मोहर 2 

Written by
  • 4 महिने ago

मोहर 2

सकाळी जाग आली तेव्हा शिवाचं अंग खूपच दुखत होतं , खूप अशक्तपणाही जाणवत होता. असं वाटत होतं जसं त्याच्या अंगातून थोडं रक्त कोणीतरी शोषून घेतलंय. पण पाऊस सुरु होण्याआधी शेत मोकळ करायचं होतं. म्हणून इच्छा नसताना सुद्धा तो शेतावर निघाला. आज कालपेक्षा जास्त वेळ लागत होता काम करायला. दुपारी त्याची बहीण जेवण घेऊन आली. शिवाकडे बघून तिला वाटलं त्याची तबियत बरी नाही.

बहीण : काय रं दादा , काय झालंय ? चेहरा पडल्यासारखा वाटुया ? बरं नाय वाटतं का ?

शिवा  : हो गं राधे. आज अंग खूप दुखत हाय बग .

बहीण : मग राहूदे काम उद्या कर .
शिवा : नाय गं . आज उद्या २ दिवसात काम पूर्ण होईल . मग थांबायच कशाला ? एवढा पण आजारी नाय म्या .
बहीण : बरं मग मी मदत करू का ?
शिवा : नको , तू घरी जा ?
बहीण : बरं . …… पण लवकर घरी ये .
शिवा : ह्म्म्म ………..

( शिवाची बहीण घरी जाते. शिवा जमेल तसं काम करत होता. संध्याकाळी तो घरी जायला निघाला आणि कालसारखं वातावरण दिसू लागला. शिव विचार करू लागला काल ती मोहर सापडल्यापासून काहीतरी विचित्र होतंय. नक्की काय प्रकार आहे ते पाहिलं पाहिजे. )

शिवा : आई आलो गं. असलं ते वाढ.
आई : व्हय लेकरा बस गरमगरम वाढते . अन काय रं राधा सांगत व्हती तुला बरं वाटत नाय म्हणून.
शिवा : फकस्त थोडं अंग दुखतंय बस बाकी कायनाय.
( एव्हडं बोलून त्याने विषय संपवला. त्याने आज रात्री मोहर पुन्हा नीट पाहायची हे पक्कं केलं .)
रात्री सर्व झोपी गेल्यावर शिवा अडगळीच्या खोलीत येतो आणि ती मोहर हातात घेऊन निरखून पाहू लागतो, तो दोन बोटांच्या मध्ये पकडून घासून हि पाहातो नंतर त्याच्या लक्षात येतं मोगऱ्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता. पण अचानक ते धुंद वातावरण बदलू लागलं. मोगऱ्याचा सुगंध खूपच वाढला अगदी सहन करण्यापलीकडे होऊ लागले. आणि त्यानंतर त्याला कोणीतरी चाबकाचे फटके मारताय असं वाटू लागलं. त्याला सर्वत्र आता रक्त दिसू लागलं आणि त्याच्या वेदना वाढू लागल्या. कोणीतरी तोंड दाबून ठेवल्यासारखं वाटत होतं म्हणून ओरडताही येतं नव्हतं. हा प्रकार कोण्या कमकुवत माणसासोबत घडलं असतं तर हृदयविकाराच्या धक्याने मेला असता. पण शिवा धाडसी असल्यामुळे अजून जिवंत होता. पण होणारा त्रास तो सहन करू शकला नाही आणि बेशुद्ध झाला. त्याला दुसऱ्यादिवशी दुपारी जाग आली तेव्हा तो दुसऱ्या खोलीत होता आणि आजूबाजूला घरचे आणि शेजारीपाजारी होते. सकाळी तो जागेवर नव्हता म्हणून शोधाशोध केल्यावर तो अडगळीच्या खोलीत सापडला त्याच्या अंगावर चाबकाच्या फटक्याचे वण होते, बेशुद्धावस्थेत सर्वानी उचलून त्याला दुसऱ्या खोलीत आणलं होतं.
शुद्धीत आल्यावरही त्याला नीट बोलता येत नव्हतं. वडिलांनी विचारल्यावर मोहर सोडून बाकी सर्व रात्री घडलेलं सांगितले. शेजारी राहणाऱ्या रामा आजोबांनी शिवाच्या वडिलांना सांगितलं ,,
रामा आजोबा : रघु ( रघुनाथ ) मला हे प्रकरण बरोबर वाटत नाय. एक काम कर इथून ८ गाव सोडलं कि एक गाव लागेल शेवरी नावाचं तिथे एक वैद्य राहतात ८५ च्या वर वय आहे बघ त्याचं, पैलकर वैद्य म्हणून हाताला गुण असा आहे कि आजूबाजूच्या ५० गावात कोणाच्या नाही. आणि त्यांना बाहेरच काही असेल तर ते पण कळत. मी लहान असताना मावशीकडे राहायला होतो तेव्हा मावशीच्या मुलाला बाधा झाली होती तेव्हा त्यांनीच मदत केली होती. तेव्हा तरुण होते पण आता या वयात त्यांना जमेल का बघ यायला.
रघुनाथ: पण बाबा आता ते आहेत पण का नाही तर ………….
रामा आजोबा : मी १५ दिवसांपूर्वी तेथून आलोय आहेत अजू न . पण वय ………………. ते जर आले तर तुज्या मुलाला काहीही होणार नाही.
रघुनाथ : पण बाबा ८ गाव सोडून जायच म्हणजे ३ दिवस जायला अन ३ दिवस यायला लागतील. पोराला असं टाकून कसा जाऊ ?
रामा आजोबा : अरे मी सारखा एवढा मोठा प्रवास नाही करू शकत , तेव्हा तुलाच जावं लागेल आणि आता ते आणि तू येई पर्यंत देवच पाहिलं. मी पण आहेच. तेव्हा तू उद्याच निघ.
रघुनाथ : उद्या नाय आताच निघतो. रमे भाकरी बांध माझी. जेवढ्या लवकर जाईन तेवढ्या लवकर त्यांना घेऊन येता येईल.

रघुनाथ निघाले मजल दरमजल करत. पण इकडे शिवाची तबियत अजून बिघडत होती. रोज हळूहळू त्याची तबियत खालावत होती. त्याला त्या रात्री आलेला अनुभव रोज रात्री येई. असहाय्य मोगऱ्याचा सुगंध, चाबकाचे फटके. त्याला आता हे सर्व असहाय्य होऊ लागलं होतं. आणि आता त्याच्या मनात जीव देण्याचे विचार येऊ लागले होते पण एक आशा होती वडील आल्यावर बरं होण्याची म्हणून अजून तग धरून होता.
तिकडे ३ दिवसांनी रघुनाथ शेवरीला पोहचले. पैलकर  वैद्यांचा पत्ता विचारात विचारात त्यांच्या दाराशी येऊन उभे राहिले, आवाज दिला. एका लहान मुलाने त्यांना आता घेतलं पाणी दिलं आणि आजोबांना बोलावतो म्हणून गेला. थोड्या वेळात वैद्य येतात त्यांना पाहून त्यांचा अनुभव काय असेल याचा अंदाज लावता येत होता. एवढं वय असूनही तरतरीत, चेहऱ्यावर तेज. शिवाच्या वडिलांनी सर्व हकीकत सांगितली आणि पाय पकडून माझ्यासोबत चला म्हणून आर्जवे करू लागले. त्यांची ती अवस्था पाहून पैलकर वैद्य त्यांच्यासोबत यायला तयार झाले.
शिवाला आता रात्रीची भीती वाढत होती. आई , बहिणी , भाऊ फक्त रडू शकत होते .ते परिस्तिथी समोर हतबल होते. पुढील ३ दिवस परतीचा प्रवास चालू राहिला. रघुनाथला मुलाला कधी पाहतोय असं झालं होतं. घरी पोहचल्या पोहचल्या रघुनाथने मुलाकडे धाव घेतली पण पैलकर वैद्य मात्र उंबऱ्याजवळच थांबले होते. त्यांना काहीतरी अनिष्ट आहे आणि बलवान आहे याची जाणीव झाली होती …………………

क्रमश ……………………………………

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा