राणू मंडळ : रेल्वेस्टेशनवरील सुमधुर आवाज….!!

Written by

?राणू मंडळ : रेल्वे स्टेशनवरील समधूर आवाज….!!

मानवाला मिळालेली छंद ही अमुल्य देणगी आहे.प्रत्येकांचे छंद वेगवेगळे पण त्या छंदाना प्रयत्नांच्या कोंदणात बसवून झळाळी देण महत्वपुर्ण काम असत.आपली आवडती कला जोपासली असता कधीना कधी त्याच सोन होत पण तेव्हडा संयम असावा लागतो , कधी ही संधी दिर्घकाळाने येईल त्यावेळी यशाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जातील व संपुर्ण जग कवेत घेतल्याची जाणीव तुम्हांला होईल…नेमकी हिच परिस्थिती राणू मंडळच्या बाबतीत घडली …!!
राणू मंडळ पश्चिम बंगालच्या राणाघाट स्टेशनवर भीक मागत असत.भीक मागत असताना ती नेहमी गाण म्हणत असत.असेच भीक मागताना तीने लता मंगेशकर यांनी गायलेले ” एक प्यार का नगमा है..” हे गाण गायल.या गाण्यात एवढी मिठास होती की गाण ऐकतच रहावं असे वाटते….याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.या आवाजाला संगीतकार व गायक हिमेश रेशमियाजीनी ओळखले व चक्क स्टुडिओत गाण्यास आणले.राणू मंडळला चांगला लुक दिला व रेल्वे स्टेशनवरील भीक मागणारी बाई सुरेल आवाजात गाऊ लागली.हिमेश रेशमियाजी बरोबर ” तेरी मेरी कहानी ” हे गाण गाताना दिसते आहे…
नशीब बलवत्तर असले तर तुम्ही रातोरात स्टार बनु शकता ही ताकद सोशल मिडीयात आहे हे राणू मंडलच्या गाणार्या व्हिडीओने दाखवून दिले आहे .कलेला श्रीमंत व गरीब असा भेदभाव नसतो.हिमेश रेशमियाजी यांनी संगीत कलेला दिलेली ही संधी वाखाणण्याजोगी आहे…त्यामुळे राणू मंडळाच्या आवाजाला नवीन जीवन मिळाले…हिमेश रेशमियाजी यांचे अभिनंदन…व राणू मंडळच्या गोड आवाजाला सोनेरी शुभेच्छा ..!!

✍नामदेव पाटील .

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा