यातना 7

Written by
  • 2 महिने ago

यातना 7

भैरवीच्या घरी आज हळदीचा कार्यक्रम होता. भैरवी च्या डोळ्यात पाणी होतं. अमन वर आजही तिचं प्रेम होतं. पण आता ती मागेही फिरू शकत नव्हती. सागर आणि भैरवीची हळद एकत्रच करायची ठरलं होतं त्यामुळे सागरही तिथेच होता. आनंदी वातावरण होतं हळदीची गाणी वाजत होती. सागरला एक एक करून सर्वजण हळद लावत होते.
आता सागरची उष्टी हळद भैरवीला लावायला सर्वजण आले सागर समोर होता आणि भैरवीला पाहून खुश होता.

भैरवीला हळद लावणार तोच अमनचा आवाज आला. “थांबा “. अमन ला तिथे पाहून सर्वच जण गोंधळले. भैरवी त्याला काही बोलणार तोच अमन बोलतो.

अमन : एक मिनिट भैरवी. आज मला बोलू दे. मी इथे तुझं लग्न मोडायला नाही आलो. पण एकदा मी काय बोलतो ते ऐकून घे.
अमनला पाहून सागर चिडतो आणि अमन वर धावून जातो. चांगल्या क्षणी विरजण टाकायला आलायस का.??

अमन : ( सागरचा हात कॉलर वरून बाजूला करत ) नाही, विरजण टाकायला नाही खरं सांगायला आलोय.

सागर अजून चिढतो आणि त्याला तिथून जायला सांगतो. अमन भैरवीला बोलतो.

अमन : भैरवी आज जर तू माझं नाही ऐकलंस तर नंतर स्वतःला दोष देशील त्यापेक्षा एकदा फक्त 5 मिनिट ऐकून घे. भैरवीला अमन च्या डोळ्यात काहीतरी खरेपणा वाटत होता म्हणून ती म्हणाली बोल काय बोलायचं आहे ते.
हे ऐकून सागर बोलतो. ” ज्याने तूला फसवलं त्याला तू बोलायला सांगतेस? ते काही नाही आताच्या आता निघ इथून. ”
भैरवीला ला त्याचं वागणं खटकत.
भैरवी : 5 मिनिट मागतोय तो तर problem काय आहे? बोलू दे त्याला.
सागर : मी तुझ्याबद्दल सर्व माहीत असूनही लग्नाला मागणी घातली आणि तू त्याची बाजू घेतेस?
सागरच्या अश्या बोलण्याचं भैरवीला नवल वाटत. आणि राग ही येतो. ” सागर असं कसं बोलू शकतोस तू? ”

अमन : मी सांगतो भैरवी. तो असं कसं बोलू शकतो ते मी सांगतो.
सागर रागाने बघत होता. अमन हर्षदला आवाज देऊन आत बोलवतो. हर्षदला पाहून सागर जरा घाबरतो.
भैरवी : हा कोण आहे अमन? आणि काय बोलायचं होतं तूला?

अमन : तुझ्याकडून सागर नाव ऐकलं तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की कुठेतरी ऐकलं आहे. मग मी माझ्या जुन्या office friend ला बोलावलं आणि या हर्षदचा सागर नावाचा friend आहे आणि हर्षदने पैजेची गोष्ट सांगितली होती. मग आम्ही सागरची माहिती काढली. तर कळलं की हा तोच सागर ज्याचं लग्न तुझ्याशी ठरलं आहे. तेव्हा हे लक्षात आलं हे सर्व सागरने केलंय.

भैरवी : पण हे कश्यावरुन की हे सागरने केलंय?

अमन : सांगतो. ( अमन सागरच्या बहिणीला आवाज देऊन बोलावतो आणि विचारतो ) त्यादिवशी तू shopping ला भैरवीला घेऊनच शॉप्पिंगला का गेलीस नाही म्हणजे त्यादिवशी भैरवीचा plan छान आराम करायचा होता असं ती मला म्हणाली होती तरी तू तिला कसं घेऊन गेलीस…? म्हणजे लगेच कशी तयार झाली भैरवी?

सागरची बहीण : त्यादिवशी सागर दादाने मला पैसे दिले होते आणि shopping ला जा म्हणाला होता आणि जाताना भैरवीला घेऊन जा म्हणाला.

अमन : आणि त्या coffee shop जवळच कसं आलात तुम्ही? नाही म्हणजे त्यादिवशी काही special नव्हतं आणि उलट पडत असूनही तिकडे आलात तुम्ही?

सागरची बहीण : दादाने मध्ये मला phone करून सांगितलं होतं की तिकडे ऑफर्स चालू आहेत.

अमन : कळलं का भैरवी तू सहज shopping करत त्या coffee shop पर्यंत आली नव्हतीस. सागरला माहित होतं मी आणि माझे friends तिथे भेटणार आहोत. आणि दुसऱ्यादिवशी मी तूला सर्व खरं सांगणार आहे. म्हणून त्याने तू तिथे त्याचं वेळेस पोहचशील असा plan केला.आणि आता पुढचं सागर सांगेल. त्याने असं का केलं?

सागरच्या डोळ्यात राग होताच.तो बोलू लागला. हो मी केलं हे सर्व. भैरवी आमच्या घरी यायची कधी कधी. आवडायची मला खूप पण सांगता नाही आलं मला. हर्षदकडून मला कळलं की भैरवी आणि अमन एकमेकांवर प्रेम करतात. पण पैज बद्दल ही तो म्हणाला होता. अमन सर्व तिला सांगणार होता हे पण मला माहित होतं. भैरवीला फसवणारी, खोटं बोलणारी लोक नाही आवडत माहित होतं मला म्हणून मी त्यादिवशी बहिणीला भैरवीला मुद्दाम पाठवलं कारण mla माहित होतं जेव्हा तिला कळेल या पैजेबद्दल तेव्हा ती संबंध तोडून टाकेल. आणि तसंच झालं. त्यानंतर मी घरी बोलून भैरवीच्या घरी जाऊन तिला मागणी घातली. त्यांनतर मी तिला जॉब सोडायला सांगितला, कारण दिलं की तू तिथे राहशील तर तूला त्रास होईल म्हणून. मला वाटल नव्हतं की मला प्रत्येक्ष बघितलं नव्हतं तर हा माझ्यापर्यंत पोहचेल किंवा हे कधी उघडकीस येईल.

भैरवीला हे सर्व ऐकून खूप राग येतो. आणि भर मांडवात ती सागरच्या कानाखाली मारते आणि म्हणते तूला माहित होतं ना की मला फसवणारी आणि खोटं बोलणारी लोक नाही आवडत आणि तू मला फसवलास आणि खोटं ही बोलास.

सागर आणि सागरमुळे त्याच्या घरचेही खाली मान घालून उभे होते. भैरवी आणि तिच्या घरच्यांनी ते लग्न मोडलं आणि त्याचं मुहूर्तावर अमन आणि भैरवीचं लग्न लावलं. एवढ्या यातना भोगून मिळालेलं प्रेम त्यांच्यासाठी सोन्यासारखं होतं आगीतून निघायलसारखं, 100 नंबरी….

समाप्त….

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा