…. रावसाहेब (भाग 1 )

Written by

भाग 1

वाड्यात मोठी लगबग चालू होती . आनंदी आनंद एकदम . वाड्याची साफसफाई , रोषणाई , खाद्यपदार्थांची रेलचेल होती . वाड्याबरोबर पुर्ण गावंच सजला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही . रावसाहेब , गावचे सरपंच ! पुर्ण गावाचे सर्वेसर्वा . लक्ष्मी रावसाहेबांच्या वाड्यात पाणी भरते असं साऱ्या पंचक्रोशीत म्हटलं जातं होतं . रावसाहेब मोठा हुशार माणूस ! याच रावसाहेबांनी  तारुण्यात असतांना सारा गाव साम-दंड-भेद वापरून आपल्या दहशतीखाली आणला होता . गावाला रावसाहेबाशिवाय पर्याय नव्हता ! रावसाहेब सांगतील तोच न्याय , रावसाहेब सांगतील तीच पूर्व दिशा . असं असलं तरीही गावातल्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यात रावसाहेबांनी खूप मदत केलेली होती . वय जसं जसं वाढत जातं होतं तस तस रावसाहेबचा स्वभाव मवाळ होत होता ! यातच गावाचा  भलं होतं . रावसाहेब आज खूप  खुश होते . का असू नये ? त्यांची   लाडकी कन्या पूजा  शहरातून पदवीचं शिक्षण घेऊन गावात येणार होती . गावातील पहिली पदवीधारक तरुणी ! रावसाहेबांना एक मुलगा आणि एक मुलगी . पण मुलाचं दहा  वर्षांपूर्वीच एका आजाराने निधन झालेलं . अनेक डॉक्टर , बाबा , व्रत वैकल्य करून झाले परंतु त्या रोगाचं निदान होऊ शकलं नाही .  रावसाहेबांचा कर्मकांडावर प्रचंड विश्वास ! कुणीतरी करणी करून मुलाला ठार मारलाय असं अजूनही त्यांना वाटत .त्यामुळे आपल्या मुलीवर कुणी करणी करू नये यासाठी त्यांनी तिला दूर शहरात पाठवले ! तिच्या येण्याची वेळ झाली होती !  रावसाहेबांची नवी करकरीत गाडी तिला शहरात घेण्यासाठी धाडली होती ! फटाक्यांचा आवाज सुरु झाला . वाड्यातील सारे लोक तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले .  पोरीला इतक्या दिवसांनंतर पाहून रावसाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते .  आशा आत्याने तिची ओवाळणी केली .  लग्न झाल्या झाल्या नवऱ्याचं अपघातात निधन झाल्याने रावसाहेबांची बहीण आशा वाड्यावरच राहत होती .  घरात प्रवेश करताच भिंतीला टांगलेल्या आपल्या आईच्या फोटो ला पूजाने नमस्कार केला . पूजा चा जन्म झाल्या नन्तर एका वर्षात तिच्या आईच निधन झालं होत . रावसाहेबांच्या मते कुणीतरी करणी केली होती . सर्व काही सुरळीत पार पाडल्यानन्तर रात्रीच्या जेवणाच्या तयारीची सुरुवात झाली . पूजाला आवडणारे  पदार्थ रमन काकांनी तयार करून ठेवलेले होते . रमन काका रावसाहेबांचे अत्यंत विश्वासू !! घराची सारी देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर !! त्यांचा एकुलता एक मुलगा शहरात शिकायला होता . रावसाहेबांनी खूप आर्थिक मदत त्याला पुरवली होती .  पूजा आली त्यामुळे साहजिकपने त्यांना आपल्या मुलाची आठवण झाली . जेवण झाल्यांनतर  पूजा शत-पावली करण्यासाठी निघाली . इतक्या वर्षांनंतर  हि अशी मोकळी हवा तिला अनुभवायला मिळाली होती . सोबत शीतल होतीच ! तिची शहरातील मैत्रीण .. ग्रामीण जीवन बघण्याची भारी हौस असल्याने ती पूजा बरोबर आली  होती . परंतु तिला येणाऱ्या संकटांची जाणीव नव्हती ! फिरत असताना शेताच्या मध्यवर्ती भागात एक छोटीशी झोपडी बांधलेली होती . एका भल्या मोठ्या झाडाखाली … तेथून मंत्र उच्चारण्याचा  आवाज येऊ लागला . दोघींची पावली उत्सुकतेपोटी तिकडे वळली . तेवढ्यात नथू (रावसाहेबांचा नोकर ) धावत धावत तिथे आला . आणि त्यांना अडवू लागला . रात्रीच्या वेळी तिकडे जाण्यास गावात कुणालाच परवानगी नाहीये . नथू  चे बोलणं ऐकून दोघींचा संशय बळावला ! नथूकडे आणि झोपडीकडे ते संशयास्पद नजरेने बघू लागले ! दोघेही घरी आले . रावसाहेबांना घडलेला प्रकार कळला . रात्री सारे निवांत झोपी गेले असताना अचानक पूजा जागी झाली . केस मोकळे करून , मन गरगर फिरवून कोणते तरी मंत्र उच्चारू लागली . घाबरलेल्या शीतल ने सारा वाडा जागा केला .

क्रमशः ….

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

Comments

  • थ्रिल्लिंग !! waiting 4 next

    Fan of abhijeet pawar 12th सप्टेंबर 2019 8:38 am उत्तर
  • अप्रतिम बंधू!!!

    Pratap rajnor 12th सप्टेंबर 2019 1:56 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत