“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा) भाग 4

Written by

“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा)

भाग 4

काही वेळ पाहुण्यांमध्ये हसतखेळत घालवून त्याच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला हंसीका दिसत नाही….. म्हणून तो तिला बघायला घरभर फिरतो…..

राजवीर हंसीकाला शोधत त्यांच्या खोलीत येतो आणि बघतो तर हंसीका laptop वर काही काम करत असते….

राजवीर : इथे काय करताय तुम्ही…

हंसीका : (चकीत होऊन) तु वरून डायरेक्ट तुम्ही?? प्रगती आहे…

राजवीर : (हलकेच हसून) No no.. I mean…

हंसीका : मस्करी केली मी… (आणि हसायला लागते)

राजवीर : (मनात) जवळ एवढ दुःख असताना सगळ्यांकडून ते लपवून अस खोट हसु आनण कस काय जमत असेल हिला….

हंसीका : (चुटकी वाजवून) Hello… कुठे हरवलात???

राजवीर : तुम्हाला आठवण नाही येत राजची??

हंसीका : (मानेनेच नाही) हमम् हमम् नाही… आठवण येण्यासाठी आधी विसराव लागत…आणि राजेंद्र तर माझ्या हृदयात रुजले आहेत…

राजवीर : True Love हा….

हंसीका : हममम् ( हलकेच हसून)…. मग प्रोफेसर तुम्ही पडलात की नाही कोणाच्या प्रेमात ??

राजवीर : (हळू आवाजात) हो पडलो ना मगाशीच….

हंसीका : काही म्हणालात का???

राजवीर फक्त तिच्या एकाकी मुद्रेकडे पहात होता… काही क्षणाने भानावर येऊन

राजवीर : माझा फोन तर… You know काय झालं ते… मला घरी फोन करायचा होता आईबाबांना…

हंसीका : (थोडी गंभीर होऊन) हो बरोबर आहे तुमच पण मी तुमच्या घरी already सगळी कल्पना दिलेली आहे…

राजवीर : पण तुम्हाला त्यांचा नंबर???

हंसीका : तुमच्या मोबाइल मधुन मी आधीच घेतला होता…

राजवीर : तरी मला एकदा बोलायच होत… But anyways…

हंसीका : हमम् आराम करा. .. थकला असाल तुम्ही नाई???

राजवीर : (थोडा विचार करून) मग मी माझ्या रिसर्च सेंटर मध्ये एकदा फोन करतो….

हंसीका : (अजून गंभीर होत) कळत कस नाही तुम्हाला… तुम्ही घरातून गायब आहात.. . तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे… तुमच घर बेचिराख झालं आहे…. तुमचा शोध अजून जास्त वाढलाय…. रिसर्च सेंटरचे सगळे फोन कॉल्स टॅप केलेले असू शकतात… So please co-operate… (आता हंसीकाचा पारा चांगलाच चढला होता)

राजवीर : (आश्चर्याने) पण शांतपणे तिच ऐकून घेतो.. .

हंसीका : (त्याने संशय घेऊ नये म्हणून शांतपणे) हे बघा प्रोफेसर तुमच्या आणि या डिवाइसच्या भल्यासाठी सांगतेय मी…. Please….. हमम्….

राजवीर : OK… Good night…

रात्री झोपताना तो हंसीकाचाच विचार करत होता… मघाशी तिला पाहताच क्षणी तो तिच्यात हरवून गेला होता… तिचा विचार करता करता झोप कधी लागली कळलेच नाही…

दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा हंसीका संपूर्ण खोलीत धुपारत फिरवत होती… त्या धुपारताचा सुगंध सगळीकडे दरवळत होता…. त्या धुक्यातून तिची एक झलक त्याच्या काळजाला भिडली…. हलक्या पिवळ्या रंगाची शिफॉन साडी तिच्या कमनीय देहयष्टीला अजूनच उजळून दिसत होती… नुकतेच अंघोळ करून ओले झालेले केस टॉवेलने अर्धवट पुसून तिच्या डाव्या खांद्यावर सोडलेले ज्यातून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते… गोरापान चेहरा… कपाळावर छोटी लाल रंगाची टिकली… नाकात नाजूक हिऱ्याचा खडा… त्यात तिचे घारे डोळे…. नैसर्गिक गुलाबी ओठ…यावरून नजर काही हटत नव्हती त्याची…. ती जशी जवळ आली तशी त्याच्या हृदयाची धडधड एकदम वाढली…. इतक्यात आई दारावर टकटक करत चहा घेऊन आली तसा तो भानावर आला…. आणि ही अप्सरा आधिच दुसर्‍या कोणाची असल्याची जाणीव होताच त्याच्या मनाने आवरतं घेतल….

दोन दिवस वाड्यात राहिल्यावर सकाळी पाचला हंसीकाची तयारी सुरू झाली… राजवीरला पण तयारी करून निघण्याची कल्पना दिली… परत त्याच गाडीत बसून ते लोक निघाले…. राजवीरला तर अजूनही काय बोलाव कळत नव्हतं…

कालचा हंसीकाचा हसतमुख चेहरा आता गंभीर होताना दिसत होता….. एक वेगळाच ताठकपणा जाणवत होता तिच्यात… ती पुढे ड्रायव्हर सीटच्या बाजुला बसली होती… तीच लक्ष अगदी सतर्क असल्याच जाणवत होतं…. तिने मागे वळून एकदा राजवीरला नजरभेट दिली… तिच्या घाऱ्या डोळ्यांच्या नजरेत त्याला काहीतरी गूढ असल्याच जाणवल… पण तो निरागस चेहरा आणि एक वेगळीच हंसीका जी आपण वाड्यात अनुभवली ती आपला घात अजिबात करणार नाही याची त्याला खात्री होती….

बराच प्रवास केल्यावर गाडी एका अज्ञात स्थळी थांबली… पण आता मात्र त्याने न राहवून तिला प्रश्न केलाच…. येवढ्या घनदाट जंगलात येण्याच कारणच काय…?? सेफ्टी सेफ्टी म्हणताय तर एका मुलीवर माझी जबाबदारी सोपवली?? तीही एकट्या मुलीवर??? काल परवा तर निदान पाच कमांडो तरी सोबत होते आणि आज फक्त तू आणि हा ड्रायव्हर??? मुंबईला सरळ जायच सोडून या जंगलात घेऊन आलात तुम्ही??? तु नक्की कोण आहेस???

इतक्यात आजूबाजूला काही बंदूकधारी लोक ज्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता ते जमा झाले… त्यातल्या एकाने राजवीरच्या पाठीवर बंदुक ताणली… आणि हातातली बॅग देण्यास सांगितले पण राजवीरने त्यांच काहीही न ऐकता बॅग अजून घट्ट आवळून पकडली…. तशी हंसीकाने जोरदार त्याच्या कानशिलात लगावली…. आणि बॅग त्याच्याकडून हिसकावून घेऊ लागली पण राजवीर काही बॅग सोडायला तयार नव्हता… शेवटी त्यातल्या एकाने त्याच्या डोक्यात त्या मोठ्या बंदुकीचा फटका मारला तस राजवीर खाली पडला.. अजून दोघा तिघांनी लाथा बुक्के मारून ती बॅग हिसकावून घेतली… राजवीर मात्र मार खाता खाता हंसीकाला पाहत होता… ती मात्र तशीच तटस्थ उभी होती…. आणि राजवीरला भूवळ आली… डोळे बंद होताना सुद्धा तो हंसीकालाच पाहत होता …

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 5 अंतिम

नाईक : Well done हंसीका…. You did it great job…. राजवीर… तु खरच खूप छान डिवाइस बनवल आहे… बाहेर या डिवाइसचे मला 500 कोटी…

Geplaatst door ईरा op Donderdag 22 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा