…. रावसाहेब (भाग 3)

Written by

भाग 3
दिवसामागून दिवस जाऊ लागलेत . गावात कुणीतरी सरकारी अधिकाऱ्याची बदली झाली होती . सरकारी अधिकारी आला म्हणजे कार्यालयाधी त्याला वाड्यावर रावसाहेबांना भेटायला जावं लागत असे . तरुण पोरगा …त्याने आपले नाव सुबोध असे सांगितले .अमुक अमुक परीक्षा पास करून अमुक अमुक पदी माझी निवड झाली आहे असं काहीतरी तो सांगत होता . रावसाहेबांना ते एवढं समजलं नाही . फक्त हा सरकारी अधिकारी आहे आणि याच्याशी गोडीत राहाव लागेल एवढच रावसाहेबांना माहिती होतं . रमण काकांना त्याच्या राहण्याची व्यवस्था करायला लावली . वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत त्या अधिकाऱ्याची सोय झाली . त्या मुलाकडे पाहून रमण काकांना आपल्या पोराची आठवण झाली . रमण काकाचे डोळे भरून आले होते . आणि त्यांचे भरलेले डोळे बघून या तरुण अधिकाऱ्याचेही डोळे भरून पावले . असो , त्या दिवसाच्या प्रकरणापासून रावसाहेबांचे साधू महाराजांकडे जाण्याचे प्रमाण वाढले होते . रमण काकांना पुन्हा हे संशयास्पद वाटले ..अमावास्येची रात्र .. रात्रीच्या सुमारास पूजा आपल्या खोलीतून बाहेर आली . थेट रावसाहेबांच्या खोलीत . दरवाज्याच्या आवाजामुळे त्यांना जाग आली . ” अगं पूजा , इतक्या रात्री इथे काय करतेय ? ” वाक्य पूर्ण होण्याआधीच तिने रावसाहेबांचा गळा दाबण्यास सुरुवात केली . रावसाहेबांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली . वाडा जागा झाला . नथू झोपडीकडे धावला . साधू महाराज धावत धावत वाड्यात दाखल झाले . पूजाला वाड्यातील लोकांनी धरून ठेवले होते . ” रावसाहेब तुला मी सोडणार नाही . तुझा खून केल्याशिवाय आम्हाला मोक्ष मिळणार नाही ” अशी काहीतरी पूजा बडबडत होती . साधू महाराजांच्या मंत्र उच्चारण केले . पूजा पुन्हा अधिसारखी शांत झोपी गेली . सुबोध (अधिकारी ) हा सारा प्रकार शांतपणे बघत होता . त्याला हा काहीतरी वेगळाच प्रकार असे जाणवू लागले .
सारा वाडा भीतीच्या अधिपत्याखाली आला होता . रावसाहेबांना तर पुरता घाम सुटला होता . सारे पुन्हा शांत झोपी गेले . गावात चर्चा सुरु झाली . १० वर्षांपूर्वी आलेला प्रकोप पुन्हा सुरु झाला कि काय असे वाटू लागले . शीतल ला शहराकडे जाण्याची ओढ लागली होती परंतु पूजाला अश्या स्थिती सोडून जाऊ नकोस असं रावसाहेब वारंवार सांगत होते . याच काळात शीतल आणि सुबोधची चांगली गट्टी जमली . गावामध्ये ती आल्यापासून घडलेले सर्व प्रकार तिने त्याला सांगितले . गावातले प्राचीन मंदिर वैगरे चा फेरफटका देखील मारला . मुळात घरातील वातावरण धार्मिक असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सुबोध त्या साधू महाराजांना भेटायला त्यांच्या झोपडीत गेला .त्यांची विचारपूस केली ..त्याची नजर ” शोधक ” होती . सरकारी अधिकारी म्हणून सुरु होणाऱ्या नवीन कामासाठी त्याने साधू महाराजांचा आशीर्वाद घेतला . महाराजांनी त्याला प्रसाद देऊ केला आणि तुझ्या कामात यशस्वी हो असा आशीर्वाद देखील दिला .

क्रमश ….

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा