रम्य सांजवेळी

Written by
 • 6 महिने ago
 • रम्य सांजवेळी धुंद होती मने
  भावनांचा वेग प्रिये आज ना आवरे
  अशा अवखळ सांजवेळी तु हळूच यावेस
  चाहुल ना लागता मज कवेत तु घ्यावेस
  रंग प्रेमाचा उधळेल आसमंत
  भेट होता प्रियेची मन होई शांत
  कांती तुझी त्या रंगाने आणखी खुलावी
  निसर्गाने ही आपल्या सह प्रेमगीत गावी
  वचने घ्यावी शपथा द्याव्या पुन्हा पुन्हा भेटण्याच्या
  रम्य निसर्गात प्रिय प्रियेला न्याहाळत बसण्याच्या
  काळ ना कळावा वेळ ना सरावा मना लागे हीच आस
  मनो मिलनाचा ह्या आपल्या ना सरावा सहवास
  नसताना ही हया मनी व्हावे लागते दुर दुर
  मना लागते प्रियेला बघण्याची हुर हुर
Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा