युरोप डायरी #४

Written by

आजचा दिवस म्हणजे आमच्या टूरच्या एक्सक्लुझिव्ह- ‘फरारी राइडचा’. सकाळपासून सगळेजण सुपर एक्साइटेड होते, ‘once a lifetime experience!!’ घेण्यासाठी.
नॉर्दन इटलीच्या मारानेल्लो येथे फेरारी कार्सच म्युझियम, शोरूम आणि ट्रेनिंग सेंटर आहे. ह्या सर्वात महागड्या कारचे फाऊंडर आहेत ‘एन्झो फरारी.’
लाल रंगाच्या त्या गाड्या, त्याचं डिझाइन आणि मग त्याची दहा मिनिटांची राइड…सगळंच जबरदस्त थ्रिलिंग होतं. फेरारी राइडचं ते वेड, थ्रील, त्याचा स्पीड आणि ब्युटी काही केल्या डोक्यातून जातच नाही. फेरारी बरोबरचे भरपूर फोटो आणि व्हिडिओज क्लिक करून शेवटी नाइलाजानं तेथून काढता पाय घेतला?.
आता ‘व्हेनिसची’ सफर, जगातल्या अनेक महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक महत्त्वाचं शहर म्हणजे व्हेनिस. व्हेनिस हे राज्य व्यापरासाठी महत्त्वपूर्ण मानलं गेलंच परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला आणि साहित्याचा ठेवा दिला.
व्हेनिसचं ‘सेंट मार्क स्क्वेअर’ हे त्यातलंच एक ऐतिहासिक महत्त्व असलेलं ठिकाण. इटलीच्या वेगळया आर्किटेक्चरचा हा उत्तम नमुना. सेंट मार्क चौकातच सेंट मार्क बॅसिलिका हे चर्चही बांधलं गेलंय.
व्हेनिस हे पूर्णपणे समुद्रावर वसवलं गेलेलं शहर ११८ द्वीपांनी बनलंय, अनेक कॅनॉल्स ने ते वेगवेगळया भागात विभागले गेलंय आणि छोटया मोठ्या पुलांनी एकमेकांना जोडलंय. व्हेनिसमध्ये आतल्या आत दळणवळणाचं साधन म्हणजे फक्त बोट (gandola). व्हेनिसच्या ह्या कालव्यांतून गंडोला राइड केली.
तेथेच मुरानो (Murano) ग्लास फॅक्टरीचं आउटलेट ही आहे. काचेच्या अनेक आकर्षक, रंगीबेरंगी वस्तू पाहिल्या आणि त्या वस्तू कशा बनवतात त्याचं प्रात्यक्षिकही पाहिलं.
फेरारीच्या थ्रीलिंग राईड ने सुरू झालेला आजचा दिवस , व्हेनिसच्या रोमँटिक वातावरणात थोडासा पाऊस, थोडा गार वारा, समुद्र आणि बोटीनं परतीचा प्रवास असा संपत आला ….

मैत्रेयी दीक्षित-समेळ.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत