…रावसाहेब ( भाग 5 )

Written by

भाग ५
गावात नेमकं काय चालू आहे याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्ह्ता !! साधू महाराज , शीतल याना गाव सोडण्यास मनाई करण्यात आली . सुबोध गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रकरणांचा तपास करायला गावात आला होता परंतु आता रावसाहेबांचा मृत्यू त्यासारख्या समोर आ वासून उभा होता . रावसाहेबांच्या खुनाचा तपास लागत नाही तोपर्यंत कुणीही कुठेच जाणार नाही .. सभा स्थगित करण्यात अली . गावात प्रचंड भीतीचे वातारण . त्यात सब इंपसेक्टरची भीती वेगळीच . सुबोध ने गावात आल्यापासून अनेक गोष्टी शोधून काढल्या होत्या . आणि गावात होणाऱ्या खुनांचा छडा लावण्यापासून तो थोडा दूर असतानाच रावसाहेबांचा झालेला खून त्याच्यासाठी धक्का होता.. वाड्यावर पुन्हा एक मीटिंग भरवण्यात आली . सुबोध ने अनेक लोकांना या मीटिंगसाठी सांगावा धाडला होता . शीतल खूप घाबरलेली होती . “आपल्या वडिलांचा खून करताना तुला कसलीच भीती का वाटली नाही ?” सुबोध चा रोख पूजाकडे होता . सारा वाडा धक्क्यात गेला . पोटची पोरगी रावसाहेबांचा खून करेल ? कुणालाही विश्वास बसत नव्हता . सुबोधने पूजाबद्दल सर्व माहिती शीतल कडून तिच्या नकळत काढली होती . पूजा ही शीघ्रकोपी होती. शहरात असताना एका वेगळ्या जातीच्या मुलाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते . आणि हे तिने रावसाहेबांना सांगितले देखील होते . रावसाहेबांचा या गोष्टीला विरोध होता.. प्रतिष्ठा मातीला मिळेल याची त्यांना भीती होती . यावरून त्यांच्यात अनेकवेळा भांडण देखील झालेले होते . काहीवेळा तर तिने रागाच्या भरात मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी सुद्धा दिली होती . त्यातल्या त्यात वाड्यात आल्यावर अंगात भूत आल्याच नाटक करून तिने रावसाहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे . सुबोधचे स्पष्टीकरण एकूण सर्वच जण गर्भगळीत झाले . पूजाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली होती . आमच्यात भांडणं झालेली असली तरी मी त्याचा खून केला नाही हे वारंवार ती सांगत होती . सुबोधने अशा आत्याकडे आपला मोर्चा वळवला . ” संपत्ती आणि भावाच्या कर्मकांडाला कंटाळून एकदम पद्धतशीर पने भावाला संपवले आशा आत्या ” … लहानपणापासून आपल्या भावाचा तापट स्वभाव आणि कर्मकांड पणा आशा आत्याला खटकत होता . त्यातल्या त्यात केवळ कर्मकांडावर विश्वास ठेवून अजून संपत्ती आणि सत्ता मिळेल यासाठी रावसाहेबांनी आपल्या पतीला ठार मारले असे आशा आत्याला वाटत होते . आणि त्यात थोडे तथ्य देखील आहे .. आणि त्यामुळेच या सूडासाठी भावाचा खून केलात तुम्ही आशा आत्या ? … सुबोध ने विचारणा केली .. ” हो , मला त्या सैतानाला ठार करायचे होते .. मी अनेकवेळा तसे प्रयत्न देखील केले पण त्यात यशस्वी होऊ शकले नाही .. जरी हा खून मी केला नसला तरी हा सैतान मेल्याचं मला खूपच आनंद आहे ” भर वाड्यात आशा आत्याचा हसण्याचा आवाज घुमत होता . वाड्यातील लोक नेमकं काय चालू आहे याचा अंदाज बांधत होते .

क्रमश …

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा