंनी वातावरण बदलवल…. रेणूचा बच्चू देखील तीच्या मांडीवर येउन बसला…

मीच नाही म्हणाले हो काकू.. चला येते मी स्वयंपाक करायचा आहे अजून माझा… येते ग रेणू … असं म्हणून मी घरी आले..  ती मात्र विचारच करत होती. मी जात आहे याचं भान देखील नव्हतं रेणूला.
आता रेणू काय विचार करते व त्यातून तिचा निर्णय काय घेते ती…??

परत जाईल का ती सासरी की बसेल कुरवाळत आपला इगो…? हे सगळ पुढील भागात.
तोपर्यंत उत्सुकता ताणून ठेवते…..
तुम्ही देखील विचार करा काय होऊ शकत पुढे 🤔🤔🤔किंवा काय करायला हवं रेणूने हे कमेंट मधे सांगू शकता… तर मग करा विचार जुळवायच नातं की तोडायचं???? 🤔🤔
क्रमशः…….. ✍️, ©जयश्री कन्हेरे -सातपुते
लेख आवडल्यास like, कमेंट करा. तुम्हाला काय वाटत रेणू काय करेल हे नक्की सांगा… कमेंट मधे शेअर करायचा असेल तर नावासहित करा. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा. फोटो साभार गुगल…

प्रतिक्रिया व्यक्त करा