“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा) भाग 1

Written by

“राजहंस” मिशन (एक प्रेम कथा)

भाग 1

हैद्राबाद रिसर्च सेंटर चे हेड प्रोफेसर संदीप नाईक यांच्या रिटायरमेंटची पार्टी आयोजित केली होती…. सगळे मोठ मोठे अधिकारी, विज्ञान क्षेत्रातील नामवंत हस्ती सगळेच तिथे हजर होते…. पार्टी छान रंगात आली होती… सगळेच प्रोफेसर नाईक यांना भेटून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते… त्यांनी केलेल्या अफाट कार्याचे कौतुक करत होते…

(इतक्यात मागून आवाज ऐकू येतो)

राजवीर : Hello प्रोफेसर….

नाईक : (मागे वळून) राजवीर…. Hello…. After a very long time…. How are you….(हात मिळवणी करत) हल्ली नाव खूप गाजतय तुमच….

राजवीर : काय मस्करी करताय सर…. तुमच्याच हाताखाली तयार झालो आहे….

नाईक : No no… You really deserved….. आता एक नवीन मिशन हाती घेतल आहेस म्हणे ??

राजवीर : हो…

नाईक : बर मला तुझी help हवी होती… If you don’t mind…

राजवीर : बोला ना सर… It’s my pleasure to help you….

नाईक : माझी भाची आहे “हंसीका”…. ती आपल्या शास्त्रज्ञांवर एक documentary बनवत आहे… So can you please help her for that???

राजवीर : मी ह्यात काय मदत करणार ???

नाईक : मी केली असती पण तिचा हट्ट आहे तुझ्यासोबत ही documentary बनवण्याचा…

पुढे काही बोलायच्या आत प्रोफेसर इतर गेस्ट सोबत बिझी झाले…. तसा राजवीरला पार्टीत फार रस नव्हता… पण प्रोफेसर नाईक हे त्याचे गुरु होते… त्यांना तो आपले आदर्श मानत होता…. आज खास त्यांच्यासाठी म्हणून राजवीरने पार्टी अटेंड केली…. पार्टी संपवुन तो परत आपल्या घरी यायला निघाला….

राजवीर….एक देखणा… राजबिंडा… तरुण… गोरापान आणि धिप्पाड देहयष्टी…. शिक्षणाची प्रचंड आवड आणि त्यामुळेच एक हुशार शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता… त्याच्या तल्लख बुद्धीचा चिकाटीने वापर करून तो आज उंच शिखरावर पोहचला होता…..

राजवीरच घर लोणावळ्याच्या उंच टेकडीवर… निसर्गाच्या सानिध्यात अगदी आडोशाला लपवून ठेवाव अस शांत आणि फार कमी रहदारी असलेल्या ठिकाणी होत…. राजवीरच्या मतानुसार मनाच्या एकाग्रतेसाठी अशी जागा कधीही उत्तम…. राजवीर काही नवीन प्रोजेक्ट असले की सहसा याच ठिकाणी काम करत असे… आता तर काम असो वा नसो तो याच घरी असायचा…. त्याचे आईबाबा मुंबईत राहायला असायचे….

राजवीर घरी पोहचला…. समोर दारावर एक सत्तावीस अठ्ठावीस च्या वयातील गोरीपान, उंच देखणी तरूणी येरझारा घालत होती…. लांब पायापर्यंत लोळणारा रंगीबेरंगी घागरा….त्याला लांबसर वूलनची दोरी आणि त्या दोरीला दोन लाल पिवळ्या रंगाचे गोंडस, सफेद रंगाचा ३/४ स्लिव्हचा टी – शर्ट, गळ्यात घागरा मॅच होईल असा दुपट्टा, एका हातात जाड कडा, डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ, केसांची घट्ट अशी बांधलेली पोनी, कानात खड्याचे छोटे टॉप्स, लांब सडक नाक, घारे डोळे आणि गुलाबी ओठ…….. कमाल होती ती…..

पण तिला पाहताच राजवीरचा पारा एकदम चढला….

राजवीर : तु इथे पण पोहचलीस ?? तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का???… Without permission तु इथे कशी आलीस …??

ती : ओ Hello… तुम्हाला कोणी सांगितलं की मी without permission आलीए…. आज मी permission घेऊन आली आहे… प्रोफेसर नाईक यांनी permission दिली आहे मला… (अगदीच नटखट attitude मध्ये)

राजवीर : त्यांनी त्यांच्या भाची बद्दल विषय मांडला होता, तुझा काय संबंध?? अजून मी त्यांना होकारही सांगितला नाही….

ती : अहो मीच ती भाची…. हंसीका!!..

राजवीर : अरे यार काय ताप आहे?? (स्वतःशीच बडबडत घराच दार उघडतो)

हंसीका : अय्या काय भुत बंगला आहे हो तुमच घर… घरात लाईट नाही आहे का?? (उगाच काहीच कळत नसल्याचा आव आणत)

राजवीर : (मुद्दाम घाबरवून) हो.. भुतच राहतात इथे… कधी कधी दिसतात राउंड मारताना…. तरी पण तुम्हाला यायच असेल आत तर येऊ शकता….

हंसीका : अय्या खरच…?? मग मस्तच आहे …. तुमच झाल की, मी त्यांच्यावर पण documentary बनवू शकते इथे….

राजवीर : (डोक्यावर हात मारून) चला आता….

डोक्यावर मारल्याने टाळीचा जो आवाज आला त्याने लाईट आपोआप चालू झाली… Automatic system बसवून घेतली होती त्याने…. जिथे गरज नाही तिथे दिवे आपोआप बंद राहतील अशी चोख व्यवस्था केली होती… एक हॉल, दोन बेडरूम, एक स्टडी रूम, किचन आणि जिम साठी सुद्धा एक स्वतंत्र खोली, एक automatic दार…. त्या दाराच्या पलीकडे राजवीरची खास संशोधन खोली होती… तिथे जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती…. थोडक्यात काय तर शास्त्रज्ञानाला शोभाव असच घर होतं राजवीरच…..

हंसीकाला तिची रूम दाखवून त्याने त्या घरासाठी बनवलेली नियमावली तिच्या हातात दिली आणि इथे राहायच असेल तर हे नियम पाळावेच लागतील… अस तिला खडसावून सांगितल….. आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला….. हंसीका मात्र राजवीर गेल्यावर त्या automatic दाराजवळ गेली…. त्याला विशिष्ट प्रकारची उभी काच होती…. तिने त्यातून पलीकडे बघण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसत नव्हते…..

इतक्यात तिचा मोबाईल वाजतो…. मोबाईलच्या रिंगमुळे त्या डोअर मधून एकप्रकारचा सायरन बाजू लागला आणि रंगीबेरंगी लाईट चमकू लागली… ती घाबरली…. मागून राजवीर आला…. तो रागातच म्हणाला…. नियमावली आधी वाचुन घे मला उगाच त्रास देऊ नको….(फोनची रिंग वाजतच होती) आधी तो फोन रिसीव्ह कर….. राजवीर म्हणाला…

हंसीका : (जरा घाईतच) Hello…..

नाईक : भेटला का राजवीर??? कसा वाटला???

हंसीका : हो भेटला ना…. खडूस आहे थोडा….( तोंड वाकडं करून हळू आवाजात)

नाईक : बर बर…. (अचानक घाबरलेल्या आवाजात) कोण??? कोण आहात तुम्ही??? काय हवयं तुम्हाला???

हंसीका : (पलीकडून बराच गोंधळ ऐकून) Hello…. Uncle??? any Problem??? काय झालं? कोण आहे?? Hello…. Hello….. (आणि फोन कट होतो)

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 2

हंसीका शांत असते… मगाचशा आपल्या वागणुकीबद्दल राजवीर तिची माफी मागतो… आणि दोघेही आपापल्या रुममध्ये निघून जातात…. रात्री…

Geplaatst door ईरा op Vrijdag 16 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा