#राशिचक्र

Written by

राशीचक्र: भाग : ४

आज सकाळीच आंधारुन आल होत. आवेळी आभाळ भरून आल होत, जस काही कुणीतरी वातावरण भारुन टाकलं आहे. समर्थाच ध्यान अजुन हि चालुच होत. कार्तिक अन काका त्यांच्या ध्यानकुटिबाहेर वाट पाहत बसले होते. पुर्ण वातावरणाचा ताण त्या दोघांच्याही चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.

“ओम नम हनुमते नम….” आतुन जयकारा ऐकु आला, तसे कार्तिक अन काका हुशार झाले.

“जनार्धन,दोघही आत या तुम्ही….” समर्थांनी बोलावले.

“मी जे काही तुम्हाला सांगणार आहे,ते तुम्ही दोघही लक्ष देऊन ऐका.आपण आता ज्या शक्तीबरोबर लढा देणार आहोत,ती सामान्य तर आसणार नाही.त्यामुळे आपल्याला जे काही करायचे आहे ते खुप काळजी पुर्वक करायचे आहे. या सर्व गोष्टीमधे महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे,ति कार्तिक तुला.” समर्थ कार्तिक कडे पाहत बोलले.

“कार्तिक,तुला ज्या शक्तीबरोबर लढा द्यायचा आहे. त्या साठी तुला काही अलौकिक शक्तींची गरज भासणार आहे. त्यामुळे मी काही शक्ती तुझ्यात स्थापित करणार आहे. त्यामुळे तु आनुष्ठानास सिद्ध हो…” समर्थांनी कार्तिक ला सांगितले.

“समर्थ,मी एकटा…. तुम्ही नाही येणार का माझ्याबरोबर……” कार्तिक थोडासा घाबरुन बोलला.

“कार्तिक,आम्ही दोघे सदैव तुझ्याबरोबर आसणारच आहोत, पण आता नाही, योग्य वेळ आल्यावर…”समर्थ बोलले,”चल आता वेळ दवडु नको. तुला आजुन आमन ला येथे आणायचे आहे.

आनुष्ठान चालु झाले.एका पाठोपाठ एक काही शक्ती कार्तिक मधे स्थापित केल्या समर्थांनी.

“कार्तिक,आता तुला यातिल काही शक्ति तुला आठवणार नाहित, पण योग्यवेळी त्या तुझ्याकडे आपोआप चालत येतिल. हनुमंतावर विश्वास ठेव, तो आपल्या भक्ताची काळजी घ्यायला समर्थ आहे.” समर्थ कार्तिक ला बोलले,” जय श्रीराम…

“मला आशिर्वाद द्या….”कार्तिक समर्थांच्या पाया पडत म्हणाला.

समर्थांच्या कुटीतुन बाहेर पडल्यानंतर कार्तिकला का कुणास ठावुक अस्वस्थ वाटत होते. आपली सॅक कारमधे टाकत कार्तिक निघाला तो आपल्या रुम कडे… कार्तिक खरे तर मनामधुन घाबरला होता, पण मित्रप्रेमामुळे तो हे धाडस करत होता. त्याच्या डोक्यात आता एकच विचार होता, अमन काय करत असेल? कसा असेल…? याविचारातच त्याने कारला स्टार्टर मारला.

“कार्तिक… ये कार्तिक … एक मिनिट थांब …..” कार्तिकने चमकुन आवाजाच्या दिशेने पाहिले.

त्याच्या डोळ्यासमोरुन पुर्ण तिन वर्षाचा कालखंड एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरसर सरकत गेला. त्याची ति फुलासारखी नाजुक अन सुंदर प्रेयसी,आजही तशीच दिसत होती, जशी त्याने पाहीली होती, कॉलेजच्या कॅन्टिनमधे….

“हॅलो…. अरे तुझ लक्ष कुठ आहे…? मी तुला बोलत आहे….?” समोरुन आवाज आला. त्यासरशी कार्तिक भानावर आला.

“हां… बोल की…. “ कार्तिक बोलला.

“अरे काल आलास … बोलला नाहिस….अन आज ही न भेटताच चाललास…..” श्रद्धा एका दमात बोलली.

“ अगं अस काही नाही आहे, एका खुप महत्वाच्या कामात आसल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं…” कार्तिक खजिल होत म्हणाला.

“हो ते ही आहे म्हणा…आपल्याला कामापुढे काही सुचत नाही….”आज हि तिच्या आवाजात तोच आधिकार होता.

“सॉरी श्रद्धा, मी तुला आल्यावर सगळे सांगेन….”कार्तिक.

“i hope so…. निदान यावेळेस तरी तुझ वचन पाळशील….”

श्रद्धाचा निरोप घेत कार्तिक आपल्या रुमकडे निघाला. आज दुपारीच आंधारुन आल होत. एक वेगळिच शांतता. गाडी चालवत आसताना कार्तिक च्या डोक्यात कॉलेजच्या आठवनींनी गर्दि केली होती. थोड्यावेळाने एका वळणावर चहाची टपरी पाहुन कार्तिकने ग़ाडी थांबवली.

“तुझी वाट खुप खडतर आहे. त्याला माघारी आणने जवळ जवळ आशक्य आहे.” एक आवाज आला. त्यासरशी कार्तिकनेत्याबाजुला पाहिले.तेथे तर कोनीच नव्हते. मग कोण बोलले…? कार्तिक विचार करतच टपरी कडे गेला.

“तु कितिही प्रयत्न कर तो वाचने शक्य नाही…”ट्परीवाला

“काय्य…. तु काय बोलत आहेस….” कार्तिक जवळजवळ ओरडत बोलला.

“काय साहेब, काय घेणार… चहा कि कॉफी..? ट्परीवाला.

नाही, तु या आधी काय बोलला….” कार्तिक.

“ नाही साहेब, मी काय च बोललो नाही…”ट्परीवाला भांबवुन कार्तिक कडे बघत म्हणाला.

“काही नाही…. चहा दे…”

चहा संपवुन कार्तिक गाडीकडे वळाला.

“तु मधे पडु नको, मला माझे काम करु दे….”

कार्तिक दचकुन इकडेतिकडे पाहू लागला.

घाई गड्बडीमधे कार्तिक रुमच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात तो घरी पोहचला.आज घरच वातावरण काही वेग़ळच होत. त्याने घरात शिरताच एक वेगळाच वास पसरला होता.

“आम्या,कुठ आहे रे….?” कार्तिक आम्याला आवाज देत म्हणाला.

“किर्या,आला का रे …. कुठ गेलता रे हाराम खोर… मी इथ आजारी आसताना…” आम्या बोलला,”तु नव्हता म्हणून मी किमयाला बोलावून घेतल.”

तेवढ्यात किमया कॉफीचे मग घेउन रुम मधे आली.

********************************

Article Categories:
भयपट

Comments are closed.