यातना 3 # प्रेमकथा

Written by
  • 1 महिना ago

यातना 3 # प्रेमकथा

भैरवी घरी येते आणि स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून खूप रडते. आयुष्यात कोणालातरी आपलं बनवल्याचा तिला त्रास होतं होता. बरंच वेळ रडल्यावर ती डोळे पुसते आणि ठरवते आता अमनला आयुष्यात परत स्थान द्यायचं नाही. रात्री तिला बाबा विचारतात तेव्हा ती सर्व खरं सांगते आणि आपला निर्णय ही सांगते. भैरवी च्या घरचे समंजस असल्यामुळे तिचे बाबा विसरून जाण्याचा सल्ला देतात.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये भैरवी येते तेव्हा बाहेरच अमन तिची वाट पाहत उभा असतो. तो तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयन्त करतो परंतु ती जणू तो तिच्या समोरच नाही, अदृश्य आहे असे वागत असते. ऑफिस सुटल्यावरही अमन तिच्याशी बोलण्याचा प्रयन्त करतो पण पुन्हा तसंच. तिच्या मागे तो जातो. ती ऑटो मध्ये बसते आणि ऑटो निघतो. अमन त्या ऑटो मागे बराच वेळ धावतो. पण ऑटो निघून जातो. अमन ला फार त्रास होतो आणि डोळ्यात पाणी घेऊन बराच वेळ तो त्याचं रस्त्याच्या बाजूला बसून राहतो.

इकडे अमनला ऑटो मागे धावताना पाहून भैरवीच्या मनात कालवाकालव होते. कितीही राग असला तरी प्रेम होतं तिचं त्यांच्यावर. पण क्षणात तिने स्वतःला सावरलं. एवढे दिवस प्रेमाचं नाटक करत होता, आता करत नसेल कशावरून?? आता त्याच्या वागण्याला भुलायचं नाही. ती रात्र दोघांनाही नकोशी होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं, अफाट होतं. त्यामुळे होणाऱ्या यातना ही फार त्रासदायक होत्या.

दुसऱ्या दिवशी भैरवी ऑफिसला आणि आणि तिने पाहिलं तिच्या Desk वर Sorry लिहिलेलं Card होतं. ती एक जळजळीत कटाक्ष अमन वर टाकते आणि उघडून न पाहता त्याच्यासमोर फाडून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकते. अमन ला सर्व मार्ग बंद होताना दिसत होते. तरी भैरवीला काहीही करून आपलं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही हे पटवून द्यायचं ठरवतो.

अमन रोज काही ना काही कारण काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयन्त करत होता. भैरवीच्या मनावर त्याचे ते शब्द ( पैजेविषयी ) असे काही लागले होते की त्याचं आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती नसते.

अमन ठरवतो की येत्या व्हेलेंटाईन डे ला तो तिला दुसऱ्या कोणाकडून बोलावून घेणार आणि मोठं surprise देणार आणि सर्व गैरसमज दूर करणार.

व्हेलेंटाईन डे च्या दिवशी……..

अमन ऑफिसच्या एका मित्राला ती आली की तिला टेरेस वर पाठव म्हणून सांगतो. अमन ने टेरेस सफेद आणि लाल रंगाच्या फुग्यांनी सजवला होता. Cake आणला होता. लाल गुलाबांच्या पाकळ्या टेबल वर पसरवल्या होत्या. अत्तरने वातावरण सुगंधित केलं होतं. सुंदर माहोल होता आणि आता कमी होती ती भैरवीची.

बराच वेळ झाला तरी अजून भैरवी आली नाही आणि ऑफिसची वेळही होऊन गेली होती. म्हणून अमन नक्की काय झालं पाहायला खाली ऑफिसमध्ये आला. त्याने मित्रा विचारलं तर तो म्हणाला ती अजून आलीच नाहीये. अमनचं लक्ष कशातच लागत नव्हतं. दुपारी जेवणाची वेळ झाली तरी भैरवी आली नव्हती, तेव्हा त्याने न राहवून HR मध्ये चौकशी केली तेव्हा त्याला जे कळलं ते ऐकून त्याला सर्व संपलं असं वाटू लागला.

भैरवी कालच राजीनामा देऊन गेली होती………

क्रमश……

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत