“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा) भाग 3

Written by

“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा)

भाग 3

गाडी भरधाव वेगाने धावत सुटते… राजवीर तर शॉकच होऊन जातो… ज्या बाईला आपण मूर्ख आणि बावळट समजत होतो तिने आत्ताच थोड्यावेळापूर्वी एकाला ठार मारल आणि आता आपल्याला घेऊन चालली आहे… कोण आहे ही??? आणि काय हेतू असावा हिचा… ??

राजवीर : कोण आहेस तू नक्की?? आणि हे सगळं काय चाललंय??

हंसीका : (राजवीरने लगावलेल्या कानशिलामुळे तोंडातून येणार रक्त पुसत) कळेल लवकरच… आम्ही तुमच्या सेफ्टी साठीच आहोत…

राजवीर : माझी बॅग??

हंसीका : (नजरेनेच खूणावून समोरच्याला ती बॅग राजवीरला देण्यास सांगते…)

राजवीर ती बॅग घट्ट धरून बसतो…. गाडीच्या वेगाने शरीराला झोंबणार्या गार वार्‍यामुळे त्याला झोप लागते… सकाळी झोप उघडली तेव्हा गाडी एका वाड्या बाहेर येऊन थांबली होती…. राजवीर गाडीतून बाहेर पडून अंग झटकून आळस देतो… हंसीका त्याला आत येण्यास सांगते….

राजवीर : आपण इथे का आलोत??? आपल्याला मुंबईला जायच होत ना???

हंसीका : (काहीसा विचार करून) नाही… प्लान थोडा बदलला आहे… दोन एक दिवस इथे राहून मग निघायच आहे… तुमच्या माघावरचा शोध कमी झाला की आपण निघू…

इतक्यात समोरून एक वयस्कर दाम्पत्य राजवीर जवळ येतात….. त्याच्या गळ्यात पडून तो आल्याचा आनंद व्यक्त करतात… हंसीका त्यांना आधार देत बाजुला सारते…

हंसीका : आईबाबा तो थकून आला आहे प्रवासातून… हमम् नंतर निवांत बसू आपण….

आई : हो पोरी… तुम्ही हातपाय धुऊन घ्या… मी न्याहारीच बघते….

हंसीका : या राज आराम करा थोडा….

(राजवीर सगळीकडे आश्चर्याने बघत असतो)

बाबा : अरे पोरा अस काय पाहतोस?? आपलच घर आहे… जा तू आधी हातपाय धुऊन घे नी आराम कर….

राजवीरला हे काय चाललंय काहीच कळत नसत… तो शांतपणे हंसीकाच्या मागोमाग जात होता….. जाता जाता संपूर्ण घर न्याहाळत होता…. हंसीका त्याला एका खोलीत घेऊन जाते….

हंसीका : तुम्ही आराम करा मी आलेच…

राजवीरने खोलीत चहुदिशेने नजर फिरवली आणि त्याची नजर टेबलावरच्या फोटोवर येऊन स्थिरावली… त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या फोटोत हंसीका होती आणि तिच्यासोबत त्याचा फोटो होता… फक्त फोटोमधल्या राजवीरला रुबाबदार मिशा होत्या… तो आश्चर्य चकीत होऊन हंसीकाला विचारण्यासाठी मागे वळतो… तेवढ्यात हंसीका ती फोटो फ्रेम हातात घेऊन…..

हंसीका : हे माझे पती राजेंद्र दातार….स्पेशल कमांडो होते… ड्युटीवर असताना अचानक गायब झाले…. घरच्यांना माहित नाही याबद्दल …. या वयात ते हे दुःख नाही पचवू शकणार म्हणून मीच ते लपवून ठेवले…. (डोळ्यातील अश्रू आवरत) बाहेर जे भेटले ते राजेंद्रचे आईबाबा होते…. राजेंद्र त्यांचा एकुलता एक मुलगा….

राजवीर : I am sorry….

आई : बेटा आता आलाच आहेस तर एकमेकांना वेळ द्या… मागच्या वेळेसारख भांडत बसू नका….

हंसीका : अश्रू अनावर झाल्यामुळे आत निघून जाते….

राजवीर काहिच बोलत नाही फक्त आईच्या हो… ला… हो… देत असतो…. त्यादिवशी राजेंद्र आणि हंसीकाच्या लग्नाचा वाढदिवस असतो… आणि राजेंद्र घरी आल्याच्या खुशीमध्ये बाबा एक छोटा गेट टुगेदर अरेंज करतात…. ते राजवीरलाच त्यांचा राजेंद्र समजत होते…. दोघांसाठी गेटटुगेदर हे एक सरप्राइज होत….

संध्याकाळी आई हंसीकाला साडी नेसून तयार होण्यास सांगतात…. छान गडद डाळिंब रंगाची… काठपदरी साडी, छान पीनप केलेले केस, कानात झुमके त्यावर माळलेली कानवेल…. गळ्यात लांब मंगळसुत्र… .थोटी ठुशी… हातात हिरव्या बांगड्या आणि पुढे सोन्याचे कडे… हंसीका तयार होऊन बाहेर आली… काहीतरी कमी असल्याच सांगत आई तिच्या जवळ आली आणि हंसीकाच्या कपाळावर साजेसा कुंकूवाचा टिळा लावला…. आता ती अगदी नव्या नवरीसारखी भासत होती…. अगदी तशीच जशी लग्न करून पहिल्यांदा घरी आली होती….

राजवीर बाजूलाच सोफ्यावर बसून तिला एकटक पाहत होता….. काय विलक्षण सुंदर दिसत होती ती…. आईंनी तीच्या चेहर्‍यावर हात फिरवून आपल्या डोक्यावर बोटे मोडून तिची नजर काढून आपल्या डोळयातील काजळाने तिच्या कानामागे नजरेचा तिठ लावला… आणि राजवीरलाही तयार होण्यास सांगितले…. आता हळूहळू घरच्या पाहुणे मंडळी येऊ लागली…. हंसीका राजवीरला घेऊन खोलीत गेली…

हंसीका : आज आमच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे… कदाचित बाहेर त्याचीच लगबग असावी…. I’m sorry माझ्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास….

राजवीर काहिच न बोलता हंसीकाने दिलेले राजेंद्रचे कपडे परिधान करून बाहेर येतो…. बाहेर सगळे पाहुणे त्यांच अभिनंदन करतात… कोणी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतय तर कोणी भेट वस्तू देऊन…आणि कोणी आशिर्वाद देऊन…. राजवीरही काही आढेवेढे न घेता सर्वांना हसून प्रतिसाद देत होता…. आईंनी दोघांनाही एकत्र बसवुन त्यांच औक्षण केल…. काही वेळ पाहुण्यांमध्ये हसतखेळत घालवून त्याच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला हंसीका दिसत नाही….. म्हणून तो तिला बघायला घरभर फिरतो…..

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 4

हंसीका : (चुटकी वाजवून) Hello… कुठे हरवलात???राजवीर : तुम्हाला आठवण नाही येत राजची??हंसीका : (मानेनेच नाही) हमम्…

Geplaatst door ईरा op Dinsdag 20 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा