…रावसाहेब ( भाग 8 )

Written by

भाग 8
स्वतः खून करून माझ्या बायकोला चेटकीण ठरवू बघत होता . गावासाठी त्याच्या शब्द म्हणजे अंतिम सत्य !! मी काही बोलणार एवढ्यात एक दगड भीरभीर करत आला आणि शेवंतीच्या डोक्याला बसला .गर्दीने हल्ला केला होता . माझी शेवंता रक्ताळली होती . रमणकाका , आशा ताई गमंत बघत होत्या . त्यांना रावसाहेबाच सत्य माहिती होतं . तरीही कुणी पुढे आलं नाही . एका बाजूला मेलेली माझी परी आणि दुसऱ्या बाजूला गावाने कोणताही न्यायनिवाडा न करता ठार मारलेली माझी शेवंता !! मी सुन्न झालो होतो . सारा गाव रात्रीच्या अंधारात निघून गेला . मी माझ्या पोरीला , बायकोला अंतिम डाग दिला . आणि त्यांची राख त्या रावसाहेबांच्या शेतात पुरली आणि तिथेच एक रोपटं लावलं ” कुणीतरी थोबाडीत मारावी अशी गावाची अवस्था झाली होती . रमणकाका , आशा आत्या शरमेने मान झाली घालून उभे होते .” त्यानंतर रघु वेडसर झाला . आणि अचानक एके दिवशी गावातून गायब झाला . रघूच काय झाला हे जाणून घेण्याचा कुणी साधा विचार सुद्धा केला नाही . रघूने ने एका तांत्रिकला गाठले . कर्मकांड , शाप यांच्या आहारी तो जाऊ लागला . रावसाहेब संपवायचा हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता . त्या तांत्रिकाने रघूला कर्मकांडाचे धडे देऊ केले आणि हाच रघु गावात आला …हो , पन तो येण्याआधी त्याने गावात करणी आनली .. नावाखाली जादूटोणा केला . गावातील अनेक घरातील मुले आजारी पडू लागली . जनावरे मृत होऊ लागली आणि याच संधीचा फायदा घेऊन त्याने रावसाहेबाचा आणि गावाचा विश्वास संपादन केला . ज्या ठिकाणी बायकोची आणि पोरीची राख पुरली होती त्याच झाडाखाली याने झोपडी बनवली . त्याच्या मुलीचा , शेवंताचा आत्मा तिथे गेली १५ वर्षे सूडाच्या प्रतीक्षेत फिरत होता . ” सुबोध सारा खेळ विस्तारून सांगू लागला . “हा , माझी परी , माझी शेवंता माझ्याशी दररोज आत्म्याच्या मुक्तीसाठी मदत मागत होती . परंतु मला केवळ रावसाहेब नाही तर जे जे यात सहभागी झाले त्या सर्वांना मला झालेला त्रास काय असतो हे दाखवून द्यायचं होतं . त्यामुळे मी जादूटोणा करून रावसाहेबांच्या पोराची हत्या केली . केवळ हत्या करून मी शांत बसणार नव्हतो . मला रावसाहेबाच्या माध्यमातून हत्या करायच्या होत्या . जो रावसाहेब गावासाठी देव होता त्याचा देव मला बनायचं होत . आणि म्हणूनच मी त्यांनतर त्याच्या पत्नीचा खून केला ज्यामुळे भेदरलेला रावसाहेब माझ्याकडे आला. ” तुझ्या घरावर करणी झाली आहे आणि असेच एक एक सदस्य मारले जातील . पुढचा नम्बर तुझ्या पोरीचा .. रावसाहेबांचा पोरी वर प्रचंड जीव … आणि जर हे थांबवायचे असेल तर तुला नर बळी द्यावे लागतील . भेदरलेल मन कुणावरही विश्वास ठेवू शकतो त्यात मी तर साधू महाराज …तो रावसाहेब माझ्या प्रभावाखाली आला होता . आणि नरबळीच्या नावाखाली ज्यांनी ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांच्या जवळच्या माणसाला संपवण्याचा कट मी रावसाहेबाच्या मार्फत साध्य केला .

क्रमश

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा