या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे….!!,

Written by

?या जन्मावर , या जगण्यावर , शतदा प्रेम करावे….!!

रम्य संध्याकाळ होती .सुर्य अस्ताला चालला होता.पाखरांचे थवे दिवसभरातील दमछाकीमुळे घरट्याकडे परतत होते.एरवी राबणारे हात सांजवेळी थंडावले होते , त्यांना घाईघाईने घराकडे जाण्याचे वेध लागले होते.हे सारे दृश्य मंदार आणि राधा दिक्मुड् होऊन पहात होती.मंदार आणि राधा संसाराच्या दैनंदिन चक्राविषयी विचारमंथन करत एका तळ्याकाठी बसली असता आपला जीवनपट आठवला……
मंदार हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होता .जेमतेम बारावी पर्यंत शिकलेला पण नशिबाने सरकारी पोस्ट खात्यात क्लार्क म्हणून काम करत होता .झपझप काम आवरायची व गोड बोलुन सतत अॉफीसमध्ये हसत खेळत रहायचा लोकांची कामे तो आनंदाने करत असत यामुळे तो लोकप्रिय झाला होता.अॉफीसमध्येच राधा नावाची मुलगी काम करत होती.शांत मनमिळावु स्वभावाची राधा मंदारप्रमाणेच कामात पारंगत होती .मंदारचा स्वभाव तिला आवडू लागल्यामुळे मंदारला तिने लग्नाविषयी विचारले ..मंदारने लगेच तिला होकार दिला व दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला .
आता संसाराची जबाबदारी दोघांच्यावर पडल्यामुळे कामाचा ताण वाढला होता.मंदारला घरची शेतीवाडी होती , त्याच्याकडेही त्याला लक्ष द्यावे लागत असत .सकाळच्यावेळी लवकर शेतातील कामे ऊरकून तो अॉफीसला जात असे.राधाही आवराआवर करुन सासुबाईना कामात मदत करत असत.असे हे दैनंदिन जीवन अगदी सुखकर चालत होत पण संसाराला नजर लागावी तशी राधा आजारी पडली …अंथरूणावर खिळून राहल्यामुळे सारंच कोलमडल होत … राधा रोज तापान फणफणत होती..अन्नाचा कण तिच्या तोंडात जात नव्हता.तिची काया न पहावणारी होती .तिची ही अवस्था पाहुन मंदार फार लडबडला होता. पण मंदारने नव्या जोशाने राधाला धिर द्यायची खुणगाठ मनाशी बांधली. मंदार राधाची सर्व सोय करु लागला.वेळच्या वेळी गोळ्याऔषधे देणे , जेवण बळजबरीने का असेना खाऊ घालत होता.बरेच वैद्यकीय उपचार केल्यानंतर राधाला जरा बरे वाटू लागले.मंदारला आताजरा हायशे वाटले.राधाला जरा जरा जेवण जाऊ लागले , अंगात शक्ती येऊ लागली त्यामुळे ती हिंडती फिरती झाली .शेजार्या पाजार्यानी राधाच्या आजारपणात बरीच मदत केली.अॉफीसमधील सहकार्यांनी मंदार व राधाला चांगला धीर दिला .
राधा आता आजारातुन पुर्णपणे बरी झाली होती.आजारपणात मंदारने केलेल्या सेवेच तीला फार कौतुक वाटत होत.मंदारलाही राधा आजारपणातुन बरी झाल्यामुळे आयुष्याला नवचैतन्य मिळाल होतं…आयुष्यात संसाराचा गाडा हाकताना स्रीच आस्तित्वाला किती महत्व असते हे मंदारला कळुन चुकल होत.अनेक छोट्या छोट्या गोष्टींत राधान कधीही त्रागा केला नाही .शांत संयमाने तीने मंदारला समजुन घेतले .दांपत्य जीवन जगत असताना कोणताही निर्णय घेताना मंदार व राधा एकमेकांशी सुसंवादाने घेत असत , त्यामुळे राधा व मंदार यांच्यामध्ये प्रेमळ नाते टिकुन राहिले.जीवनाकडे बघण्याचा त्यांचा विधायक दृष्टिकोन आयुष्याला कलाटणी देणारा ठरला .
राधा व मंदार यांचे पुर्ववत जीवन सुरु झाले.दोघेही आनंदाने दररोजची कामे करु लागले .आनंददायी जीवनप्रवासाची ते अत्युच्च शिखराकडे चालले असता त्यांना अरुण दाते यांचे ते भावगीत आठवले ….!! एक हळुवार झोका दिला… व दोघांच्याही मुखातुन शब्द उमटले ….” या जन्मावर , या जगण्यावर , शतदा प्रेम करावे……..!!”

✍नामदेव पाटील.

फोटो साभार गुगल.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा