….. रावसाहेब भाग 9 (अंतिम भाग )

Written by

भाग 9 (अंतिम भाग )
कर्मकांड आणि पोरींवरचा जीव यांच्यामुळे रावसाहेबाने हे खून पद्धतशीर पणे केले . आशाताई चा नवरा रावसाहेबांनी संपवला .रावसाहेबांच्या गुन्ह्यांपेक्षा मला आशाबाईंची शांतता मला खूप बोचली होती . त्यावेळी त्या बोलल्या असता तर कदाचित मला न्याय मिळाला असता . असं करत करत मी गावातल्या प्रमुख गुन्हेगारांना शिक्षा दिली . पूजा गावात पुन्हा आली आणि मला तिला संपवायचे होते . पण तिच्यात मला माझी मुलगी दिसली . त्यामुळे शेवटी रावसाहेबाला संपवून मला सुड पूर्ण करायचा होता . पूजा वर करणी करून रावसाहेबाला मी त्याच्या मृत्यूची आगाऊ सूचना देखील दिली .. त्याला तडपताना बघण्याची मजाच वेगळी होती . मी त्याचा प्रत्यक्ष खून केला नसला तरी माझ्या करणीने त्याला संपवला .. माझी शेवंता , परीला मुक्त झाली ” गाव गर्भगळीत झाला होता . गुन्हेगारांप्रती भावनिक होणं आमच्यासाठी नवीन नाही . रावसाहेबाला शिक्षा झाली होती .. ” महाराज चला मग . तुमची जेलवारी … ” सुबोध म्हणाला .”अरे बेटा , तू अजून मला समजू शकला नाहीस . माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं आहे . माझं जगणं , माझं मरणं माझ्या हातात आहे ..आणि तुला आशीर्वाद देताना म्हणालो होतो ना कि तू ज्या कामासाठी आला त्यात तू यशस्वी होशील … बघ झाल यशस्वी !! महाराजांचा आशीर्वाद खरा ठरला ” एवढ बोलताच रघु धाडदिशी खाली पडला . यावेळी त्याने त्याचाच खून केला होता . गुन्ह्याचा छडा लागला होता . रघु गुन्हेगार असला तरी त्याच्यावर झालेला अन्यायबद्दल गाव शरमेने खाली मन करून उभं होत . याच गावाने रघुच अत्यंसंस्कार केलं . सुबोधचि पहिली केस..त्यातल्या त्यात इतकी भयावह .. पण तरीही त्याने हार न मारता ती सोडवली . गावाने सुबोधचे आभार मानले . शीतलला शहरात जाण्याची परवानगी देण्यात आली . गुन्हेगार शोधताना तिची सुबोधला मदत झाली होती . सुबोध शहरात जाण्यासाठी निघाला . पूर्ण वाडा भावनिक झाला . जाताना रमणकाका कुठेच दिसत नव्हते . सुबोध आणि वाड्यातील मंडळी रमणकाकांना भेटण्यास त्यांच्या घरी गेली . मालकाच्या जाण्याने त्यांना खूप धक्का बसला होता . सुबोधला बघताच त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही . स्वतःच्या मुलाला मिठी मारावी तशी त्यांनी सुबोधला मिठी मारली . सुबोध माघारी निघणार एवढ्यात त्यांचं लक्ष पलंगाखाली ठेवलेल्या दोरीकडे गेलं . त्याने लगेच आपल्या पेटीतील पुरावा म्हणून गोळा करून ठेवलेल्या दोरीचा तुकडा बघितला .. अगदी सारखाच !! पलंगावर एक फोटो पडलेला होता . सुबोध ला धक्का बसला . त्याने त्याची पूर्ण पेटी बघितली . त्याच्याकडे असलेला हा फोटो रमणकाकांकडे कसा ? सुबोधने नथू कडे नजर फिरवली . नथू ने मन खाली घातली . सारा प्रकार त्याच्या ध्यानात आला .. रमनकाकांना सत्य कळले होते . रमणकाकांचा मुलगा आणि सुबोध हे अधिकारी झाल्यानंतर खूप जवळचे मित्र झाले !! एकदम जीव कि प्राण !! तो त्या दोघांचा फोटो होता . जो रमनकाकांनी सुबोधच्या खोलीतून चोरला होता . म्हणजे रावसाहेबांचा खून ?? रमणकाका ? ” रमणकाका रावसाहेब तुम्ही मारलं ना ? रक्ताचे डाग लागलेली हि दोरी …माझ्या खोलीतील हा फोटो इथे काय करतोय ” सुबोध ने विचारणा केली .”व्यय !! मी मारलं त्या हरामखोराला . तुम्ही शहरातून आल्यानंतर मला तुमची नथू सोबतची जवळीक थोडी खटकत होती . एके दिवशी मी तुमच्या टेबल वर फोटो पाहिला आणि वर्तमानपत्राची अपघातचची काढून ठेवलेली कात्रणे पाहिली . नथू आणि समाधान (रमनकाकांचा मुलगा ) लहानपणापासून खूप जिव्हाळ्याचे मित्र .. मला काहीतरी गडबड वाटली . तुम्हा दोघांचा माग काढण्यास मी सुरुवात केली आणि एके दिवशी …एके दिवशी ” समाधानबद्दल रमणकाकांना काही कळता कामा नये याची काळजी घे नथू ” हे तुमच्या तोंडून ऐकले साहेब आणि जीव ओढला गेला . नथूला समाधानची शपथ देऊन त्याच्याकडून सार वदवून घेतलं . हा रावसाहेबाने त्या महाराजांच्या शब्दात येऊन अपघाताच्या नावाखाली माझ्या पोराचा खून केला होता . ज्याच्या सेवेसाठी सार आयुष्य खर्ची केलं त्याने माझं आयुष्य उध्वस्त केलं . साधूला आणि रावसाहेबाला शिक्षा देणं गरजेचं होतं . त्यामुळे साधूच्या झोपडीतून मी दोरी आणि कर्मकांडाचा काही सामान चोरलं .ज्याने रावसाहेबाचा खून करून त्याचा आरोप साधू महाराजवर जाईल .पण तसं झालं नाही .पण दोघेही संपले . माझा पोरगा मुक्त झाला !! ” सुबोधला रडू कोसळलं . मित्राला न्याय मिळावा म्हणून हि केस स्वतःच्या अंडर घेतली आणि गुन्हेगार म्हणून त्याच मित्राच्या वडिलांना अटक करण्याची वेळ आली होती . परंतु कर्तव्यापुढे भावनेला स्थान नसते हे समाधानाचे शब्द त्याला आठवले . रमनकाकांना अटक झाली .साऱ्या लोकांना आज न्याय मिळला होता !! गावावरचे अरिष्ट टळले होते . घराणेशाहीच्या नावाखाली पूजा आज त्या गावाची सरपंच आहे .. संतोष विरोधक म्हणून उदयास आला आहे . रघु महाराजचे मंंदीर बांधण्यात आले आहेे !!

 

 

समाप्त !! धन्यवाद

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा