युरोप डायरी #३

Written by

रोमहून साडे तीन – चार तासांच्या प्रवासानंतर ‘पिसा’ येथे येऊन पोहोचलो. पिसाचा सुप्रसिद्ध झुलता/कलता मनोरा पाहायला . ११ व्या शतकात बोनॅनो पिझानो ह्या आर्किटेक्टने बांधयला घेतलेला हा मनोरा पूर्ण व्हायला राजकीय अस्थैर्य आणि तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन शतके लागली. मुख्यतः संगमरवर आणि लाइम स्टोन यांनी बांधलेला हा आठ मजली मनोरा एका बाजूला झुकलेला आहे. कमकुवत पाया आणि ठिसूळ जमीन अशी त्याची कारणं सांगितली जातात.
तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली, त्यामुळे मनोर्‍याचे काम थांबवले. पुढे अनेक वर्ष टप्प्या टप्प्याने याचे काम चालू राहिले. याचा झुकाव तसाच कायम राहिला आणि हा झुकाव कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी अनेक उपाय पण केले गेले. केल्या गेलेल्या अनेक उपायांपैकी मनोर्‍याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूच्या फाउंडेशन मध्ये शिसे भरण्याचा प्रयोग थोडाफार यशस्वी होऊन मनोरा झुकणं थांबलं.
पिसाचा झुलता मनोरा हा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्या दोषामुळे जास्त प्रसिद्ध झाला. पिसाचा मनोरा म्हणजे खरंतर बेल हाऊस (घंटा घर) आहे. ख्रिश्चानिटीत बेल हाऊस, बॅप्टिस्ट्री आणि चर्च या तीन गोष्टी एकत्र असतात. फक्त इटलीत या तिन्ही गोष्टींच्या वेगळ्या इमारती बांधल्या आहेत. आणि तेच हे घंटा घर म्हणजे ‘पिसाचा कलता मनोरा.’
माझ्या युरोप डायरीचं अाजचं पान पिसाच्या कलत्या मनोऱ्याच्या सौंदर्याने व्यापून टाकलंय…आजच्यापुरतं बस्स इतकंच….

मैत्रेयी दीक्षित – समेळ.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत