…. रावसाहेब (भाग 7 )

Written by

भाग 6
” संपत्तीची , बायकांची , दारूची व्यसन जितकी वाईट नाही त्याहून वाईट सत्तेची नशा असते . सत्तेची खुर्ची माणसाला काहीही कार्याला भाग पडू शकते .. काय बरोबर ना युवा नेते संतोष ? ” सुबोधने आता संशयाची सुई संतोष कडे फिरवली . रावसाहेबांना सत्तेतून काही केल्या खाली करायचे या एका धेय्याने संतोषला पछाडले होते .आणि हे सर्वश्रुत होते . त्यामुळे सध्याचे वातावरण एकूणच संतोषला सोयीचे वाटले .. म्हणजे रावसाहेब संपतील आणि संशयाची सुई करणी वर जाईल याची त्याला शाश्वती असल्याने त्याने नियोजन पूर्वक काटा काढला . ” व्हय , या रावसाहेबचे दिवस भरत आले आहेत असं हा मागे मला म्हणाला होता .. यानेच माझ्या मालकाला संपवले ” रमणकाका आक्रोश करत सांगू लागले . ” नाही … माझा विरोध फक्त राजकीय होता .. रावसाहेब माझ्यासाठी गुरुसमान होते .. मी त्यांचा खून नाही केला …” संतोष पुरता घाबरून गेला होता .. परवानगी शिवाय गाव सोडू नये असे सुबोधने सर्वांना बजावले . सुबोधने हवेत दगडं मारून बघितले . पुराव्यांच्या अभावामुळे त्याला काही सिद्ध करता येत नव्हते . तो व्यथित झाला होता . ज्यांच्यावर संशय होता त्यांच्याविरोधात अजून बऱ्याच गोष्टी शोधायच्या होत्या . व्यथित मनाने तो सकाळी साधू महाराजांकडे गेला . त्यांना आपल्या मनाची घालमेल सांगितली . साधू महाराजांनी त्याला धीर दिला .. प्रयत्न करत राहा , यश नक्की मिळेल त्यांनी सल्ला दिला .. सुबोधचि शोधक नजर शांत बसत नव्हती . अजून अस्वस्थ होऊन तो झोपडीतून बाहेर निघाला . नथूला सोबत घेतले … आणि गावभर तो म्हाताऱ्या लोकांची विचारपूस करू लागला .. त्याच्या डोक्यात वेगळेच खुळ भरले आहे कि काय असे नथूला वाटू लागले .. पुढची अनेक दिवस सुबोध वेगळ्याच जगात राहत होता.. खुनाचा शोध लावणे त्याच्यासाठी अवघड समस्या बनली होती .अनेक पुरावे , अनेक जुन्या घटना यांचा तो शोध घेत होता . रावसाहेबांच्या खोलीत त्याच्याशिवाय कुणीच प्रवेश करू शकत नव्हते . पुढची ग्रामसभा सुरु झाली . ग्रामसभा संपणार एवढ्यातच सुबोध पुढे आला .. ” गावात गेल्या दहा वर्षांमध्ये जेवढे संशयास्पद मृत्यू झाले त्याचा शोध मला लागला आहे . आशा आत्याचा नवरा , गावातील अनेक माजी पंचायत सदस्य यांचा कोणत्या करणी मुळे नाही , किंवा अपघातामुळे मृत्यू झालेला नाही . ” सारा गाव चुळबुळ करू लागला . ” त्यांचा खून करण्यात आला आहे . आणि यातल्या बऱ्याच खुनाच्या मागे रावसाहेबांचा हाथ होता ” आता मात्र गावकरी भडकले .. देवमाणूस रावसाहेबाबद्दल हे असलं काहीही खपवून घेतले जाणार नाही असं स्पष्टपणे म्हणाले . ” माझ्याकडे पुरावे आहेत .केवळ कर्मकांडावर विश्वास ठेवून रावसाहेबांनी हे खून केलेले आहेत . त्यात त्यांना अजून एकाची साथ होती ” ” काय साधू महाराज , मी बरोबर बोलतोय ना ? ” गावावर पुन्हा एक बॉम्ब पडला होता .. आधी रावसाहेब आणि आता साधू महाराज यांच्यावर सुबोध ने आरोप केले होते . गावकरी सुन्नपणे सारी गम्मत बघत होते . ” आणि गावकर्यांनो , हे साधू महाराज दुसरे तिसरे कुणी नसून १५ वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेला वेडा झालेला रघु आहे ” साधू महाराजांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले . गाव अचंम्बीत झाला . क्रोधीत नजरेने त्याच्याकडे बघू लागला . ” साधू महाराज तुम्ही सांगता कि मी सांगू ? ” सुबोधने विचारले .

रघूचे अश्रू थांबत नव्हते ” आमचा गाव म्हणजे माझ्यासाठी माझा कुटुंब होतं . रावसाहेब म्हणजे माझे दैवत . मरणाच्या मुखातून त्यांनी मला वाचवून त्यांच्याकडे कामाला ठेऊन घेतलं . मी , शेवंता माझी बायको आणि परी माझी सोन्यासारखी लेक . सुखाचा संसार चालला होता . रावसाहेबांच्या खटकी स्वभावाबद्दल मी खूप ऐकलं होता पंरतु कधीही त्यावर विश्वास ठेवला नाही . वाड्यावरच कामाला असल्याने रावसाहेबांच्या धार्मिक भक्तिभावाबद्दल मला माहिती होते . पण त्याला कर्मकांड म्हणतात हे मला नंतर कळले . आशा ताई , रमण काका अगदी प्रेमळ !! कधीही परकेपणाची जाणीव झाली नाही . पण एके दिवशी …. पण एके दिवशी माझी परी दिसेनाशी झाली . आम्ही दोघं नवरा-बायकोने पुरा गाव पायथ्याशी घातला . रावसाहेबांच्या गावाच्या बाहेरील शेतात त्यांनी एक छोटंसं मंदिर बांधलेलं होतं . शोधत शोधत शेवंता तिथे गेली . ‘धनी …..धनी ….. आपली परी ‘ तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता . मी धावत-धावत तिथे गेलो . माझी सोन्यासारखी परी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती . शेजारी काळी बाहुली , कर्मकांडासाठी लागणारे साहित्य पडलेले होते . डोक्यातून सर सर करत वीज जावी अशी आमची स्थिती झाली . ” धनी , धनी ….. रावसाहेब ….” शेताकडे बोट दाखवून शेवंता म्हणाली . रावसाहेब घाबरून पळत होते . सारा प्रकार आमच्या ध्यानात आला . ज्याला देव मानत आलो होतो त्याने संपत्ती , सत्ता मिलवाण्याच्या लालसेने माझ्या परीचा बळी दिला होता . कर्मकांडाच्या नावाखाली हा माणूस राक्षस झाला होता . दोघांच्या डोळ्यातून अश्रुंचे पूर वाहत होते . ज्या हातानी पोरीला खेळवलं होतं त्याच हातांनी रक्ताळलेली माझी पोरगी घेऊन आम्ही गावाकडे निघालो . ” गावात जाऊन रावसाहेबाचा खरा चेहरा मला लोकांसमोर आणायचा होता . रक्ताळलेली माझी पोरगी दाखवून त्यांना सांगायचे होते कि आपण राक्षस पाळून ठेवला आहे . गावात येताच सारा गाव जमा झाला होता .” हि बघा चेटकीन शेवंता … स्वतःच्या पोरीला खाऊन गेली . साऱ्या गावावर करणी करायला हि येथे आली आहे . या सोन्यासारख्या पोरीचा काय गुन्हा होता ? स्वतःच्या पोरीला संपवताना तुला देवाची भीती वाटली नाही का ? ” रावसाहेबाने डाव साधला होता .
क्रमश

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत