“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा) भाग 2

Written by

“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा)

भाग 2

हंसीका : (पलीकडून बराच गोंधळ ऐकून) Hello…. Uncle??? any Problem??? काय झालं? कोण आहे?? Hello…. Hello….. (आणि फोन कट होतो)

हंसीका परत परत प्रोफेसर नाईक यांना फोन करते पण आता फोन बंदच येत असतो…. राजवीर तिच्या गोंधळाच कारण विचारतो तेव्हा तोही टेंशनमध्ये येतो…. आपल्या ओळखी कामाला लाऊन तो प्रोफेसर नाईक यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो…. तेव्हा कळत की प्रोफेसर नाईक यांचे अपहरण झाले आहे….

हंसीका शांत असते… मगाचशा आपल्या वागणुकीबद्दल राजवीर तिची माफी मागतो… आणि दोघेही आपापल्या रुममध्ये निघून जातात…. रात्री सगळं शांत आहे हे पाहून हंसीका घराची पाहणी करायला लागते… इतक्यात राजवीर रुमच्या बाहेर येतो… तशी ती आडोशाला लपवून रहाते… राजवीर त्याच्या संशोधन खोलीत जाऊन काम करायला सुरवात करतो….

इथे हंसीका मात्र वेगळ्याच शोधात असते… आपल्या सोबत आणलेल्या कसल्याशा छोट्या डिवाइस ने घराचा कोपरान कोपरा चाचपडत असते…. असेच सकाळचे सात कधी वाजले कळलेच नाही… काहीही न घडल्याच्या आवेशात हंसीका कॉफी घेऊन येते आणि राजवीरला त्या automatic दाराबाहेर उभी राहून बोलवन्याचा प्रयत्न करते … पण राजवीर त्याकडे दुर्लक्ष करतो… तो काही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तिने आपला मोबाईल त्या दाराजवळ नेऊन मोठ्याने रिंगटोन वाजवली… त्या बरोबर परत कालच्या सारखा सायरन वाजायला लागला… रंगीबेरंगी लाइट चमकू लागली…. तसा राजवीर तावातावाने बाहेर आला….. त्याला अस त्याच्या कामात व्यत्यय आणलेला अजिबात चालत नसे…. दार उघडून बाहेर येताच समोर उभ्या असलेल्या हंसीकाच्या हातातल्या ट्रेला धडपडून काॅफी त्याच्या अंगावर सांडते…. तशी हंसीका खळखळून हसायला लागते….

राजवीर : What rubbish??? हा काय प्रकार आहे??

हंसीका : (आपल हसू आवरत) अहो म्हटलं रात्रभर जागरण केलात म्हणून तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले होते पण काही हरकत नाही .. परत करते…. (आणि ती हसायला लागते)

पुढे राजवीर काही बोलणार तोच घरात military प्रवेश करते…. राजवीर आणि हंसीका दोघेही गोंधळून जातात…. इतक्यात त्यांच्यातला मुख्य कमांडर आपली ओळख करुन देतो आणि राजवीरच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याच इथे रहाण सुरक्षित नाही… आणि त्यासाठीच ते त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास आले आहेत असं सांगितलं….

राजवीर गेले दोन महिने एका प्रोजेक्टवर काम करत होता… काल रात्रीच त्याच ते काम पूर्ण झाले होते… शिवाय सकाळी तो त्याचीच टेस्ट घेत होता… त्याने कमांडरकडे पंधरा मिनिटे मागितली आणि आधी त्याने बनवलेले software device जे एक छोट्या Hard disk प्रमाणे होत ते आणि आपला laptop सोबत घेतला… संपूर्ण टीम हंसीका आणि राजवीरला घेऊन निघाली…. डोंगरावरून खाली उतरताच मोठ्या स्फोटाचा आवाज आला… त्यांनी गाडीच्या काचेतून पाहीले तर ते राजवीरचे घर होते… काळाकुट्ट धूराचा लोंढच्या लोंढ आकाशात झेपावत होता….

राजवीर : (अवाक होऊन) Ohhh no… हे सगळं काय आहे???

कमांडर : सर आम्हाला फक्त तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी दिली आहे याव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही… काही तासाच्या अंतरावर पोहचताच समोर काही गाड्या येऊन थांबतात आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात करतात… काही कळायच्या आतच बाकी कमांडर सुद्धा गाडीतून खाली उतरतात… आणि प्रतिकार करतात…. मुख्य कमांडर आपल्या अजून चार जवानांच्या मदतीने राजवीर आणि हंसीकाला सुरक्षित बाहेर काढून जंगलाच्या दिशेने पलायन करतात…. त्यांच्या मागोमाग काही हल्लेखोर सुद्धा मागे लागतात….

मागून येणाऱ्या हल्लेखोरांना प्रतिकार करताना ते चारही कमांडर धारातिर्थी पडतात… पण त्याआधी त्या हल्लेखोरांचा नायनाट करतात…. मागे फिरण कठीण असतं… दोघेही वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटतात…. पळत पळत कोणत्यातरी गावाच्या वेशीवर येऊन पोहचतात…. थकल्यामुळे पुढे काहिच सुचत नसते…. थोडा वेळ इथे आराम करून मग पुढचा प्रवास करू अस ठरत….

गावात मोबाईला रेंज सुद्धा नसते त्यामुळे कोणालाही संपर्क करता येत नव्हता…. गावातल्या लोकांकडून माहिती काढून संध्याकाळी एसटी पकडून मुंबईत येण्याचे ठरवले…. आपल्यामुळे हंसीकाही अडचणीत आल्याचे त्याला वाईट वाटत होते…..

राजवीर : (बराच वेळ विचार करून) I am sorry…..

हंसीका : (मुद्दाम) मला काही म्हणालात का???

राजवीर : actually माझ्यामुळे तुलासुद्धा या अडचणीत पडाव लागलो….

हंसीका : (काहीशी गमतीने) मग आतातरी मदत कराल ना मला documentary बनवायला….

राजवीर काहीच न बोलता फक्त हसत राहतो…. झाडाच्या सावलीखाली दोघेही विसावतात…. जेव्हा जाग येते तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो…. राजवीर आसपास नजर टाकतो तर हंसीका तेथे नसते…. तो जरा घाबरतो…. मग त्याच्या लक्षात येत तर त्याची ती laptop and device ची बॅगही जवळ नसते……तो उठुन इथे तिथे शोधायला लागतो…

एका ठिकाणी तिला कोणासोबत तरी बोलताना बघतो… बोलन संपवून तो माणूस निघून जातो… राजवीर पळत पळत हंसीका जवळ जातो आणि एक फटकन तिच्या कानशिलात लगावून देतो…

राजवीर : मूर्ख बाई…. अक्कल आहे तुला??? मला न सांगता माझ्या बॅगेला हात कसा लावलास तु??? किती महत्वाच डिवाइस आहे ते माहीत आहे तुला??? गेले दोन महिने दिवसरात्र एक करून बनवल आहे मी…. आणि तु बिनधास्त अशी घेऊन फिरते आहेस….

हंसीका पटकन राजवीरला मिठी मारते… तसा मागून कोणीतरी खाली पडल्याचा आवाज येतो…. राजवीर मागे वळून बघतो तर एक माणूस खाली जखमी अवस्थेत पडलेला असतो त्याच्या पोटातून रक्त वाहत असत… तो हंसीकाला बघतो तर तिच्या हातात बंदूक असते… कदाचित त्या बंदुकीला सायलेंसर फिट केला असावा म्हणून गोळी झाडल्याचा आवाज नाही आला…. हंसीका त्या खाली पडलेल्या व्यक्तीला (जो अजूनही जिवंत आहे) विचारत असते की त्याला इथे कोणी पाठवल?? आणि इतक्यात त्या माणसाला दुसराच कोणी गोळी मारतो… तशी हंसीका होऊन राजवीरला घेऊन गाडीत बसून निघते… आता थोड्यावेळ आधी ती ज्या माणसासोबत बोलत असते तो तिचाच साथीदार असतो आणि तोच आता गाडी घेऊन येतो ज्या गाडीत बसून ती राजवीरला घेऊन निघते ….

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 3

राजवीर ती बॅग घट्ट धरून बसतो…. गाडीच्या वेगाने शरीराला झोंबणार्या गार वार्‍यामुळे त्याला झोप लागते… सकाळी झोप उघडली…

Geplaatst door ईरा op Zondag 18 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा