मोलाचे आशीर्वाद

Written by
  • 2 आठवडे ago

मोलाचे आशीर्वाद…

।।श्री।।

आटपाट नगर नावाचं एक राज्य होतं तिथे कृष्णमूर्ती नावाचा एक राजा राज्य करीत होता. राजा अत्यन्त प्रेमळ,दयाळू शिवाय राज्यातील प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने वागायचा, त्यामुळे जनतेच्या नजरतेत राजाला देवासमान मान होता…
राजा हा अत्यन्त दानशूर होता जणू कि कर्णाचाच अवतार…राजा म्हणलं कि पैसा अडका,सोनं नाणं, दाग दागिने आलेच …त्याला एक राणी होती जीचं नाव होत चंद्रकला… दिसायला अर्थात चंद्रकलेप्रमाणे अत्यन्त सुंदर,केवड्यापरी कांती,डाळिंबाच्या दाण्यासारखे दात,शेवग्याच्या शेंगापरी नाजूक बांधा,अशी ती लावण्याची खाणच!तिला विविध प्रकारचे दागिने घालण्याची हौस होती. एखादा दागिना दुसर्यांदा परिधान करायचा असेल तर साधारणपणे 2 वर्षेच उजडतील इतके सारे दागिने तिच्याजवळ होते…पण ही राज्याच्या अगदी स्वभावाने विरुद्ध होती हि राणी,अगदी कंजूस….
एकदा राजाने ठरवलं की आपल्या संपतीतील थोडासा हिस्सा आपण प्रजेला दान करूया! त्याने प्रधानाला सांगितलं की समस्त जनतेला उद्या सकाळी दरबारात यायला सांगा ,आणि आम्ही(राजा स्वत: व राणी) दोघांच्या हस्ते थोडस सोन नाणं व वस्त्रे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दिले जातील….
राज्याने ज्यावेळेस हा निर्णय बोलून दाखवला त्यावेळेस राजाच्या आज्ञेप्रमाणे प्रधान राज्यात दवंडी पेटवायला गेला,इतक्यात राणी ने राजाला विचारलं?महाराज,आपण हा असा विचित्र निर्णय का घेतला??सर्वाना आपण जर असं सगळं दिलं, तर आपण कंगाल होऊ! आताच्या आता तुम्ही हा निर्णय मागे घ्या….
राणी च्या या बोलण्याने राजा म्हणाला,आहो राणीसरकार!आपल्या प्रजेला आपण एवढं नाही का देऊ शकत? ज्या प्रजेमुळे आपण आहोत,त्या प्रजेसाठी आपण एवढं दिल तर काय होणार?आणि राहिला प्रश्न कंगाल होण्याचा,तर सम्पती संपेल ,पण प्रजेला दान केल्यावर मिळणारी जी मनःशांती आहे ना ती कधीच सम्पणार नाही…
राणीसरकार तुम्ही असा का विचार केला नाही की ह्या बदल्यात आपल्याला किती जणांचे आशीर्वाद मिळतील,जे कधीच संपत नाहीत नाही का!
संपत्ती संपेल,पण एखाद्याने दिलेले आशीर्वाद कधीच सम्पणार नाहीत.
राणीला राजाचं म्हणणं पटलं,ती म्हणाली,आपण बरोबर बोलत आहात महाराज,चला तर मग उद्याच आपण का कार्यक्रम ठेवूया,मी हि माझे दागिने स्त्रियांना देते😊 मलाही मिळूदेत आशीर्वाद…उद्याच घेऊ हा सोहळा
राजा म्हणाला, अरे वाह “शुभस्य शीघ्रम।”

Article Categories:
इतर

Comments are closed.