यातना 4 # प्रेमकथा

Written by
  • 1 महिना ago

यातना 4 # प्रेमकथा

भैरवीने job सोडण्यासारखं मोठं पाऊल उचललं होतं. इकडे अमन तिच्या विरहामध्ये दुःखी होता. निदान आपली बाजू सांगता आली पाहिजे होती असं त्याला सारखं वाटत होतं. अमन तिला संपर्क करण्याचा प्रयन्त करत होता पण तिला phone ही लागत नव्हता. घरही माहित नव्हतं. आता तिचा phone बंदच येतं होता. अमन office वरून सुटल्यावर समुद्रकिनारी जाऊन बसला आणि तिच्या पहिल्या भेटी पासून आतापर्यंत झालेला प्रत्येक प्रसंग त्याच्या भोवती फेर धरू लागले. डोळ्यात अश्रू आणि मनात खेद, मावळणाऱ्या सूर्यासोबत आता उरलेल्या आशा ही मावळू लागल्या होत्या.

6 महिन्यांनंतर………..

​आजही अमन office मध्ये आल्यावर आधी भैरवीच्या desk कडे एक नजर नक्की पाहतो. भैरवी office मधून गेली खरी पण अजूनही अमनच्या मनामध्ये ठाण मांडून बसली होती. त्याने तिचा पत्ता काढण्याचा, संपर्क करण्याचा हर एक प्रयन्त केला, पण सर्व व्यर्थ ठरलं. आता फक्त तिच्या आठवणींमध्ये तो जगत होता. आपण आधीच तिला विश्वासात घेऊन सर्व सांगायला हवं होतं, असं त्याला सारखं वाटत होतं. पण तरीही कधी ना कधी ती भेटेल असा विश्वास त्याला वाटत होता.

काही दिवसांनी त्याच्या कॉलेज मधल्या मित्रानी पिकनिकला जाण्याचा plan बनवला आणि अमन ला सोबत चालण्याची जबरदस्ती केली. त्यांना घडलेला सर्व प्रकार माहित होता आणि त्यातून अमनला बाहेर काढण्यासाठी काही काळ त्याला बाहेर, मोकळ्या हवेत नेण्याची शक्कल त्यांनी लढवली होती. मित्रांचा आग्रह त्याला मोडवला नाही आणि पिकनिकला जायचं final झालं.

पन्हाळा गड सर करायचा अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि आजूबाजूला किमान 2 दिवस फेरफटका मारायचा असं ठरलं. मुंबईहून रात्री सर्वजण निघाले. लांबलचक आणि शांत रस्ता, दुतर्फा झाडे, टपूर चांदणं, रात्र आहे की मोहिनी? हे ठरवणं कठीण होतं. मध्ये मध्ये थांबून टपरीवरचा चहा म्हणजे सुखाची पर्वणी. हळूहळू सर्वाना ताजतवानं वाटू लागलं होतं. गाडीत FM वर ” ये राते, ये मौसम, नादिका किनारा, ये चंचल हवा……….. ” असे गीत रात्रीची रंगात वाढवत होते.

सकाळी सर्वजण book केलेल्या हॉटेल मध्ये उतरले. तयार होऊन सर्वजण सर्वांत आधी अंबाबाईच्या दर्शनाला गेले. अमन दर्शन घेताना अंबाबाई जवळ भैरवीची एकदा तरी भेट होऊ दे, माझं प्रेम मला मिळू दे म्हणून म्हणून इच्छा बोलून दाखवतो. नकळत त्याचा डोळ्यात पाणी येतं आणि त्याने केलेल्या चुकीची क्षमा ही तो मागतो. आज 6 महिन्यात पहिल्यांदा त्याचा मनाला शांतता लाभली होती. मन शांत झालं होतं. बराच वेळ फिरून सर्वजण पुन्हा हॉटेल वर परत जातात आणि दुसऱ्यादिवशी अगदी पहाटे पन्हाळा जवळ करायचा त्यांचा बेत ठरतो.

पहाटे सर्वजण पन्हाळा चढायला सुरुवात करतात. अगदी पहाटे आल्यामुळे तुरळक माणसं होती. आणि गर्द झाडींमुळे पन्हाळा एखाद्या भरगच्च आयाळ असलेल्या सिंहाप्रमाणे भासत होता. अमनही चढता चढता आजूबाजूचे फोटो click करत होता. निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेरा मध्ये साठवून ठेवत होता. आणि अचानक अमन गडाच्या खालच्या दिशेला धावू लागतो. अमन च्या अश्या वागण्यामुळे सर्वजण चक्रवतात आणि त्याला थांबायला सांगत त्याच्या मागे पाळतात. धावत खाली येतं अमन एका ठिकाणी थांबला आणि आजूबाजूला वेड्यासारखं कोणाला तरी शोधू लागला. मित्रानी त्याला विचारल्यावर त्याने सांगितलं.

मी आता भैरवीला पाहिलं………….

( अमन ने नक्की भैरवीलाच पाहिलं का? पुढे भैरवी आणि अमन ची भेट कधी आणि कशी होणार हे पुढील भागात पाहू. )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत