रवा ढोकळा # recipe  

Written by
  • 2 आठवडे ago

रवा ढोकळा # recipe

बऱ्याचवेळा ढोकळा खायची इच्छा असते पण बेसनमुळे पोटाच्या तक्रारी वाढतात म्हणून काहीजण टाळतात. तर आज मी रवा ढोकळ्याची रेसिपी SHARE करतेय ज्यामुळे तुम्ही ढोकळा खाण्याची इच्छा पूर्ण करू शकता.

साहित्य :  १ वाटी रवा , ४ चमचे दही ,  ( अद्रक ,जिरं आणि २ हिरवी मिर्ची पेस्ट ) , इनो , तेल , कढीपत्ता , १ चमचा तीळ ,

२ हिरव्या मिरच्या , हिंग , राई , कोथिंबीर , मीठ आणि पाणी .ई .

कृती : १ वाटी रवा मध्ये ४ चमचे दही , अद्रक मिरची आणि जिरं पेस्ट , चवीनुसार मीठ घालून ते एकजीव करून घ्या. १० मिनिटे बाजूला ठेवा. दुसरीकडे कुकर मध्ये पाणी घालून त्यात एक छोटा टोप किंवा डब्बा खाली ठेवा. ( त्यातही पाणी ठेवा .)

कुकर गरम होई पर्यंत एकजीव केलेला रवा घेऊन त्यात १ ते १ १ /२ कप पाणी टाकून छान परत एकजीव करा . एका टिनला थोडं तेल लावून घ्या .  ढोकळ्याच्या पिठात इनो घालून २ मिनिट मिक्स करा . ते पीठ तेल लावलेल्या टिनमध्ये टाका आणि कुकर मध्ये छोट्या डब्यावर ठेवा. कुकर च झाकण लावून शिट्टी काढा . high फ्लेम वर १५ मिनिटे आणि त्यानंतर low वर १० मिनिटे ठेवा . त्यानंतर गॅस बंद करा . ५ ते १० मिनिटे ते उघडू नका .

एका छोट्या फोडणीच्या भांड्यात तेल घेऊन गरम करा . त्यात राई , उभ्या चिरलेल्या मिरच्या , कढीपत्ता , तीळ आणि हिंग टाका. छान तडकल्यावर बाजूला करा . कुकर उघडून टिन बाहेर काढा , तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करा आणि फोडणी त्यावर  व्यवस्थित पसरवा . वरून कोथिंबीर घालून सॉस सोबत सर्व्ह करा .

Article Categories:
Health

Comments are closed.