रक्षाबंधनाचा क्षण : मांगल्याचा ठेवा ….!!

Written by

मानवाच आयुष्व नात्यामुळे अधिक सक्षम बनलय .नात्यांची गुंफण इतकी सुंदर आहे की मानवी जीवन त्यामुळे गुलमोहरासारखे बहरत… अशा नात्यातील अतूट नाते म्हणजे बहिण भावाचे ..!! या नात्याला प्रेमाची झालर आहे ती रक्षाबंधन या सणामुळे….!!
रक्षाबंधन हा सण संरक्षण या संकल्पनेखाली उदयास आला.भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहिण राखी बांधते तरी संकटापासुन भावाचे रक्षण व्हावे हाही हेतु या मागे आहे.तसेच अशुभांचा नाश होऊन जय , सुख , संतती आरोग्य , धन या गोष्टींचा लाभ व्हावा अशिही भावना त्यामागे असते.रक्षाबंधन यातील रक्षण यापलीकडेही जाऊन हा सण प्रेम , जिव्हाळा , आपुलकी या गोष्टीसाठीही साजरा होण्याची गरज आहे.रेशमाच्या साध्या धाग्याला आपल्या संस्कृतीत किती उदात्त अर्थ आहे हे राखी पोर्णिमेच्या सणातून दिसून येते .याच क्षणाची शब्दरुपी जुळुन आलेली रेशीमगाठ…..!!

? रक्षाबंधनाचा क्षण : मांगल्याचा ठेवा..!!

अंगणी पारिजातकाचा सडा , मोगरा फुलला

आसमंत सारा सुगंधाने दरवळला

श्रावणातल्या निसर्गाचा चमत्कार कसा

डोकावून पाहे सूर्यकिरणांचा कवडसा

पाटाभोवती रेखिल्या रांगोळीच्या नाना कला

दीपज्योतीचे तबक समई आहे बाजुला

औक्षण करता बंधुला कुंकुमतिलक लाविला

नयनी बहीणीच्या आनंदाश्रु दाटला

गालावरुनी हळुच खाली ओघळला

अलगद तो हातानी झेलला

तेथेच रेशीमधागा बहिणीने गुंफला

रक्षाबंधनाचा हा क्षण म्हणजेच मांगल्याचा ठेवा

?ईरावरील सर्व लेखक , लेखिका व वाचक यांना रक्षाबंधनाच्या हृदयपुर्वक शुभेच्छा …!!

✍नामदेव पाटील.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत