“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा) भाग अंतिम

Written by

“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा)

भाग 5

राजवीरला जेव्हा जाग आली तेव्हा तो एका खुर्चीवर बसुन होता… त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले होते…. त्याने नजर वर करून पाहिले तर समोर हंसीका आणि तेच मगाचचे बंदुकधारी…. आणि अजून एक ओळखीची व्यक्ती… ते म्हणजे प्रोफेसर नाईक…. त्याला आनंद झाला की प्रोफेसर नाईक सुखरूप आहेत पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही….

नाईक : Well done हंसीका…. You did it great job…. राजवीर… तु खरच खूप छान डिवाइस बनवल आहे… बाहेर या डिवाइसचे मला 500 कोटी अडवान्स सुद्धा मिळाले… मी तुलाही 200 कोटी मिळवून देतो… माझ्या सोबत काम कर…. आपण हा देश सोडून जाउ …. कशाला ती मोजक्या पगाराची नोकरी करतोस???

राजवीर : (रागात) गद्दार…… प्रोफेसर!!…. तुम्ही पैशासाठी विकले गेले असाल पण मी नोकरी करत नाही देश सेवा करतो… माझ्या देशाशी मी गद्दारी करणार नाही आणि गद्दारी करणाऱ्याला मी साथ देणार नाही…

हंसीका : विचार कर राजवीर तुझा जीवही जाऊ शकतो….

राजवीर : shut up you…——- (अर्वाच्य भाषेत शिवी देत)

हंसीका : (त्याच्या तोंडून शिवी ऐकून परत त्याच्या एक कानशिलात लगावते)

नाईक : calm down हंसीका….. याला आपण नंतर बघू….. संध्याकाळी मिटींगमध्ये आज या डिवाइसची डील फिक्स होईल… तुझे वीस कोटी advance transfer केलेत… संध्याकाळी भेटू राजवीर….

हंसीका : Thank you… प्रोफेसर….

प्रोफेसर आणि हंसीका निघून जातात….. राजवीरला आता स्वतःचाच राग येत होता…. आणि त्याहून जास्त काळजी त्याने बनवलेल्या डिवाइसची वाटत होती…. राजवीर ने जे डिवाइस बनवल होत त्याने आपल्या रडारमध्ये येणाऱ्या दुश्मनाच्या मिसाइल किंवा विमाने यांचा प्रोग्राम हॅक करून ते निकामी करू शकतो… आणि आल्या पावली त्यांना त्यांच्याच जागी परतवून प्रतिहल्ला करू शकतो…. हे डिवाइस त्याला  आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला सुपूर्त करायचे होते….

इथे संध्याकाळी मिटींगसाठी सगळे जमा झाले.. सर्वांच्या भेटीगाठी झाल्यानंतर प्रोफेसर नाईकनी सर्वांना त्या डिवाइसची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवले… डील जवळ जवळ फायनल झाली आणि अचानकपणे तिथे भारतीय सैन्य दलाने भराभरा प्रवेश केला… तिथे उपस्थित सर्वांना ताब्यात घेतले… काय तो आपल्या भारतीय सैन्य दलाचा रुबाब… वाहह!! त्यांची तर बातच न्यारी… आपल्या जवानांना पाहताच दुश्मन देशाचे धाबे दणाणतात ते काही उगाच नाही याची प्रचिती तिथे उपस्थित असलेल्या त्या गद्दारांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती…. प्रोफेसर नाईक पुढे काही आक्रमक हालचाल करणार तेवढ्यात हंसीकाने त्याला रोखल…..

नाईक : हंसीका?? (तिच्या प्रतिकाराला चिडून)

हंसीका : take it easy प्रोफेसर…. I am हंसीका दातार… A secret agent…

नाईक : म्हणजे??? तु??? (आश्चर्यचकित होऊन)

इतक्यात बाकीचे जवान नाईकच्या त्या तळात कैद असलेल्या आपल्या इतर शास्त्रज्ञ आणि ओलिस ठेवलेले इतर लोकांची सुटका करतात…. त्यात राजवीरही असतो…

हंसीका : हो.. माझे पती राजेंद्र यांना काही पुरावे मिळाले होते प्रोफेसर तुमच्या विरोधात… पण ते अपुरे होते तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आणि आम्हाला हे पण जाणून घ्यायच होत की कोण कोण यात सहभागी आहे… राजेंद्र गायब झाल्याने तुमच्या वरचा संशय अजून वाढला पण ठोस हाती काहीच लागत नसल्याने विषय काहीसा थांबत चालला होता… येव्हाना माझी ट्रेनिंग पूर्ण होत आली होती आणि मी secret agent बनण्याचा निर्णय घेतला…. गेली दोन वर्षे लागली मला हे सगळं सफल करण्यासाठी…. त्याच दरम्यान राजवीरच्या डिवाइसमध्ये तुमचा वाढता रस ओळखून आम्ही त्या दिशेने वेग वाढवला…. (राजवीर आवासून ऐकत होता)

नाईक : (चलाखीने डिवाइस आॅन करून) पण त्याचा काही उपयोग होणार नाही…. मी आता हे डिवाईस आॅन केल आणि आता तुमचे सगळे यंत्रणा नेस्तनाबूत होणार….

हंसीका : (हसून) दोन दिवस माझ्या घरी राहून हा duplicate डिवाइस बनवला आहे आता याच्या प्रोग्राम नुसार तुमच तळ पुढच्या अर्धा तासात उद्ध्वस्त होणार…. खरा डिवाइस तीन दिवसापूर्वीच आपल्या सुरक्षित ठिकाणी पोहचला…. काय प्रोफेसर राजवीर त्या डिवाइसचा पासवर्ड तुम्ही स्वतः आहात… तुमच्या eye scan शिवाय ते ओपन होत नाही विसरलात का??? (राजवीर आश्चर्याने बघत बसतो) Quick boys…. (जवानांना) लवकर इथुन निघा आपल्याकडे फार कमी वेळ आहे….

सगळे भराभर बाहेर पडतात…. आपले helicopter तयारच असतात… सगळ्यांना त्यात बसवून एक एक उड्डाण करतात… याच दरम्यान राजवीरची नजरभेट बघून हंसीका त्याला मिठी मारून त्याची पाठ थोपटून झालेल्या सगळ्याच बाबतीत माफी मागते…. शेवटचे दोन helicopter उड्डाण करणार इतक्यात नाईक तिला राजेंद्र याच तळाच्या गाभाऱ्यात कैद असल्याचे सांगतो…. हे ऐकून हंसीका शॉक होउन जाते… आणि तशीच पाठी फिरुन ती त्या तळात राजेंद्रला शोधण्यास निघून जाते…. ती घड्याळ बघते अजूनही पंधरा मिनिटे बाकी असतात…. जीवाचा आटापिटा करुन ती तळघर शोधते…. एव्हाना एक एक करून तळाचा भाग उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते… तो आवाज ऐकून हंसीका अजून जोर धरू लागते… एका ठिकाणी कोपर्‍यात एक दार सापडत ज्याला लोखंडी सळीची खिडकी असते… त्यातून वाकून बघते तर समोर राजेंद्र असतो… साखळीने बांधलेल्या अवस्थेत… खूप प्रयत्नानंतर ती ते दार तोडण्यात यशस्वी होते….

हंसीका धावत जाऊन राजेंद्रला घट्ट मिठी मारते…. वेड्या सारखी आनंदून जाते… राजेंद्रही तिला बघून खुश होतो… साखळी सोडून दोघेही बाहेर पडतात पण स्फोटामुळे तळ उध्वस्त होण्यास सुरुवात झालेली होती आणि बाहेर पडण्याचे एक एक रस्तेसुद्धा बंद झाले होते…. दोघांनाही आता कळून चुकलं होतं की आता बाहेर पडण अशक्य आहे…. हा आत्ताचा क्षण ऐकमेकांच्या मिठीत सामावून घेत त्यांनी डोळे बंद केले ते कायमचेच….

स्पोटाची तिव्रता इतकी भयानक होती फार दुरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते…. राजवीरने तो शेवटचा स्पोट ऐकला आणि त्या दोघांनाही मनोमन आदरांजली वाहिली….

हंसीकाने ते वीस कोटी रुपये military फंडला आधीच दान केले… सरकारने हंसीका आणि राजेंद्र यांचा गौरव करून त्यांना योग्य सन्मान केला… तीन महिन्यानंतर राजवीरचा डिवाईस सगळ्या टेस्ट पास करून भारतीय सुरक्षा यंत्रणेला सुपूर्त करण्यात आला… त्या डिवाईला राजवीरने “राजहंस” असे नाव दिले… राजेंद्र आणि हंसीका यांच्या देशप्रेमाच आणि त्यांच एकमेकांवर असलेल्या प्रेमाच प्रतिक…… ” राजहंस”

हंसीकाचे सासूसासरे म्हणजे राजेंद्रचे आईवडील यांची राजवीरने, राजेंद्र बनून जबाबदारी स्वीकारली…. धन्य ती हंसीका…. धन्य तो राजेंद्र… धन्य तो राजवीर आणि धन्य ते त्यांच देशप्रेम…..

समाप्त

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग एक पासून वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

हैद्राबाद रिसर्च सेंटर चे हेड प्रोफेसर संदीप नाईक यांच्या रिटायरमेंटची पार्टी आयोजित केली होती…. सगळे मोठ मोठे अधिकारी,…

Geplaatst door ईरा op Donderdag 15 augustus 2019

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा