यातना 2 # प्रेमकथा

Written by
  • 5 महिने ago

यातना 2 # प्रेमकथा © आरती पाटील.

हॉटेल मध्ये दरवाजाबाहेर उभ्या भैरवीच्या डोळ्यात पाणी होतं. हॉटेल मध्ये टेबल वर अमन चं त्याच्या मित्रांसोबत बोलत होता.
अमन : म्हटलं होतं ना भैरवीला प्रेमात पडून दाखवेन. आज ती माझ्या प्रेमात आहे. So ठरल्याप्रमाणे माझ्या पैजेचे पैसे काढा.
अमनचे मित्र : हो, मित्रा खूप मोठा पराक्रम केला आहेस. त्या महामायेला पटवणं साधी गोष्ट नक्कीच नाही.

अमन : आणि तिचं गोष्ट मी करून दाखवली आहे. म्हणालो होतो मला अशक्य असं काहीच नाही. पण……….
अमन त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच भैरवीने त्याच्या गालावर पाच बोटं उठवली होती.
भैरवीने रुद्र अवतार धारण केला होता. डोळ्यांमध्ये पाणी होतंच पण त्यात आगही होती. वातावरण गरम झालं होतं. अमन काही बोलणार तोच भैरवीने त्याला हातानेच गप्प बसण्याची खून केली. आणि बोलू लागली…

भैरवी : का अमन? का? असं काय केलं होतं मी? की माझ्यासोबत तू असं वागलास. कोणाच्या कधी आधी ना मधी मी. तुझ्यावर प्रेम करणं मला आयुष्यातली चूक….. चूक नाही घोडचूक वाटेल असं वाटलं नव्हतं. आता तर प्रेम शब्दही मला माझ्या आयुष्यात नको आणि तू पुन्हा कधी माझ्याशी बोलण्याचाही प्रयन्त करू नकोस. तुझ्या पैजेचे पैसे नक्की घे तुझ्या मैत्रांकडून. खूप मेहनत घेतलीस त्यासाठी तू.

अमन भैरवीशी बोलण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयन्त करतो पण भैरवी काहीही ऐकून न घेता दरवाजा त्याच्या तोंडावर बंद करून निघून जाते.

इकडे अमन खरंच भैरवीच्या प्रेमात असतो. तो मित्रांना भेटून दुसऱ्यादिवशी भैरवी ला सर्व सांगणार होता.

भैरवीच्या Interview च्या दिवशीचा प्रसंग……….

भैरवी चा interview होऊन गेली. आणि selection च्या list मध्ये तिचं नावही होतं. तिचं नाव पाहून टीम मध्ये एकाने ( रवीने ) विषय काढला. ” अरे ही तर आमच्या कॉलेज मध्ये होती. मी last year ला असताना हीच 1st year. आणि त्याचं वर्षी एकाला जो तिला छेडत होता त्याला दुर्गावतार दाखवला होता.”
यावर तिथे बसलेला अमन बोलला:.
अरे तसाच प्रसंग असेल म्हणून ती अशी वागली असेल.

रवी : असेलही… पण सर्व जरा वचकूनच होते. तिला प्रेम वगैरे माहितच नाही. तिला जेवढं मी ओळखतो ती कोणाच्या प्रेमात नाही पडू शकत. आणि ती पडूच शकत नाही

अमन : आणि पडून दाखवलं तर…. भलेही मी नाही ओळखत तिला पण मला माझ्यावर विश्वास नक्की आहे.

रवी : लावतो का पैज मग….?

अमन : हो लागली पैज… बाकी सर्व आहेत साक्षीला….
ठीक आहे आता तशीही माझी ट्रान्सफर झालीच आहे तिथे तिला पोस्टिंग द्यायची व्यवस्था करा.

आताच्या वेळेला…….
हॉटेलमध्ये भैरवी अमन ला मारून आणि ऐकवुन गेली. अमन मात्र खरोखरच तिच्या प्रेमात पडला होता. जवळ आला होता. तो पैज जिंकल्याचे सांगून पुढे हे मित्रांना सांगणारच होता की तो खरंच तिच्या प्रेमात आहे पण तो पर्यंत भैरवीने पाच बोटं उठली होती. त्याला आता असं वाटत होतं की आधीच तिला सर्व सांगायला हवं होतं.

इकडे भैरवी अमन च्या अश्या वागण्यामुळे खूप दुखावली गेली होती. आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं होतं आणि विश्वास केला होता तिने. तिच्या डोळ्यांमध्ये राग आणि दुःख आणि पाणी एकत्र आले होते. आता काहीही झालं तरी त्याच्याशी काही एक घेणं देणं ठेवायचं नाही असं ती ठरवते.

आणि दुसरीकडे अमन काहीही झालं तरी तिचा गैरसमज दूर करायचा असं ठरवतो…….

क्रमश……..

( पुढे नक्की काय होतं? अमन ची बाजू भैरवीला कळेल का? प्रेमात आलेल्या या प्रसंगातून काय नवीन समोर येईल पाहुयात पुढील भागात. )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा