मोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न भाग 3

Written by

भाग एक इथे वाचा https://irablogging.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/

आता भाग अंतिम पुढील प्रमाणे.

रेणूच्या मनात काय चाललंय याचा विचार करतच मी घरी आले. कालही रेणूच्या विचाराने कामाचा बट्ट्याबोळ झाला होता.. आणि आजही कामात मन लागत नव्हतं.

“मी जरा जास्तच बोलले का रेणूला?? 🤔🤔🤔

तस बघितलं तर तिला बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही शेजारी म्हणून. तिला वाईट वाटलं असेल का,  माझा राग आला असेल, की ती मी सांगितल्याप्रमाणे विचार करून योग्य तो निर्णय घेईल.” असे बरेच प्रश्न.. विचार माझ्या डोक्यात युद्ध करत होते.

या विचारांच्या कल्लोळात नाही मुलांकडे लक्ष आणि नाही घराकडे. त्यातच.. आजही उशिराच कधीतरी डोळा लागला माझा हे मला कळलंच नाही…

तिकडे रेणूची स्तिथी देखील काही चांगली नव्हती.
तिच्यातल्या दोन रेणू डोकं वर काढत होत्या एक चांगली व एक रागीट. टीव्हीतल्या सारखं

चांगली रेणू म्हणतं होती… “वहिनी जे काही बोलत होती तीच योग्यच तर आहे. आपणही आई आहोत. बच्चूला चुकून जरी इतर मुलांचा धक्का लागला व तो रडायला लागला तर त्याचा त्रास मला जास्त होतो. आणि किती रागावते मी त्या दुसऱ्या मुलांना.
कारण.. माझं मन.. एका आईच मन.

 

मग त्याप्रमाणे माझ्या आईच देखील माझ्यासाठी मन दुखतं असेलच न 🤔🤔

 

माझा संसार सुखी व्हावा असं तिलाही वाटते म्हणून ती मला कारण विचारते माहेरी येण्याचं.. आणि मी आहे की तिलाच उलट बोलून गप्प बसवते. आईला किती वाईट वाटत असेल न.?? 🤔🤔🤔

वहिनीने सांगितल्या प्रमाणे विचार केला… तर खरच 3..4..5….वर्ष निघून जातील का आमच्या इगो मुळे? तो आतापर्यंत आला नाही घ्यायला आणि खरंच समाजाला घाबरून तो आलाच नाही तर 🤔🤔🤔
मी आणि बच्चू कस राहू त्याच्याशिवाय?? इतकंही मोठा कारण नव्हतंच न भांडणाचं आमचं, 🤔 मीच जास्त ताणात गेले… माझा रागीट स्वभाव कदाचित कारणीभूत असेल याला. 🤔
किती चिडचिड, रागराग करते मी. माझं अल्लड पण अजून गेलेलं नाही का??? पण या अल्लडपणामुळे जर मला रमण घ्यायला आलाच नाहीतर 🤔🤔🤔
नाही.. नाही… नाही.. रेणू ,
अगदी शुल्लक गोष्टीवरून री मीच ओढायची. त्याने पूर्ण स्वातंत्र्य दिल होतं मला, घरचे पण समजदार आहेत. आणि का म्हणून प्रत्येकवेळी ते माझं ऐकतील.

आपल्या रागाबद्दल त्या दिवशी आई व आज वहिनी पण बोलून गेली. 🤔🤔म्हणजे नक्की सगळा घोळ माझ्या पटकन येणाऱ्या रागाने घातलेला दिसतोय… आणि हा घोळ मला एकटीलाच निस्तराव लागेल मीच घातला आहे न. 🤔🤔

तिच्यातली दुसरी रेणू डिवचते तिला… अग रेणू तुझा स्वभाव माहिती आहे रमणला, मग आता काय झालं सहन न करायला?? त्यानेच यायला हवं तुला घ्यायला आणि तुझी माफी पण मागायला हवी. वाट बघ अजून काही दिवस येईलच तो तुला घ्यायला. नाही आला तर तू खंबीर आहेसच की एकटी राहायला.

टेन्शन नको घेऊस आणि त्या वहिनीच मनावर पण नको घेऊस. झोप शांत

पुन्हा तिच्यातली पाहिली रेणू….. काय झोपतेस रेणू, इथे तुझ्या आयुष्याची वाट लागतेय आणि तू शांत कशी काय झोपू शकतेस???

वहिनींनी म्हंटल ते योग्यच आहे. अनुभव आहे त्यांना 10वर्षाचा, या दहा वर्षात तुझ्यासारख्या कितीतरी केस बघितल्या असेल त्यांनी. तुझ्यात त्यांचा जीव आहे म्हणून इतकं समजवायला आल्या त्या. त्यांनी म्हंटलेलं कुठे चुकल ते सांग??
हा दोन्हीही बाजूने विचार करण्यापेक्षा… वहिनींनी सांगितल्या प्रमाणे विचार स्वतःला काही प्रश्न.. चाचपड तुझं मन. इथे कुणी परकं येणार नाही तुला सांगायला. खरी उत्तरे दे आणि त्यातून काय तो निर्णय घे.

वकील, वहिनींची मैत्रीण आहे. म्हणजे दोन्हीही बाजूने तुला सपोर्ट करायला तयार आहेत वहिनी आणि घरचे देखील.. तेंव्हा विचार कर व निर्णय घे.. रेणू…. निर्णय घे

रेणूचे मन.. दोन्हीही बाजूने बोलत होते…

आता काय करावं??? कुणाच ऐकावं??
यातच रेणू जोरात ओरडली. “तुम्ही शांत बसा ग दोघीही “😠😠

तिचा आवज ऐकून रमाबाई धावतच लेकीच्या खोलीत आल्या “रेणू काय झालं बेटा? किती जोरात ओरडलीस आणि कुणावर ग?? ” काळजीने आईच मन रेणूला विचारत होतं.

 

रेणू शांतपणे…. काही नाही ग आई असच.

 

तू झोपली नाहीस बेटा अजून??

झोपते न आई आता.. बच्चू उठला नाही का ग अजून दूध प्यायला?

 

उठला होता.. दिल मी त्याला दूध आणि झोपवलं. माझाही डोळा लागला. मला वाटलं तू नेशील त्याला माझ्याजवळून. आता तुझ्या ओरडण्याने जाग आली.

 

आई मी झोपेल तेंव्हा घेऊन येईल त्याला.. तुझ्याजवळ राहू दे तोपर्यंत.

 

बर.. पण जास्त वेळ जगू नकोस.. झोप लवकर.बघते मी त्याला. इतकं बोलून रमाबाई नातवाजवळ गेल्या.

आणि इकडे आणखी रेणू विचारांच्या घोळक्यात सापडली.. तिला वहिनीचा एक एक प्रश्न आठवत होता. आणि त्याची उत्तर ती स्वतःला अगदी निःपक्षपातीपणे देत होती. कुणालाच  माहेरी येण्याचं कारण सांगू शकत नव्हती ती. सांगितलं असत तर आधी हिची कानउघाडणी सगळ्यांनी केली असती व नंतर रमणकडे मोर्चा वळवला असता.

 

“रेणू तुला आता हा अल्लडपणा सोडावा लागेल. समजदारी घे जरा. आई आहेस एका मुलाची, कुणाची तरी बायको, सून, वाहिनी, मुलगी आहेस. तुझ्यातल्या या प्रत्येक व्यक्तीच्या या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात.  लग्न झालं की जबाबदारी आलीच म्हणून समजायचं. आणि मी अशी वागते जस काही “मला कुणाची गरज नाही” मग माझी गरज का असेल कुणाला??? 🤔

नातं हे गरजेवर न टिकवता ते विश्वास आणि प्रेमावर जपावं तरच ते बहरेल… नाहीतर माझं आयुष्य जाईल वाट बघण्यात. आणि रमण बसेल लोकांचा विचार करत.
समाज माझ्या एकटीने बदलणार नाहीच आहे, आणि ते बदलवण माझ्या हातात देखील नाही. पण
माझ्या संसाराची विस्कटलेली घडी मीच नीट बसवू शकते. ते मात्र माझ्याच हातात आहे.

ठरलं तर मग रेणू… तुझा निर्णय तूच घायचा बिनधास्त. सारासार विचार करून.
रागाच्या भरात घराबाहेर टाकलेलं पाऊल तुला त्या घरापासून कायमच दूर करू शकते..
मग सारासार विचार करून तेच पाऊल पुढे टाकलं तर……. 🤔🤔🤔

तुझा संसार सुखाचा होऊ शकतो…. बस आता निर्णय झाला.. झोपते आता शांत ”

रेणूने निर्णय घेतला व ती शांत झोपली.. आज तिला बच्चूची काळजी नव्हती. आई बघत होतीच त्याला.

रात्र संपली…. आणि उजेडणाऱ्या दिनकरा बरोबर आम्ही आपापल्या कामाला लागलो…

सकाळचे दहा 10वाजत आले असेल. माझी मुलं शाळेत गेली होती, हे देखील ऑफिसला नुकतेच निघाले होते. सगळ्यांच्या टिफ़ीनच करून झाल्यावर किचन मधे आवराआवर करत होते.

क्षणभर सकाळच्या कामाच्या व्यापात रेणूचा विषय डोक्यातून निघाला होता. दोन दिवस झालेत रात्रीची झोप नीट झाली नाही त्यामुळे ती डोळ्यात पिंगा घालत होती. सगळं आवरून जरा वेळ शांत झोपावं असा विचार चालू होता तेच मला रमाकाकूंचा आवाज आला
“जया… अग ये जया..  कुठे आहेस.? .”

अहो काकू किचन आवरत आहे या न. काय झालं आज यावेळी इकडे आल्यात.

 

“जया ही साखर घे आधी आणि तोंड गोड कर. देवाजवळ ठेवली आणि पहिल्यांदा तुलाच द्यावी म्हणून सरळ तुझ्या घरी आले बघ.. या साखरेची खरी हक्कदार तूच आहेस.”
हो द्या न पण काय झालं ते सांगाल का काकू मला?

 

“काय जादू केलीस तू काल रेणूवर …?

 

जादू 🤔🤔,,??? काय बोलताय मी समजले नाही.

 

अग रेणूने बॅग पॅक केली स्वतःची.. सासरी जाण्यासाठी.

 

काय सांगताय काय काकू तुम्ही???😊😊😊

 

अग खरच ग बाई… उठली तशी सामानाची आवराआवर केली बॅग पॅक केली. विचारल तर म्हणाली मी माझ्या घरी जात आहे.”आल्यापावली परत “😊😊

 

काय सांगताय काय काकू 😊😊😊

 

अग इतकंच नाही तर… तिचे बाबा म्हणाले “मी येतो सोबत.. ते लोकं काही बोलले तुला तर.”

 

तर रेणू म्हणते कशी   “बाबा मीच आले होते न. मीच परत जाईल. ते घर व ती माणसं पण माझीच आहे. मी का आले व का गेले, हे विचारण्याचा त्यांचा पण हक्क आहे माझ्यावर. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या बाबा. पुढचं सगळं सांभाळायला मी समर्थ आहे.
तिथून निघून येण्याचा निर्णय माझा होता, तुम्हाला न विचारता घेतलेला. मग आता सुद्धा मी माझा निर्णय घेतला व तो म्हणजेच परत जाण्याचा. ते ही मी एकटीच जाईल बाबा. काळजी करू नका. ”

 

काय बोलताय काकू. मला तर विश्वासच बसत नाही आहे..😊😊खुप खुप खूपच आनंद झाला मला.चला काकू मी पण येते तुमच्या कडे रेणूला बाय करायला..

 

आम्ही दोघीही सोफ्यावरून उठणार तेच आवाज आला..

 

वहिनी… अग ये वहिनी. कुठे आहेस? मला बाय नाही करणार का ग वहिनी. मी जातेय रमणकडे परत. स्वतः बर का 😊😊 “आल्यापावली.. परत”

 

आता वाट बघायची गरज नाही “तो येईल घ्यायला तरच जाईल” याची. खुप विचार केला वहिनी मी तुझ्या बोलण्याचा आणि चूक उमगली ग मला माझी. रमणची देखील होतीच चूक.. ती मी तिथे गेल्यावर बघते त्याला 😃😃😃.

पण एक पटलं ग वहिनी तुझं,

रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात…

आणि मग आयुष्य चुकत जात…

प्रेम, माया, आपुलकीचा झरा आटतो…

आणि नात्यांचा मात्र विस्कटा होतो…

वहिनी कुंकू लावतेस न… निघतेय मी सासरला,  माझा मोडका संसार सावरायला… आणि महत्वाची गोष्ट राहिलीच की.. Thank you so much वहिनी. माझ्या मोडणाऱ्या संसाराला सावरण्यासाठी तू केलेल्या त्या एका प्रयत्नासाठी… 😘😘😘😘💞 Love You वहिनी.. मला घट्ट मिठी मारत रेणू बोलत होती

मला काही सुचतच नव्हतं काय बोलू ते, काल इतकं घडाघडा बोलत होते मी तिला व ही तीच रेणू आज मला निशब्द करून गेली.
तिने मारलेल्या घट्ट मिठीने व तिच्या त्या शब्दांनी आनंदाश्रू ओघळले नकळत. दोघीही त्या आनंदाश्रूंमध्ये न्हाऊन निघालो आम्ही.

रेणूला व काकूला कुंकू लावल आणि रेणूला सासरी जाण्यासाठी टाटा केला… 🖐🖐🖐🖐

मला एक वेगळाच आनंद होत होता…तुटत असलेलं नातं जुळू पाहत होत….

समाप्त…..
आपला एक मोडका.. तोडका प्रयत्न देखील मोडक्या संसाराला सावरण्यासाठी पुरेसा असतो…💑 👨‍👩‍👦 ”

खरंच… कधीकधी छोटीशी गोष्ट डोंगराएव्हडी होऊन बसते. व नात्याचा अंत होऊ पाहतो. बऱ्याचदा यात इगो असतो.”मीच का हार मानू” यामुळे खुप संसार तुटलेले बघितले मी.
माझा सांगण्याचा उद्देश हाच होता की “हार  कुणीच नका मानू”
पण नात्यात इगो नका येऊ देऊ… सारासार विचार करून, आपल्या मनाला चाचपडून निर्णय घ्या
कारण हा खेळ नाही… संसार आहे…

यात दोघांनीही समजदारी घेणं गरजेचं आहे.
काही परिस्थितीत पुरुष समजला घाबरून पाऊल पुढे घेत नाही. हे बदलायला हवं,कधी बदलेल ते मलाही माहिती नाही

गरज मुलाला वडिलांची असते तशीच वडिलांना मुलाची व बायकोची देखील असते न. मग पुरुषाने केला स्वतः फोन किंवा गेला घ्यायला बायकोला परत तर कुठे बिघडलं.
समाज नाही देत पुरुषांना असं करायला परवानगी.
पण

एक बाप आणि नवरा तर नक्कीच परवानगी देतो न समाजाविरोधात काहीतरी करण्याची.

लोकं बोलतील त्याचं काम आहेत ते. पण प्रत्येक वेळी स्त्रीने माघार घ्यावी असं कुठेही लिहिलेलं नाही.
या कथेत रेणू जरा स्वभावाने रागीट होती तिची चूक होती, म्हणून ती स्वतः गेली परत.

मात्र बऱ्याच जागी पुरुषांच्या चुका असतात तरी ते मान्य करत नाही. स्त्रीलाच हार मानावी लागते मुलांसाठी, संसारासाठी. पण खरच हे थांबायला हवं.

स्त्री ने चूक नसताना तडजोड करू नये. असं मला वाटत.
ज्याची चूक त्याने मान्य करून संसार सावरण्याचा प्रयत्न करावा.

जर भांडण शुल्लक कारणावरून झालं असेल पण रागात तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल तर स्त्रियांनी समजदारी घेऊन एक पाऊल पुढे घेऊन प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

पण अपल्याला आपल्या नवऱ्यावर विश्वास असेल तरच. नवऱ्याच्या चुका पदरात घेऊन तडजोड करू नका. बरोबर न…

आणखी प्रश्न पडला असेल.. “आता रेणूच्या सासरी काय होईल?? तिला स्वीकारेल का?? सासरच्यांनी प्रतिक्रिया व हिच वागणं कस असेल ” जर खरंच असे प्रश्न पडले तुम्हाला तर कमेंट मधे सांगा मला तसं.. मी पुढील भाग नक्की लिहिल.

तर आता “मोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न इथेच सुफळ संपूर्ण

कसा वाटला माझा लेख…?? आवडला असेल तर like करा.. कमेंट करून तुमचे विचार कळवा. कुणाचा फायदा होतं असेल तर शेअर नक्की करा आणि हो माझे लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..

तर कस वाटलं माझं समजावणं, कारण न सांगताही रेणूच मन परिवर्तित करणं?? .. हे नक्की कमेंट मधे सांगा.. ✍️जयश्री कन्हेरे -सातपुते🙏

फोटो साभार गुगल…

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा